ETV Bharat / bharat

IIT Student Suicide : आयआयटी विद्यार्थ्याची हॉस्टेलमध्ये आत्महत्या; टोकाचं पाऊल उचलण्यामागचं 'हे' आहे कारण - विद्यार्थ्याची आत्महत्या

IIT Student Suicide : आयआयटी दिल्लीच्या एका विद्यार्थ्यानं शुक्रवारी वसतिगृहाच्या खोलीत आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही विषयात नापास झाल्यामुळे त्यानं असं पाऊल उचलल्याची शक्यता आहे.

suicide
suicide
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2023, 10:42 AM IST

नवी दिल्ली : IIT Student Suicide : आयआयटी दिल्लीच्या विंध्याचल वसतिगृहात शुक्रवारी एका विद्यार्थ्यानं आत्महत्या केली. अनिल कुमार (२१) असं मृताचं नाव आहे. पोलिसांना घटनास्थळी कोणतीही सुसाइड नोट सापडलेली नाही. मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आलाय. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे.

खोलीचा दरवाजा आतून बंद होता : या प्रकरणी पोलिसांनी अधिक माहिती दिली. 'शुक्रवारी संध्याकाळी सुमारे ६ वाजता किशनगड पोलिस स्टेशनला एक कॉल आला. आयआयटी दिल्लीच्या विंध्याचल वसतिगृहातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा हा कॉल होता. माहिती मिळताच पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहोचला. तेव्हा वसतिगृहाच्या खोलीचा दरवाजा आतून बंद होता. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करून दरवाजा तोडण्यात आला. विद्यार्थ्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं', असं पोलिसांनी सांगितलं.

काही विषयात अनुत्तीर्ण झाला होता : मिळालेल्या माहितीनुसार, अनिल कुमार हा गणित आणि संगणक विषयात बीटेक करत होता. मात्र काही विषयात नापास झाल्यामुळे तो वसतिगृहात सहा महिन्यांची मुदतवाढ घेऊन राहत होता. साधारणत: विद्यार्थ्यांना जून महिन्यात वसतिगृह रिकामं करावं लागत. पण तो काही विषयात पास होऊ शकला नाही. त्यामुळे त्याला उत्तीर्ण होण्यासाठी सहा महिन्यांची मुदत देण्यात आली होती.

विद्यार्थ्यांच्या आत्महत्या गंभीर प्रश्न : देशात गेल्या काही दिवसांपासून वारंवार होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आत्महत्या आता चर्चेचा विषय बनला आहे. राजस्थानमधील कोटामधून असे बरेच प्रकरण उघडकीस आले आहेत. कोटामध्ये देशभरातून विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. मात्र येथील अभ्यासाचा दबाव सहन करू न शकल्याने ते आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलतात. नुकतेच २८ ऑगस्टला कोटामध्ये दोन विद्यार्थ्यांनी परिक्षेत कमी गुण मिळाले म्हणून आत्महत्या केली होती. त्यापैकी एक विद्यार्थी लातूरचा होता.

हेही वाचा :

  1. Kota students suicide : कोटामध्ये लातूरसह बिहारच्या विद्यार्थ्याची तणावातून आत्महत्या, दोन महिने कोचिंगमधील परीक्षांवर बंदी लागू
  2. Raksha Bandhan 2023 : ‘ताई मला माफ कर’ असं लिहून रक्षाबंधनाच्या दिवशी बहिणीच्याच घरी भावाची आत्महत्या
  3. Officer Commits Suicide : वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून सीमाशुल्क विभागाच्या अधिकाऱ्याची तळ्यात उडी मारुन आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.