ETV Bharat / bharat

Digvijay Singh On Hindutva : सावरकरांनी लिहिलंय गोमांस खाण्यात चुकीचं काही नाही, गाय आमची माता नाही : दिग्विजय सिंहाचं वादग्रस्त वक्तव्य - भाजप सरकार आल्यास संविधान बदलेल

भोपाळमध्ये काँग्रेसच्या जन जागरण अभियानात ( Congress Jan Jagaran Abhiyaan In Bhopal ) काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार दिग्विजय सिंह यांनी आरएसएस, भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्ला ( Digvijay Singh Criticized RSS BJP ) चढवला. इतकेच नाही तर दिग्विजय सिंह यांनी हिंदू धर्म आणि हिंदुत्वाबाबत वादग्रस्त ( Digvijay Singh On Hindutva ) वक्तव्य केले. सिंह म्हणाले की, वीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, गोमांस खाण्यात काही नुकसान नाही आणि विष्ठेमध्ये लोळणारी गाय आपली माता कशी असू शकते? सिंह यांच्या या विधानानंतर ( Digvijay Singh Controversial Statement On Sawarkar ) वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

दिग्विजय सिंह
दिग्विजय सिंह
author img

By

Published : Dec 25, 2021, 8:27 PM IST

भोपाळ - मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसच्या जनजागरण अभियानाचे ( Congress Jan Jagaran Abhiyaan In Bhopal ) प्रभारी दिग्विजय सिंह यांनी पुन्हा एकदा आरएसएसवर हल्लाबोल ( Digvijay Singh Criticized RSS BJP ) केला. आरएसएसच्या विचारसरणीचे हे सरकार असेच राहिले तर, देशाचे संविधान बदलेल आणि आरक्षण संपेल ( Modi Government Threat For Indian Constitution ), असे सिंह म्हणाले. दिग्विजय सिंह हे नर्मदिया समाज भवनात काँग्रेसच्या प्रशिक्षण वर्गाला संबोधित करत होते. दिग्विजय सिंह यावेळी मोठे स्वातंत्र्यवीर सावरकरांबाबत वादग्रस्त विधान केलं. सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात लिहिले आहे की, हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी ( Digvijay Singh On Hindutva ) काहीही संबंध नाही. त्याचप्रमाणे, गाय हा असा प्राणी आहे जो स्वतःच्या विष्ठेमध्ये लोळत असतो. मग ती गाय आमची माता कशी होईल ( Sawarkar Wrotes Cow Is Not Gaumata ) ? गोमांस खाण्यात सावरकरांना कोणताही दोष दिसला नाही. हे खुद्द सावरकरांनीच लिहिले आहे, ज्यांच्या मतांबद्दल भाजप आणि आरएसएस आवाज उठवत आहेत, असे ते ( Digvijay Singh Controversial Statement On Sawarkar ) म्हणाले.

सावरकरांनी लिहिलंय गोमांस खाण्यात चुकीचं काही नाही, गाय आमची माता नाही : दिग्विजय सिंहाचं वादग्रस्त वक्तव्य

हिंदूही गोमांस खातात

भारत हा विविधतेचा देश आहे. देशात असे हिंदू आहेत, ज्यांना गोमांस खाण्यास हरकत ( Hindus Eat Beef Sawarkar Controversy ) नाही. गायीबद्दल लोकांमध्ये संभ्रम नाही. सावरकर हे भाजप आणि संघाचे विचारवंत आहेत. ज्यांना या पुस्तकाबद्दल आणि सावरकरांच्या बोलण्याबद्दल माहिती आहे, त्यांनी हात वर करून सांगावे. तसेच आरएसएस आणि भाजपच्या लोकांनाही हे सांगावे, असेही दिग्विजय म्हणाले.

'आरएसएसचे लोक पाठीत वार करतात'

दिग्विजय सिंह यांनी यावेळी आरएसएसवर जोरदार हल्ला चढवला. या संस्थेची अद्याप नोंदणी झालेली नसल्याचे त्यांनी सांगितले. आमचा लढा आरएसएसच्या विचारसरणीविरुद्ध आहे, असे दिग्विजय सिंह यांनी सांगितले. संघाचे लोक छुप्या पद्धतीने काम करतात, असा आरोप त्यांनी यावेळी केला. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांच्या मुद्याचा पुनरुच्चार करत ते म्हणाले की, आरएसएसचे लोकं पाठीत वार करण्याचे काम करतात. समोरून हल्ला करत नाहीत. सिंह म्हणाले की, आरएसएसची विचारधारा संपूर्ण देशाचे विभाजन करण्यात गुंतलेली आहे. आमची लढाई त्यांच्यासोबत आहे. माझा संघाशी कोणताही वैयक्तिक संघर्ष नाही, मात्र मी या विचारसरणीच्या विरोधात आहे, असेही दिग्विजय सिंह म्हणाले.

'मग संविधान संपेल'

भाजप आणि केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना दिग्विजय सिंह म्हणाले की, 2024 मध्ये भाजप पुन्हा एकदा सत्तेत आल्यास देशातील संविधान संपुष्टात येईल. आरक्षणे कालबाह्य होतील. लोकांना सुविधा मिळणे बंद होईल.

गाय माता नाही, हे सावरकरांनी मान्य केले

दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की, वीर सावरकरांनी त्यांच्या पुस्तकात हिंदू धर्माचा हिंदुत्वाशी काहीही संबंध नाही असे लिहिले आहे. पुस्तकात त्यांनी गायीला गाय माता मानण्याचेही नाकारले ( Sawarkar Wrotes Cow Is Not Gaumata ) आहे. सावरकर हे आज भाजपचे मोठे विचारवंत आहेत, त्यामुळे जनतेला या वस्तुस्थितीची जाणीव करून द्यावी लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.