हैदराबाद - जर तुम्ही आवश्यक रकमेपेक्षा जास्त आयकर पाठवला असेल तर तुम्हाला तो परत मिळणार आहे. परंतु, त्यासाठी आपण योग्य रिटर्न भरले असायला हवेत. त्यानंतरच आपण परतावा मिळण्यास पात्र आहात असे समजलो जाणार आहे. (2020-21-2021-22) या मागील आर्थिक वर्षासाठी, बर्याच लोकांनी त्यांचे रिटर्न भरले आहेत. त्यानंतर त्यांचे रिफंड देखील मिळाले आहेत.
नोटीशीली वेळेत उत्तर द्यावे लागणार - मागील मूल्यांकन वर्षांमध्ये आपली करस्वरूपातील काही थकबाकी असल्यास, आयकर विभाग परतावा देण्यास नकार देऊ शकतो. तसेच, ते करदात्याला आपल्या बाकी रकमेबाबत नोटीसही पाठवू शकतात. आपल्याला अशी कोणतीही नोटीस मिळाली असेल तर आपल्याला त्या नोटीशीली वेळेत उत्तर द्यावे लागणार आहे. तुमच्या उत्तरानंतर कर थकबाकी संबंधीत विभाग परताव्यासंबंधीची निर्णय घेणार आहे.
लवकरात लवकर ई-पडताळणी करणे चांगले - आयकर रिटर्नमध्ये दिलेले बँक तपशील चुकीचे असल्यास, परतावा मिळू शकत नाही. बँक तपशील पुन्हा एकदा तपासा. रिटर्न भरूनही, जर ई-व्हेरिफिकेशन झाले नाही, तर रिफंड थांबू शकतो. रिटर्न भरल्यानंतर 120 दिवसांच्या आत ई-व्हेरिफिकेशन पूर्ण करणे आवश्यक आहे, अन्यथा ते अवैध होईल. लवकरात लवकर ई-पडताळणी करणे चांगले.
यकर वेबसाइटवर लॉग इन करा - आयकर विभागाला तुमच्या रिफंडबाबत काही शंका असतील. विभाग काही स्पष्टीकरणांची अपेक्षा करू शकतो, तोपर्यंत परतावा रोखला जाऊ शकतो. आयकर वेबसाइटवर लॉग इन करा आणि काही अतिरिक्त तपशील मागितले आहेत का ते पहा आणि त्यानुसार ते स्पष्ट करा. काही वेळा तुमची गणना आणि आयकर विभागाची गणना यामध्ये तफावत असू शकते. अशा परिस्थितीत, परतावा नाकारणे शक्य आहे. आयकर वेबसाइटवर लॉग इन करा आणि 'प्रलंबित कारवाई'मध्ये काही अतिरिक्त तपशील मागितले आहेत का ते पहा आणि त्यांना उत्तर द्या.
हेही वाचा - त्रिकूट डोंगरावर रोपवेमध्ये बचावकार्य सुरूच; हेलिकॉप्टरमधून पडलेल्या व्यक्तीचा मृत्यू