कोलकाता - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मोठी घोषणा ( WB CM Mamata Banerjee on 2024 general elections ) केली आहे. काँग्रेसची इच्छा असेल तर आपण सर्वजण मिळून २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका लढू शकतो, असे त्यांनी म्हटलं आहे.
-
If Congress wants we all can fight (2024 general elections) together. Don't be aggressive for now, be positive. This winning (Assembly polls in 4 states) will be a big loss for BJP. This (2022 election results will decide fate of 2024 polls) is impractical: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/vnqVGZBGLI
— ANI (@ANI) March 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">If Congress wants we all can fight (2024 general elections) together. Don't be aggressive for now, be positive. This winning (Assembly polls in 4 states) will be a big loss for BJP. This (2022 election results will decide fate of 2024 polls) is impractical: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/vnqVGZBGLI
— ANI (@ANI) March 11, 2022If Congress wants we all can fight (2024 general elections) together. Don't be aggressive for now, be positive. This winning (Assembly polls in 4 states) will be a big loss for BJP. This (2022 election results will decide fate of 2024 polls) is impractical: WB CM Mamata Banerjee pic.twitter.com/vnqVGZBGLI
— ANI (@ANI) March 11, 2022
सध्या आक्रमक होऊ नका, सकारात्मक व्हा. चार राज्यातील विधानसभा निवडणुकांमधील विजय हा भविष्यात भाजपसाठी मोठे नुकसानदायक ठरणार आहे. 2022 निवडणूक निकाल 2024 निवडणुकांचे भवितव्य ठरवतील, असे ममता यांनी म्हटलं आहे.
समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यांनी निराश होऊ नये आणि त्याच ईव्हीएम मशीनच्या फॉरेन्सिक चाचण्या घ्याव्यात. यावेळी अखिलेश यादव यांच्या मतांची टक्केवारी 20% वरून 37% पर्यंत वाढली असल्याचे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी म्हटलं.
नुकतेच गोवा, पंजाब, मनिपूर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड या पाच राज्यातील निवडणुकांचे निकाल 10 मार्चला लागले आहे. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या आहेत. तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मनिपूर आणि गोवा या चार राज्यात भाजपाला सर्वाधिक मते मिळाली आहेत. या चारही राज्यात भाजापा सत्ता स्थापन करेल, अशी चिन्हे आहेत.
हेही वाचा - Goa Assembly Election Result 2022 : गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादीचा धुव्वा; 'नोटा'पेक्षाही कमी मत