'काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन' (सीआयएससीई) या मंडळाच्यावतीने घेण्यात येणाऱ्या (आयसीएसई) दहावी आणि आयएससी (बारावी) 2021 परीक्षेचा निकाल उद्या (शनिवारी) दुपारी 3 वाजता जाहीर होणार आहे. आयोगाच्या cisce.org आणि results.cisce.org या संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतील.
इयत्ता 9वीचे मार्क्स आणि 10वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स 10वीच्या निकालासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. तर 11वीचे मार्क्स आणि 12वीचे अंतर्गत मूल्यमापनाचे मार्क्स 12वी निकालासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. यंदा अंदाजे 3 लाख विद्यार्थ्यांची 10,12वी परीक्षांसाठी रजिस्ट्रेशन झाले आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर CISCE ने 10 आणि 12 वीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या.
हेही वाचा - LANDSLIDE AT MAHAD : रायगडच्या महाडमध्ये दरड कोसळून आतापर्यंत ३६ जणांचा मृत्यू; बचावकार्य सुरू