भरतपूर (राजस्थान) - येथील मेवात भाग ऑनलाइन फसवणून, चोरी, दुचाकी चोरी यांसारख्या गुन्ह्यासाठी देशात कुप्रसिद्ध आहे. पूर्ण मेवात क्षेत्र अपराधाचे दलदल बनले आहे. पण, जब्बार यांचा फोटो चिखलातील कमळ असल्यासारखे व्हायरल होत आहे. अपराधाकडे वळणाऱ्या तरुणांना प्रेरणा देणारा हे छायाचित्र ठरत आहे. गुन्हेगारी परिसरात राहूनही आपल्या जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपण काही वेगळे करु शकतो हे आयएएस जब्बार यांनी सिद्ध केले आहे.
पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक म्हणून आहेत कार्यरत - रुंध गावचे रहिवासी असलेले जब्बार खान अलवरमधील टपाल विभागात पोस्ट ऑफिसचे वरिष्ठ अधीक्षक ( एसएसपी ) म्हणून कार्यरत आहेत. नुकतेच जब्बारचे वडील अल्वर येथे उपचारासाठी गेले होते. त्याचवेळी जब्बार खान आपल्या वडिलांना त्यांच्या कार्यालयात घेऊन गेले आणि त्यांच्या खुर्चीवर बसून आणि त्यांच्या शेजारी आईला बसून हा फोटो काढला आहे. . मेवात भागातील जब्बार खानचे हे चित्र या भागातील तरुणांचा शिक्षणाकडे वाढता कल दर्शवत आहे.
सलग 4 नोकऱ्या - जब्बार खान यांनी 11 वीपर्यंत त्यांच्या गावात शिक्षण घेतले आणि त्यानंतर 12वी शिकण्यासाठी सीकरला गेले. त्यांनी अल्वर येथून पदवी आणि राजस्थान विद्यापीठ, जयपूर येथून पदव्युत्तर शिक्षण घेतले. सीकरमध्ये शिकत असताना योग्य मार्गदर्शन मिळाल्याचे जब्बार यांनी सांगितले. बारावीनंतर त्यांची भारतीय नौदलात निवड झाली. त्यानंतर सहायक रेल्वे मास्ट व राजस्थान लोकसेवा आयोग ( RPSC ) परिक्षा उत्तीर्ण करुन सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी मिळवली. केंद्रीय लोकसेवा आयोग ( UPSC ) परिक्षा पास करत सहायक रेल्वे आयुक्त हे पद मिळवले. त्यानंतर 2017 मध्ये भारतीय डाक सेवा ( Indian Postal Service ) विभागात नोकरी मिळाली. अशा प्रकार जब्बार खान यांनी मेहनतीच्या जोरावर एकानंतर एक असे चार ठिकाणी यश मिळवले.
तरुणांना करताहेत मार्गदर्शन - जब्बार खान हे मेवात भागात शिकणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन देत आहेत. जब्बार खान हे अनेक गरजूंना आर्थिक मदतही करतात. शिक्षण हे एकमेव माध्यम आहे ज्याद्वारे समाजाला नवी दिशा देता येते, असे जब्बार खान यांचे मत आहे.
हेही वाचा - Vismaya Case : विस्मयाच्या पतीला न्यायालयाने ठरवले दोषी