नवी दिल्ली : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका बसलेल्या भारताला जगभरातून मदतीचा ओघ सुरुच आहे. रविवारी इंडोनेशिने पाठवलेले चार क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर्स आंध्रच्या विशाखापट्टणमध्ये पोहोचले. भारतीय वायुसेनेच्या दोन मोठ्या विमानांमधून हे कंटेनर आणण्यात आले.
ऑक्सिजन वाहतुकीसाठी वायुसेनेची मोठी मदत..
देशातील कोरोना परिस्थिती पाहता, वायुसेनेची काही विमाने केवळ ऑक्सिजनच्या दळणवळणासाठी वापरण्यात येत आहेत. या विमानांच्या मदतीने परदेशातून भारतात, आणि एका राज्यातून दुसऱ्या राज्यात ऑक्सिजन सिलिंडर पोहोचवले जात आहेत. वायुसेनेच्या एका सी१७ विमानाने जर्मीनच्या फ्रँकफ्रुटमधून झीओलाईट (वैद्यकीय ऑक्सिजन तयार करण्यासाठीचा कच्चा माल) मुंबईच्या विमानतळावर आणले. तर, आणखी दोन सी १७ हे फ्रान्सहून दोन ऑक्सिजन जनरेटर्स, आणि इस्राईलहून ऑक्सिजन कॉन्सेन्ट्रेटर्स आणि रेस्पिरेटर्स आणत आहेत.
भारतातील कामगिरी पहायची झाल्यास, वायुदलाच्या विमानांनी पुणे ते जामनगर चार ऑक्सिजन कंटेनर पोहोचवले आहेत. तसेच, ग्वाल्हेर ते भोपाळ सात आणि हिंडोन ते रांची दोन क्रायोजेनिक ऑक्सिजन कंटेनर पोहोचवले आहेत. सध्या विजयवाडा ते भुवनेश्वर चार, चंदीगढ ते रांची ६, आग्रा ते जामनगर दोन, हिंडोन ते भुवनेश्वर २, हैदराबाद ते भुवनेश्वर ६, आणि जोधपूर ते जानमगर दोन ऑक्सिजन कंटेनर नेण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती वायुसेनेने दिली.
हेही वाचा : कोरोना रुग्ण दगावल्यानंतर लावला ऑक्सिजन; बिहारमधील विदारक प्रकार