कोलकाता - नेताजी सुभाष च्रंद बोस यांच्या 125 जयंती निमित्त कोलकातामधील व्हिक्टोरीया मेमोरियलमध्ये आयोजीत कार्यक्रमात जय श्री राम घोषणा देण्यात आल्या होत्या. त्यावर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाषण करण्यास नकार दिला होता. यावरून भाजपाने टीकास्त्र सोडल्यानंतर दीदींनी आज भाजपाचा आज खसपूर समाचार घेतला.
भाजपाने रविंद्र नाथ टागोर, नेताजी सुभाष चंद्र बोस क्रांतिकारी संथाल नेता बिरसा मुंडा सारख्या बंगालच्या नेत्यांचा अपमान केला. मी त्या कार्यक्रमात ( नेताजी यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकारकडून आयोजीत कार्यक्रमात )गेले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर काही जणांनी माझा अपमान केला. मला डिवचण्याची हिंमत केली. ते अद्याप मला ओळखत नाहीत. जर त्यांनी मला बंदूक दाखवली. तर मी त्यांना शस्त्र भंडार दाखवले. मात्र, मला बंदूकांची राजकारण करायचे नाही, असे ममता म्हणाल्या.
भाजपाने नेताजींचा अपमान केला. त्यांनी टागोर यांच्या जन्मस्थळाबद्दल चुकीची माहिती दिली. त्यांनी ईश्वर चंद्र विद्यासागर यांची मृर्ती तोडली. तसेच बिरसा मुंडा समजून चुकीच्या प्रतिमेवर हार चढवला, असे ममता म्हणाल्या.
काय प्रकरण?
नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त पश्चिम बंगालमध्ये केंद्र सरकारकडून कोलकात्यातील व्हिक्टोरिया मेमोरियलमध्ये कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दाखल झाले. त्यांच्यासमवेत बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी देखील उपस्थित होत्या. यावेळी, ममतांना भाषणासाठी बोलावले असता तेथे उपस्थित लोकांनी पीएम मोदींसमोर जय श्री रामचा जयघोष करण्यास सुरवात केली. यावर बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी संतप्त होऊन या कार्यक्रमात बोलण्यास नकार दिला. तसेच घोषणा देणाऱ्या सुनावलं. यावरून त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली आहे.