हैदराबाद - भारताची बॅडमिंटनपटू सायना नेहवालने केलेल्या ट्विटला ( Badminton Star Saina Nehwal Tweet ) प्रतिक्रिया देताना 'रंग दे बसंती' फेम अभिनेता सिद्धार्थने मर्यादा ओलांडून ट्विट ( Actor Siddharth On Saina Nehwal Tweet ) केले होते. त्या प्रकरणावर आता सायना नेहवालने प्रतिक्रिया दिली आहे. सिद्धार्थ स्वत:ला अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करु शकला असता, असे सायनाने ईटीव्ही भारतशी बोलतांना ( Saina Nehwal On Etv Bharat ) म्हटले आहे.
याबाबत ई टीव्ही भारतने सायना नेहवालशी संपर्क साधला. तेव्हा बोलताना ती म्हणाली की, 'मला तो एक अभिनेता म्हणून आवडायचा. पण हे ( त्याने केलेले ट्विट ) चांगले नाही. सिद्धार्थ स्वत:ला अधिक चांगल्या शब्दांत व्यक्त करु शकला असता.'
महिला आयोगाचे ट्विटर इंडियाला पत्र
राष्ट्रीय महिला आयोगाने ट्विटर इंडियाला पत्र लिहून अभिनेता सिद्धार्थचे ट्विटर अकाउंट बंद ( NCB Send Notice Siddharth ) करण्याची विनंती केली आहे. त्याचे ट्विट हे महिलांविरोधी आणि अपमानकारक असल्याचे महिला आयोगाने म्हटले आहे. दुसरीकडे अभिनेता सिद्धार्थने अपमानाचा हेतू नसल्याचा खुलासा केला आहे.
काय आहे प्रकरण?
पाच जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेत चूक झाली होती. त्यावर सायना नेहवालने ट्विट करत चिंता व्यक्त ( Saina Nehwal On Pm Security Breach ) केली होती. पंतप्रधानांच्या सुरक्षेत तडजोड होत असेल तर देश सुरक्षित असल्याचा दावा करता येत नाही, असेही सायनाने ट्विटमध्ये म्हटले होते. त्यावरुन अभिनेता सिद्धार्थने मोदी सरकार आणि सायना नेहवालला टोला लगावणारे ट्विट केले होते.