ETV Bharat / bharat

Dharma Sabha in Raipur: मी धर्मासोबत उभा आहे आरएसएस अन् मोहन भागवत यांच्यासोबत नाही -स्वामी निश्चलानंद सरस्वती

राजधानीत स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी धर्मसभेत राजकारण्यांवर उघडपणे टीकास्त्र सोडले आहे. तसेच, ‘देशातील नेत्यांना धर्म आणि धोरण कळत नाही, त्यांच्याकडून आपण काय अपेक्षा करू शकतो असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

स्वामी निश्चलानंद सरस्वती
स्वामी निश्चलानंद सरस्वती
author img

By

Published : Jun 17, 2022, 5:40 PM IST

रायपुर - शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज यांनी गुरुवारी राजधानीच्या पंडित दीनदयाळ सभागृहात मोठ्या धार्मिक मेळाव्याला संबोधित केले आहे. तसेच, या संमेलनात बोलताना भारत येत्या साडेतीन वर्षांत हिंदू राष्ट्र होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे.

विशाल धर्मसभा

फाळणीनंतरच्या भारताला मानवी हक्कांच्या मर्यादेत राहून हिंदू राष्ट्र म्हणून घोषीत न करणे ही सरकार आणि राजकीय पक्षांची दिशाहीनता आहे. काही वर्षांत भारत हिंदु राष्ट्र होईल. तुम्ही पुनरावलोकन करा, संपर्कात रहा, सहभाग दर्शवा असही ते म्हणाले आहेत.

राजकारणाचे दुसरे नाव राजधर्म आहे - स्वामी निश्चलानंद सरस्वतीजी महाराज म्हणाले की, " उन्मादाचे नाव, सत्तेचा उपभोग घेण्याचे नाव, फूट पाडा आणि राज्य करा या मुत्सद्देगिरीचे नाव राजकारण नाही. राजकारण म्हणजे धोरणांमध्ये सर्वोत्तम, ज्याद्वारे व्यक्ती आणि समाज बुद्धिमान, स्वावलंबी आणि सुसंस्कृत बनवता येतो या राजकारण म्हणू शकतो.

उन्माद, अदूरदर्शीपणाचे नाव राजकारण नाही - महाभारत, मत्स्य पुराण, अग्नी पुराणात म्हटले आहे, की राजकारणाचे दुसरे नाव राजधर्म आहे. नीती आणि धर्म हे समानार्थी शब्द आहेत. हिंदू किंवा सनातनी कोणताही शब्द चांगला आहे.

शंकराचार्य महाराज म्हणाले की, आज हिंदू म्हणू लागले आहेत, पूर्वी फक्त सनातनी म्हणायचे. सनातनी, वैदिक, आर्य, हिंदू हे चारही वापरू शकतात. हिंदी महासागर, हिंदकुट, हिंदी, हिंदू हे सर्व प्राचीन शब्द आहेत. हिंदू हा शब्द पुराणात, ऋग्वेदातही वापरला आहे. एका प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले की, जिथे हिंसाचार होतो तिथे आम्ही त्याचे समर्थन करत नाही असही ते म्हणाले आहेत.

हेही वाचा - Mumbai High Court : उच्च न्यायालयात माजी सैनिकाचा नस कापून घेत आत्महत्येचा प्रयत्न

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.