ETV Bharat / bharat

Baba Ramdev : बाबा रामदेव 2024 मध्ये कोणाला पाठिंबा देणार?, म्हणाले, 'जो पक्ष..' - रामदेव बाबा

योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, 'त्यांना कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. जो पक्ष सनातन धर्माला पुढे नेईल आणि भारताचे भविष्य सुधारेल, त्या पक्षाला मी पाठिंबा देणार'. ईटीव्ही भारतच्या वरिष्ठ प्रतिनिधी अनामिका रत्ना यांच्याशी विशेष संवाद साधताना बाबा रामदेव यांनी आणखी काय सांगितले ते जाणून घ्या.

Baba Ramdev
बाबा रामदेव
author img

By

Published : Jun 16, 2023, 10:12 PM IST

पहा काय म्हणाले बाबा रामदेव

नवी दिल्ली : योगगुरू बाबा रामदेव म्हणाले की, 'मला ना खासदार व्हायचे आहे आणि ना आमदार. मला कोणतीही राजकीय महत्वाकांक्षा नाही. जे देशाचे निर्माण करतील त्यांना माझे पूर्ण सहकार्य असेल.'

'आयुष्यात संघर्ष नाही तर जगायचे कशाला?' : एका योगगुरूने मोठमोठ्या बहुराष्ट्रीय कंपन्या आणि आयुर्वेदिक औषध कंपन्यांना कसे अडचणीत आणले?, या प्रश्नावर बाबा रामदेव म्हणाले की, 'काही लोक मोठ्या कामाची सुरुवात करताना संकोच करतात की काही गडबड होईल. पण मी त्यांना सुरुवातीपासूनच आव्हाने म्हणून पाहिले आहे. तेव्हापासूनच मी संघर्ष करत आहे.' बाबा रामदेव म्हणाले की, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात संघर्ष असतो. त्याने त्यापासून पळून जाऊ नये. ज्याच्या आयुष्यात संघर्ष नाही त्याने जगायचे कशाला? तो मेल्यासारखा आहे.'

'भारताला जागतिक गुरू बनवायचे आहे' : भारतातील प्रत्येक मुलापर्यंत योग पोहोचवण्याचे श्रेय त्यांना जाते, यावर ते म्हणाले की, यासाठी त्यांना खूप अडथळे पार करावे लागले. बाबा रामदेव म्हणाले की, ते संन्यासी होते. त्यांच्याकडे एक पैसाही नव्हता. त्यांनी आणि आचार्य बालकृष्ण यांनी 30 वर्षे लढलेला संघर्ष, त्यांना झालेला त्रास मीडियाने पाहिला आहे. देवाने आपल्यावर जी जबाबदारी दिली आहे, ती आपल्याला पूर्ण प्रामाणिकपणे पार पाडायची आहे, असे ते म्हणाले. ते म्हणाले की, आम्हाला भारताला आर्थिक आणि सामरिकदृष्ट्या जागतिक गुरू बनवायचे आहे.

'आमचे उत्पादने 100 टक्के नैसर्गिक' : पतंजलीच्या उत्पादनांमध्ये केमिकल नाही, यावर बाबा रामदेव म्हणाले की, 'सिंथेटिक गोष्टी खाऊन लोक हृदयविकाराचे रुग्ण होत आहेत. लोकांची किडनी आणि यकृत खराब होत आहे. आम्ही बनवलेले प्रोटीन 100 टक्के नैसर्गिक आहे. व्हिटॅमिन बी 12 आणि आयुर्वेदिक गोष्टींचा त्यात मोठा समावेश आहे. त्यात प्रथिने असतात पण ते रसायन सर्वोत्तम नसते.'

'एक कोटी लोकांना योगासनांसाठी तयार करण्याचा संकल्प' : वाढत्या हृदयविकाराच्या घटनांवर कोणती खबरदारी घेण्याचा सल्ला देतील?, यावर बाबा रामदेव म्हणाले की, 'मी यंदाच्या योग दिनाची थीम 'सर्वांसाठी योग' अशी ठेवली आहे. योगाद्वारे आपण आपले तुटलेले शरीर आणि मन सुधारू शकतो'. ते म्हणाले की, तुम्ही जिममध्ये गेलात तरी योगासने केलीच पाहिजेत. ते म्हणाले की, एक कोटी लोकांना योगासने करण्यास तयार करण्याचा माझा संकल्प आहे.

'लोकसंख्या नियंत्रण कायदा आलाच पाहिजे' : लोकसंख्या नियंत्रण कायद्यावर रामदेव बाबा म्हणाले की, हा कायदा आलाच पाहिजे. हा कायदा आता आणण्याची गरज आहे. यावर उत्तराखंडमध्येही पुढाकार घेण्यात आला आहे, ही चांगली बाब आहे. ते म्हणाले की, 'उत्तराखंडचे मुख्यमंत्री चांगले काम करत आहेत आणि हा कायदा राष्ट्रीय स्तरावरही यावा अशी आमची इच्छा आहे.'

'यांना भरचौकात फाशी द्या' : लव्ह जिहादच्या घटनांवर रामदेव बाबा म्हणाले की, जिहादशी प्रेमाचा काहीही संबंध नाही. जिथे प्रेम असेल तिथे जिहाद होणार नाही. काही खोटे बोलणारे त्यांची नावे बदलतात, मुलींना त्यांच्याशी संबंध ठेवायला लावतात आणि नंतर त्यांचे तुकडे करतात. अशा लोकांना चौकात सार्वजनिक फाशीची शिक्षा द्यायला हवी, जेणेकरून अशा लोकांच्या मनात भीती निर्माण होईल, असे ते म्हणाले.

2024 मध्ये कोणाला समर्थन? : 2024 च्या निवडणुकीत बाबा रामदेव कोणत्या राजकीय पक्षाला पाठिंबा देणार? या प्रश्नावर ते म्हणाले की, जो सनातन धर्मासोबत आहे, जो राष्ट्रधर्माच्या पाठीशी आहे, ज्याला चांगल्या हेतूने देशाचे नेतृत्व करायचे आहे, ते त्यांच्यासोबत असतील. ते म्हणाले की, ना ते कोणाचे गुलाम आहे, ना कोणाचे चाटुकार. त्यांना आमदार बनायचे नाही. जे देशाचे निर्माते असतील त्यांना त्यांचा पूर्ण पाठिंबा मिळेल, असे ते म्हणाले.

हेही वाचा :

  1. Baba Ramdev : रामदेव बाबा यांचे खळबळजनक वक्तव्य ; म्हणाले, 'देशातील 90 टक्के राजकारणी..'
  2. International Yoga Day:सायकलवर आयुर्वेदिक औषधे विकणारे कसे झाले योगगुरू?, वाचा ETV'भारतचा खास रिपोर्ट

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.