ETV Bharat / bharat

ग्रेटर हैदराबाद मनपा निवडणूक निकाल : टीआरएस 55, भाजप 48 जागांवर विजयी; गृहमंत्री अमित शाहांनी मानले आभार - GHMC elections 2020

Hyderabad civic poll results: Counting of votes to begin at 8 am
हैदराबाद महापालिका निवडणुकीचा आज निकाल..
author img

By

Published : Dec 4, 2020, 7:03 AM IST

Updated : Dec 4, 2020, 10:48 PM IST

22:45 December 04

'4 ते 41 पर्यंत. जर हा विजय नसेल तर दुसरे काहीच नाही. आम्ही जनतेचा विश्वास जिंकला आहे. आम्हाला मतदारांच्या हृदयात मार्ग सापडला आहे'. - खुशबू सुंदर, भाजप नेत्या.

22:41 December 04

हैदराबाद निवडणुकीचा निकाल लोकशाही राजकारणाचा आणि सर्वसमावेशक विकासाच्या राजकारणाचा विजय आहे - भुपेंदर यादव, भाजप नेते.

22:40 December 04

अंतिम निकाल 

  • टीआरएस - 55
  • भाजप - 48
  • एमआयएम - 44

एकूण जागा - 149

तेलंगणा उच्च न्यायालयाचे आदेशानुसार, नेरेदमेट येथील मतमोजणी थांबविण्यात आली आहे. 

21:24 December 04

गृहमंत्री अमित शाह यांच्याकडून भाजप कार्यकर्त्यांचे अभिनंदन. ते म्हणाले, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवल्याबद्दल तेलंगणाच्या जनतेचे आभार. भाजपच्या /e आश्चर्यकारक कामगिरीबद्दल भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, तेलंगणा भाजपचे अध्यक्ष संजय बंडी यांचेही अभिनंदन. तसेच तेलंगणातील भाजप कार्यकर्त्यांच्या परिश्रमांचे कौतुक करतो'.

21:16 December 04

भाजप एक मजबूत पक्ष म्हणून उदयास आला - जी. किशन रेड्डी (केंद्रीय गृहराज्यमंत्री)

21:15 December 04

आम्हाला अशा स्वरुपाच्या निकालाची अपेक्षा नव्हती. आम्हाला 20-25 जागा कमी मिळाल्या. - केटीआर, टीआरएस पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष

21:15 December 04

टीआरएस 55 जागांवर विजयी. तर भाजप अजूनही 4 जागांवर आघाडीवर. 

20:27 December 04

भाजपने 43 जागा जिंकल्या असून आणखी 4 जागांवर भाजप आघाडीवर आहे. तर आतापर्यंत टीआरएसने 55 जागांवर विजय मिळवला आहे. 

19:52 December 04

भाजप आणि एमआयएममध्ये जोरदार संघर्ष. दोन्ही पक्षांनी 43 जागा जिंकल्या आहेत.

19:47 December 04

महापालिकेच्या निवडणुकीतील काँग्रेस पक्षाच्या सुमार कामगिरीनंतर तेलंगणा काँग्रेस कमिटीचे प्रमुख उत्तम कुमार रेड्डी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. आतापर्यंत काँग्रेसने फक्त दोन जागा जिंकल्या असून टीआरएस, भाजप आणि एमआयएमच्या तुलनेत काँग्रेसची कामगिरी सुमार राहिली आहे. 

19:30 December 04

  • ताज्या हाती आलेल्या कलानुसार, टीआरएस 53 जागांवर विजयी तर 2 जागांवर आघाडीवर.
  • भाजप 43 जागांवर विजयी तर 7 जागांवर आघाडीवर.
  • तर दुसरीकडे एमआयएम 42 जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर.

18:57 December 04

  • ताज्या हाती आलेल्या कलानुसार, टीआरएस 50 जागांवर विजयी तर 5 जागांवर आघाडीवर.
  • भाजप 44 जागांवर विजयी तर 6 जागांवर आघाडीवर.
  • तर दुसरीकडे एमआयएम 41 जागांवर विजयी तर एका जागेवर आघाडीवर.

18:16 December 04

  • ताज्या हाती आलेल्या कलानुसार, टीआरएस 42 जागांवर विजयी तर 17 जागांवर आघाडीवर.
  • एमआयएम 38 जागांवर विजयी तर 4 जागांवर आघाडीवर.
  • तर दुसरीकडे भाजप 29 जागांवर विजयी तर 16 जागांवर आघाडीवर.

17:03 December 04

  • ताज्या हाती आलेल्या कलानुसार, टीआरएस 21 जागांवर विजयी तर 37 जागांवर आघाडीवर.
  • एमआयएम 24 जागांवर विजयी तर 14 जागांवर आघाडीवर.
  • तर दुसरीकडे भाजप 12 जागांवर विजयी तर 29 जागांवर आघाडीवर.

16:11 December 04

एमआयएमने 20 जागा जिंकल्या. 15 जागांवर आघाडी. 

16:10 December 04

टीआरएसने 18 जागांवर विजय मिळवला. तर 40 जागांवर आघाडी. 

16:06 December 04

भाजप 7 जागांवर विजयी. तर 34 जागांवर आघाडी. 

15:23 December 04

भाजपची 40 जागांवर तर काँग्रेस 2 जागांवर आघाडीवर...

15:20 December 04

टीआरस 6 जागांवर विजयी तर 44 जागांवर आघाडीवर, तर एमआयएमने 8 जागा जिंकल्या, 22 जागांवर आघाडीवर

14:12 December 04

एमआयएम सात जागांवर विजयी, तर टीआरएसनेही खातं उघडलं..

दुपारी दोन वाजेपर्यंत हाती आलेल्या कलांनुसार, एमआयएम सात जागांवर विजयी झाले असून टीआरएसने दोन ठिकाणी बाजी मारली आहे. सध्या टीआरएस ४२, तर भाजप ३७, एमआयएम १७ आणि काँग्रेस ३ जागांवर आघाडीवर आहे.

13:29 December 04

टीआरएस-भाजपमध्ये चुरशीची लढत, तर एमआयएम चार जागांवर विजयी..

एकूण मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर टीआरएस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे. भाजप सध्या २६ तर टीआरएस २७ जागांवर पुढे आहे. दरम्यान, एमआयएम दहा जागांवर पुढे असून चार ठिकाणी त्यांचा विजय झाला आहे. तर, काँग्रेस तीन जागांवर पुढे आहे.

12:51 December 04

पोस्टल बॅलेटनंतर आता मतपत्रिकांची मोजणी सुरू..

पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीनंतर आता एकूण मतपत्रिकांच्या मोजणीस सुरुवात झाली आहे. टपाली मतपत्रिकांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत होते. मात्र, आता एकूण मतमोजणीचे कल हाती येत आहेत ज्यांमध्ये टीआरएस आणि भाजपमध्ये चुरशीची लढत दिसून येत आहे.

12:16 December 04

एमआयएमने खातं उघडलं; मेधीपटणममध्ये नोंदवला पहिला विजय..

मेधीपटणम विभागातून एमआयएमचे उमेदवार मोहम्मद मजिद हुसैन यांनी विजय मिळवला आहे. सध्या भाजप ८१, टीआरएस ३३, एमआयएम १७ तर काँग्रेस दोन जागांवर पुढे आहे.

10:55 December 04

टपाली मतांची मोजणी पूर्ण; आता मतपत्रिकांची मोजणी सुरू..

हैदराबाद महापालिका निवडणुकांसाठी टपाली मतांची मोजणी पूर्ण झाली असून, आता मतपत्रिकांची मोजणी सुरू करण्यात येणार आहे. टपाली मतांची आकडेवारी पाहता भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे.

10:42 December 04

भाजप ८५ जागांवर पुढे..

आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजप ८५, टीआरएस २९, एमआयएम १७ तर काँग्रेस दोन जागांवर पुढे आहे.

10:14 December 04

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत..

सुरुवातीच्या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसून येत आहे. आतापर्यंत भाजप ७७, टीआरएस ३१, एमआयएम १६ तर काँग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे. 

09:57 December 04

सकाळी दहा वाजेपर्यंत भाजपाचे अर्धशतक; तब्बल ६० जागांवर पुढे..

सकाळी दहा वाजेपर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार, भाजपा ६०, टीआरएस २३, एमआयएम १० तर काँग्रेस चार जागांवर आघाडीवर आहे. 

09:02 December 04

पहिल्या तासांमधील कल समोर; भाजपाची जोरदार सुरुवात..

पहिल्या तासामध्ये २९ जागांवरील कल समोर आले असून, यांपैकी तब्बल २३ जागांवर भाजपा आघाडीवर आहे. तर, सहा जागांवर टीआरएस आघाडीवर आहे.

08:28 December 04

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणी सुरू, काही वेळात येणार पहिले कल..

सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीस सुरू झाली असून, काही वेळातच पहिले कल समोर येतील. मतपत्रिकांद्वारे मतदान झाल्यामुळे मतमोजणीचा वेग कमी राहणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

06:46 December 04

हैदराबाद महापालिका निवडणुकीचा आज निकाल..

हैदराबाद : एक डिसेंबरला पार पडलेल्या हैदराबाद महापालिका निवडणुकांचा आज निकाल लागणार आहे. यासाठी थोड्याच वेळात मतमजोणीस सुरुवात होईल. या निवडणुकीसाठी महापालिकेच्या १५० प्रभागांमध्ये १,१२२ उमेदवार रिंगणात उभे होते. बॅलेट पद्धतीने मतदान झाल्यामुळे मतमोजणीस अधिक वेळ लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

केवळ ४६ टक्के झालं होतं मतदान..

कोरोना संसर्गाची भीती असल्याने नागरिकांनी मतदानाला येण्याचे टाळल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट दिसून आलं. महानगरपालिकेच्या निवडणुकीला फक्त ४६.७६ टक्के मतदान झाले. ही निवडणूक भाजपने प्रतिष्ठेची केल्याने मोठ्या संख्येने मतदान बाहेर पडतील अशी शक्यता होती. मात्र, नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले.

भाजपने महापालिका निवडणूक केली प्रतिष्ठेची..

आपली सर्व शक्ती पणाला लावत भाजपने ही निवडणूक लढवली होती. या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहही हैदराबादमध्ये आले होते. विशेष म्हणजे सत्ताधारी पक्षाचे अध्यक्ष आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांनी निवडणुकीपूर्वी एकही प्रचारसभा घेतली नव्हती.

Last Updated : Dec 4, 2020, 10:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.