ETV Bharat / bharat

Triple Talaq Case : तलाक.. तलाक.. तलाक.. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पत्नीला पत्र पाठवून घेतला काडीमोड - triple talaq over dowry

तिहेरी तलाकचे एक लाजिरवाणे प्रकरण उत्तरप्रदेशची राजधानी लखनऊमधून समोर आले ( triple talaq cases in lucknow ) आहे. तेथे पतीने हुंड्याच्या मागणी पूर्ण न केल्याने पत्नीला पत्र लिहून तिहेरी तलाक ( triple talaq over dowry ) दिला. त्यानंतर पीडित पत्नीने विभूती खांड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी पीडितेचा पती, सासरा आणि सासू यांच्याविरुद्ध गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

Triple Talaq Case
पत्नीला पत्र पाठवून घेतला काडीमोड
author img

By

Published : Apr 28, 2022, 3:08 PM IST

लखनऊ ( उत्तर प्रदेश ) : लखनऊमध्ये गोमती नगर पोलीस ठाण्यांतर्गत नवविवाहित जोडप्यामध्ये तिहेरी तलाकचे प्रकरण समोर आले ( triple talaq cases in lucknow ) आहे. हुंड्याची मागणी पूर्ण न केल्याने पतीने पत्नीला पत्र लिहून तिहेरी तलाक ( triple talaq over dowry ) दिला. त्यानंतर पीडितेने विभूती खांड पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्याची दखल घेत पोलिसांनी पीडितेचा पती करीम खान, सासरा मकबूल खान आणि सासू यांच्याविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पीडितेचा विवाह करीम खान यांचा मुलगा मकबूल खान याच्याशी पंचानन नगर तळोजा फेस वन नवी मुंबई येथे मुस्लिम विधीनुसार झाला होता. लग्नात मकबूल खानने केलेल्या मागणीनुसार पीडितेच्या वडिलांनी 12 लाख 50 हजार रुपये खर्च केले होते. मात्र त्यानंतरही पती करीम आणि त्याचे कुटुंबीय पीडितेला मारहाण करत होते. त्याचबरोबर कमी हुंडा आणला म्हणून सासू नेहमी टोमणे मारायची आणि पीडितेकडे पैशाची मागणी करायची.

पती करीम नोकरीसाठी जर्मनीला गेला होता. त्यानंतर सासूने पीडितेला मारहाण करून तिच्या माहेरी पाठवले. तेथे नियोजन केल्यानंतर 16 एप्रिल रोजी करीमने तिहेरी तलाकचे पत्र लिहून पीडितेच्या घरी पत्र पाठवले आणि नाते तुटले. हे नाते तुटू नये म्हणून पीडितेच्या कुटुंबीयांनी लाख प्रयत्न केले. मात्र, सासरचे लोक काही ऐकायला तयार नव्हते. तेव्हा पीडितेने विभूती खांड पोलीस स्टेशन गाठले. पोलिसांना घटना कथन करून तक्रार दिली. त्यावर कारवाई करत पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

विभूती खांड पोलिस स्टेशनचे प्रभारी आशिष मिश्रा यांनी सांगितले की, पीडितेने तक्रार दिली आहे की, तिच्या पतीच्या कुटुंबीयांनी मारहाण केली आणि तिला घरातून हाकलून दिले. तसेच हुंडा मागितला होता. पैसे न दिल्याने पतीने तिहेरी तलाकचे पत्र पाठवून संबंध तोडले. त्याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. हे लक्षात घेऊन, कलम 498A, 504, हुंडा बंदी कायदा, मुस्लिम महिला विवाहावरील हक्कांचे संरक्षण कलम 3, मुस्लिम महिला विवाह कायदा, 2019 कलम 4 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा : बोला आता... पोलिसानेच दिला पत्नीला तीन तलाक; 'एमपीएससी'साठी 10 लाख रुपये आणण्याचा तगादा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.