ETV Bharat / bharat

चारित्र्याच्या संशयावरून नवऱ्याने बायकोला कुत्र्यासारखे साखळीने बांधले - पत्नीवर पतीचा चारित्र्याचा संशय

पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिला लोखंडी साखळीने तब्बल तीन महिले बांधून ठेवले होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

rajasthan
पत्नीला तीन महिने ठेवले लोखंडी साखळीने बांधून
author img

By

Published : Jul 3, 2021, 4:54 PM IST

Updated : Jul 3, 2021, 5:13 PM IST

प्रतापगड(राजस्थान) - आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध असल्याच्या संशयावरुन पतीने तिला लोखंडी साखळीने तब्बल तीन महिले बांधून ठेवले होते. राजस्थानमधील प्रतापगड येते हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पत्नीला त्याच्या तावडीतून सोडवले आहे. बांधून ठेवलेल्या साखखीचे वजन तब्बल ३० किलो होते.

ई टीव्ही भारतने घेतलेला आढावा

हेही वाचा - कोव्हॅक्सिन कोरोनावर ७७.८ टक्के प्रभावी; तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष

  • पत्नीला तीन महिने ठेवले होते साखळीने बांधून -

राजस्थानमधील प्रतापगढ जिल्ह्यातल्या लालगड ग्रामपंचायतमधील एका गावात ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या गावात एका महिलेला साखळ्यांनी बांधून ठेवले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीनुसार पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. तेव्हा त्यांना ही महिला साखळ्यांनी बांधून ठेवल्याचे दिसले. तसेच साखळ्यांना कुलुपदेखील लावले होते.

  • पती हा पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता -

पोलीस अधिकारी रविंद्र सिंह हे घटनास्थळी जात त्या पीडित महिलेची सुटका केली व तिची सविस्तर विचारपूस केली. या ४० वर्षीय पीडितेने सांगितले की, पती भैरुलाल हा माझ्या चारित्र्यावर संशय घेत होता. त्यामुळे त्याने मला तीन महिन्यांपासून साखळ्यांनी बांधून ठेवले होते. आपल्या पत्नीचे विवाहबाह्य संबंध आहेत असा संशय त्याला होता. तिने सांगितलं की, ती तिच्या वृद्ध आईला शेतीच्या कामात मदत करायला जात होती. मात्र, तिथे तिचा पती दारुच्या नशेत यायचा आणि घरच्यांसमोर तिला मारहाण करात होता.

दरम्यान, पोलिसांनी त्या पीडितेची पतीच्या जाचातून सुटका केली आहे. तसेच तिला मुलाकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

हेही वाचा - Raju sapate suicide : लेबर युनियनच्या जाचाला कंटाळून कलादिग्दर्शक राजू सापतेंची आत्महत्या

Last Updated : Jul 3, 2021, 5:13 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.