होसकोटे (कर्नाटक) - होसकोटे येथील रमेश आणि अर्पिता यांचे एकमेकांवर प्रेम असून सात वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते. त्यांना सहा वर्षांचा मुलगा आणि चार वर्षांची मुलगी आहे. हे दोघेही बेंगळुरू ग्रामीण जिल्ह्यातील होसाकोटे शहरात राहत होते. मात्र गेल्या वर्षभरापासून त्यांच्यात वाद सुरू झाला. हा वाद पोलीस ठाण्यातही गेला होता. दरम्यान, दोघांनी घटस्फोटासाठी अर्ज दाखल करण्याचे मान्य केले होते. तसेच, त्यांनी दूर जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार ते वेगवेगळे जीवन जगत होते.
अर्पिता त्यांच्या आई-वडिलांसोबत राहायची गेल्या आठवड्यात पत्नी अर्पितावर संशय घेणारा रमेश तिच्याशी बोलू लागला आणि पुन्हा एकत्र राहण्याबाबत तिला बोलू लागला. या बहाण्याने शनिवारी तो तिला पिलगुंपे औद्योगिक परिसरात घेऊन गेला आणि तिच्या मानेवर आणि पोटावर अनेक वार केले ज्यामध्ये तीचा मृत्यू झाला. गर्दीच्या ठिकाणी रमेशने पत्नीवर हल्ला केल्याने या घटनेने पाहणाऱ्यांना धक्काच बसला. त्याने तिच्यावर 15 वेळा हल्ला केला आणि नंतर आत्महत्या करण्यासाठी त्याच चाकूने स्वतःला जखमी केले. त्यानंतर त्यांना होसाकोटे येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
गेल्या वर्षभरापासून रमेश आपल्या पत्नीचा छळ करत होता आणि शनिवारी तिला बोलण्यासाठी बोलावून तिच्यावर हल्ला करून गंभीर जखमी झालेल्या अर्पिताचा रविवारी मृत्यू झाला, असे बेंगळुरू ग्रामीणचे पोलीस अधीक्षक मल्लिकार्जुन बलदंडे यांनी सांगितले. आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या आरोपी पतीवर उपचार सुरू आहेत. पती-पत्नीमधील या घटनेने दोन लहान मुले अनाथ झाली आहेत.