नलगोंडा (तेलंगणा): नलगोंडा जिल्ह्यातील चिंतापल्ली मंडल केंद्रात, दोन घरांना चालू वीजबिलांमध्ये एकूण 1,75,706 रुपये इतके वीजबिल मिळाले आहे. मंडल केंद्रातील नल्लावेल्ली पुल्लैया यांच्या घराला गेल्या महिन्याच्या १६ तारखेपासून ते या महिन्याच्या ५ तारखेपर्यंत रु. ८७,३३८ चे बिल आले आहे. ( Huge Electricity Bill ) ( Nalgonda District Telangana )
नल्लावेल्ली येथील निरंजनच्या घरी 20 दिवसांत आलेल्या 8793 युनिटचे 88,368 रुपये बिल आले. दोनच बल्ब आणि एक पंखा वापरला तर एवढ्या मोठ्या प्रमाणात वीजबिल कसे येते, असा सवाल या दोन ग्राहकांकडून केला जात आहे.
![Electricity Bill](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/050822nlg11a_0608newsroom_1659765204_808.jpg)
दलितांना मोफत वीज दिल्याने अधिकाऱ्यांनी वर्षानुवर्षे रीडिंग घेतलेले नाही, अशी खंत पुल्लय्या यांचा मुलगा सैदुलू यांनी व्यक्त केली. अधिकाऱ्यांना विचारले तर ते विसंगत उत्तरे देतात, असे ते म्हणाले. 'ईटीव्ही भारत'ने एई श्रीकांत रेड्डी यांना याबाबत स्पष्टीकरण विचारले असता, त्यांनी सांगितले की, पूर्वी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांने अनेक महिने रीडिंग न घेतल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे.