ETV Bharat / bharat

हैदराबाद पोलिसांना शरण येण्याचा बाळ बोठेचा बनाव - bal bothe and mahesh bhagwat news

गुरुवारी सकाळी 10 वाजता पाटील आडनाव असलेला पुरुष भागवत यांना भेटण्यासाठी आला. त्याबाबतची चिठ्ठी मिळताच राचकोंडाच्या आयुक्तालयातील आपल्या दालनात पाठवण्यास भागवत यांनी सांगितले. तसा निरोप पोहोचण्यापूर्वीच सदर व्यक्ती बॅग घेऊन येतो, असे सांगून पोलीस आयुक्तालयातुन निघून गेला.

bal bothe
बाळ बोठे
author img

By

Published : Mar 13, 2021, 8:28 PM IST

Updated : Mar 13, 2021, 8:58 PM IST

हैदराबाद - रेखा जरे हत्या प्रकरणातील फरार आरोपी बाळ बोठे याने हैदराबाद पोलिसांना शरण येण्याचा बनाव रचला होता. राचकोंडाचे पोलीस आयुक्त महेश भागवत यांनी ही माहिती ईटीव्ही भारतशी बोलताना दिली. यासंदर्भात माहिती देताना भागवत यांनी सांगितले की, बुधवारी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक पाटील यांनी फोन करून बाळ बोठे शरण येण्याची शक्यता असल्याचे सांगितले. तत्पूर्वी बोठे हैदराबादमध्येच असल्याची खात्री झाली होती. महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागाने काही विशिष्ट फोन कॉलवरून त्याची खातरजमा केली होती.

बोठे दिली पोलीस आयुक्तालयात भेट -

गुरुवारी सकाळी 10 वाजता पाटील आडनाव असलेला पुरुष भागवत यांना भेटण्यासाठी आला. त्याबाबतची चिठ्ठी मिळताच राचकोंडाच्या आयुक्तालयातील आपल्या दालनात पाठवण्यास भागवत यांनी सांगितले. तसा निरोप पोहोचण्यापूर्वीच सदर व्यक्ती बॅग घेऊन येतो, असे सांगून पोलीस आयुक्तालयातुन निघून गेला. त्यानंतर लगेचच सीसीटीव्ही फुटेज तपासले असता तो पुरुष रिक्षातून गेल्याचे दिसले. यानंतर पोलिसांनी लगेचच संबंधित रिक्षाचालकाचा शोध घेतला. त्याची चौकशी केली असता सुरूवातीला त्याने खोटी माहिती दिली. आधी रिक्षावाल्याने लाल दरवाजा सांगितले. मात्र, पोलिसी खाक्या दाखविल्यावर त्या रिक्षावाल्याने खरी माहिती देत लाडबाजार सांगितले. तेवढ्या वेळात तो पळून गेला. दरम्यान, पोलीस आयुक्तालयात आलेल्या त्या व्यक्तीने स्वागत कक्षात दिलेल्या फोन नंबरवर आयुक्त भागवत यांनी फोन लावला. मात्र, तो नंबर बंद असल्याचे लक्षात आले.

हेही वाचा - रेखा जरे हत्याकांड : बाळ बोठेला हैदराबादमधून अटक

दुसऱ्या दिवशी म्हणजेच गुरूवारी संध्याकाळी चार वाजता त्या नंबरवरुन आयुक्त भागवत यांना फोन आला. मात्र, त्यावरून बोठेला आश्रय देणारा वकील बोलत होता. तो श्रीशैलममधून बोलत असल्याचे सांगत होता. मात्र, त्याचवेळी तो पोलिसांच्या सापळ्यात अडकत होता. याप्रकारे अहमदनगर पोलिसांनी आज सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास हैदराबादमधील एका हॉटेलमधून त्याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे त्या हॉटेलमधील रुमला बाहेरुन कुलूप लावण्यात आले होते.

अहमदनगर पोलिसांनी पूर्ण तयारी केली होतीच. त्यांना राचकोंडा पोलिसांच्या विशेष पथकाने अहमदनगर पोलिसांना वेळोवेळी मदत केली. शेवटी कुख्यात गुन्हेगारांप्रमाणे पोलिसांना गुंगारा देणारा बाळ बोठेच्या मुसक्या अहमदनगर पोलिसांनी आवळल्या. याप्रकरणी हैदराबाद पोलिसांनी केलेल्या परिश्रमाला यश आल्याबद्दल भागवत यांनी समाधान व्यक्त केले. तसेच अहमदनगर पोलिसांच्या कामगिरीचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही याप्रकरणी नगर पोलिसांना हवी ती मदत राचकोंडा पोलीस करतील, असे ईटीव्ही भारतशी बोलताना पोलीस आयुक्त भागवत यांनी स्पष्ट केले.

हेही वाचा - बदनामीच्या भीतीने झाली रेखा जरेंची हत्या; पोलीस अधीक्षकांची माहिती

Last Updated : Mar 13, 2021, 8:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.