ETV Bharat / bharat

Black Fungus चा डोळ्यांवर गंभीर परिणाम, कशामुळे अन् कोणाला होतो, काय काळजी घ्यावी.. - म्यूकरमायकोसिस लक्षणे

‘म्यूकरमायकोसिस’ हा शरीराच्या संपूर्ण अवयवांना प्रभावित करतो. मात्र, डोळ्यावर याचा सर्वांत जास्त परिणाम होतो. वेळवर जर संक्रमणाकडे लक्ष दिले नाही. तर दोन्ही डोळे काढावे लागतात. यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी हैदराबादच्या गच्चीबावली 'दिया पीडियाट्रिक ऑय केयर' च्या संचालक आणि रेनबो चिल्ड्रन रुग्णालयातील नेत्र रोग विशेषज्ञ आणि न्यूरो ऑपथेलमोलोजिस्ट डॉ सुषमा रेड्डी काटुकुरी यांच्याशी चर्चा केली.

म्यूकरमायकोसिस
म्यूकरमायकोसिस
author img

By

Published : Jun 7, 2021, 10:55 PM IST

Updated : Jun 11, 2021, 1:19 PM IST

देशात कोरोनाचा प्रसार झाला असून रुग्ण संख्या झपाट्याने वाढत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेविरोधात युद्ध सुरू असतानाच ‘म्यूकरमायकोसिस’ या आजाराचे रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणेची चिंता अधिक वाढली आहे. कोरोनामुक्त झाल्यावर ‘म्यूकरमायकोसिस’ या आजाराचा सामना रुग्णाला करावा लागत आहे. म्यूकरमायकोसिस हा धोकादायक असून याकडे दुर्लक्ष केल्यास डोळे निकामी होतात.

‘म्यूकरमायकोसिस’ हा शरीराच्या संपूर्ण अवयवांना प्रभावित करतो. मात्र, डोळ्यावर याचा सर्वांत जास्त परिणाम होतो. वेळवर जर संक्रमणाकडे लक्ष दिले नाही. तर दोन्ही डोळे काढावे लागतात. यासंदर्भात ईटीव्ही भारतच्या प्रतिनिधींनी हैदराबादच्या गच्चीबावली 'दिया पीडियाट्रिक ऑय केयर' च्या संचालक आणि रेनबो चिल्ड्रन रुग्णालयातील नेत्र रोग विशेषज्ञ आणि न्यूरो ऑपथेलमोलोजिस्ट डॉ सुषमा रेड्डी काटुकुरी यांच्याशी चर्चा केली.

हेही वाचा- Black Fungus चा खर्च १.५ कोटी, तरीही डोळे आणि दात गमावले, कराव्या लागल्या १३ शस्त्रक्रिया

काय आहे म्यूकरमायकोसिस आणि कसा पसरतो?

म्यूकरमायकोसिसला कारणीभूत जीवाणू (बुरशीचे) वातावरणात अस्तित्वात असतात. हवा, प्रदूषण, माती, खत, वनस्पती आणि दूषित फळे किंवा भाज्याच्या माध्यमातून शरीरात जातात. ज्यांची रोग प्रतिकारशक्ती कमकुवत असलेल्या लोकांना ते आपला शिकार करतात. हे जीवाणू प्रथम आमच्या सायनसमध्ये (सायनस' म्हणजे चेहऱ्याच्या आणि कवटीच्या हाडात असलेल्या हवेच्या पोकळ्या) प्रवेश करतात, त्यानंतर त्याचा डोळ्यावर परिणाम होतो. म्यूकरमायकोसिस झाल्यानंतर नाक बंद होते. नाकातून काळसर तपकिरी रंगाचा स्त्राव, चेहर्‍यावर वेदना, सूज, डोकेदुखी, दात दुखणे, त्यांचे कमकुवत होणे आणि क्रॅक होणे ही लक्षणे दिसतात.

म्यूकरमायकोसिसची कारणे...

  • शरीरात रोगप्रतिकारक शक्ती कमी असणे.
  • कोरोना संसर्गाच्या उपचारादरम्यान स्टिरॉइडच्या वापरामुळे शरीरात रक्तातील साखरेची पातळी अनियंत्रित होणे.
  • कोरोनाच्या उपचार दरम्यान दूषित ऑक्सिजनचा वापर.
  • बराच काळ अशुद्ध मास्क वापरणे.
  • औद्योगिक ऑक्सिजनच्या अत्यधिक वापरामुळे.
  • केमोथेरपी सुरू असलेले कॅन्सर रुग्ण किंवा जे डायलिसिसवर आहेत, अशा रुग्णांची​​​​​​​ रोगप्रतिकारक शक्ती कमी असते, त्यांनाही म्यूकरमायकोसिसचा धोका असतो.

म्यूकरमायकोसिसची लक्षणे कोणती?

चेहर्‍याच्या एका बाजूला सूज येणे, डोकेदुखी, नाक बंद होणे, उलट्या होणे, ताप, छातीत दुखणे, तोंडाचा वरचा भाग किंवा नाकात काळे फोड असणे हे म्यूकरमायकोसिसचे लक्षण आहे. शरीरात हे संक्रमण फार वेगाने पसरते. डोळ्यांमध्ये संसर्गाची लक्षणे दिसू लागतात. त्यावेळेस संक्रमण त्याच्या प्रगत अवस्थेत असते. यामुळे बहूतेक लोकांची दृष्टी किंवा जीव वाचविणे अवघड आहे. त्यामुळे ब्लॅक फंगसची सौम्य लक्षणे आढळल्यास तरी डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा. सुरुवातीच्या लक्षणांकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते, असे डॉ. सुषमा यांनी सांगितले.

स्टिरॉईड किती द्यावे?

  • कोरोना रुग्णांना स्टिरॉईड केव्हा द्यायचे, डोस किती द्यावा हे डॉक्टरांनी लक्षात घेतलं पाहिजे. डॉ सुषमा यांनी सांगितले, की रुग्णाला सिस्टमॅटिक अथवा ओरल प्रकारचे स्टिरॉईड देण्यात येते. रुग्णाचे वय, शारीरिक प्रकृती, स्टिरॉईडची गरज, आणि देण्याचा वेळ आदी गोष्टी लक्षात ठेवायला हव्या.
  • दिर्घकाळ स्टिरॉईडचा डोस देऊ नये.
  • सिस्टमॅटिक स्टिरॉईड फक्त हाइपोक्समिया रुग्णाला द्यावा.
  • सिस्टमॅटिक स्टिरॉईड रुग्णाला दिले, तर शरीरातील साखरेचे प्रमाण नेहमी तपासत राहावे.
  • स्टिरॉईड थेरेपीदरम्यान डेक्सामेथासोनची खुराक तसेच दोन्ही औषधांमध्ये अंतर ठेवावे.

म्युकरमायकोसिस धोकादायक का असतो?

फंगस पॅरानॅसल सायनसद्वारे मेंदूपर्यंत पोहोचतो व रुग्णाची परिस्थिती गंभीर होत जाते. यादरम्यान नाकात दुखणे, डोकेदुखी, डोळे दुखणे आणि डोळे लाल होणे हा त्रास होतो. कधी-कधी रुग्णाला स्ट्रोकचाही सामना करावा लागतो. ब्लॅक फंगस हा नाकपुड्या, सायनस, रेटिना वाहिका आणि मेंदुवर परिणाम करतो.

म्यूकरमायकोसिसपासून बचाव कसा करावा?

  • कोरोनाच्या उपचारादरम्यान ग्लाइसेमिक नियंत्रित केल्यास म्यूकरमायकोसिस टाळला जाऊ शकतो.
  • कोरोना रुग्णांवर उपचार करताना स्टिरॉइडचा वापर कमी करावा. कोविडच्या स्टिरॉइडचा वापर झालेल्या व रक्तशर्करा वाढलेल्या रुग्णांत म्यूकरमायकोसिस वाढतो. त्यामुळे स्टिरॉइडचा वापर शक्य होईल तेवढा कमी करावा.
  • देशातील लोकांचे अस्वच्छ राहणेही म्यूकरमायकोसिसला आमंत्रण देत आहे. लोक एकदा वापरलेले मास्क पुन्हा पुन्हा (न धुता) वापरत आहेत. त्यामुळे फक्त स्वच्छ मास्कचा वापर करावा.
  • जास्त धुळीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
  • कोरोना रुग्णाला ऑक्सिजन देताना काळजी घ्यावी. दूषित ऑक्सिजन कोरोना रुग्णाला जात नाही ना, याची खबरदारी घ्यावी.

Last Updated : Jun 11, 2021, 1:19 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.