ETV Bharat / bharat

वसतिगृहात विद्यार्थिनीवर तालिबानी शिक्षेचा प्रकार उघडकीस, केवळ 400 रुपयांच्या चोरीचा होता आरोप - द्यार्थिनीला चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण

घटना एक आठवडा जुनी आहे. (hostel student beaten in betul). पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनीचे नातेवाईक आपल्या मुलीला भेटण्यासाठी वसतिगृहात पोहोचले असताना वॉर्डनचा हा प्रकार उघडकीस आला. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, 400 रुपयांच्या चोरीच्या आरोपावरून तिचा छळ करण्यात आला. (punishment over 400 Rs theft).

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Dec 7, 2022, 9:16 PM IST

बैतूल (मध्य प्रदेश) : मध्य प्रदेशातील बैतूल जिल्ह्यात एका अल्पवयीन विद्यार्थिनीला वसतिगृह अधीक्षकांनी चोरीच्या आरोपाखाली तालिबानी शिक्षा दिल्याची घटना समोर आली आहे. (betul talibani punishment). जिल्ह्यातील दामजीपुरा येथील आदिवासी कल्याण विभागाच्या कस्तुरबा गांधी मुलींच्या वसतिगृहात प्रथम एका विद्यार्थिनीला चोरीच्या आरोपावरून बेदम मारहाण करण्यात आली. (hostel student beaten in betul). त्यानंतर तिला तोंडाला काळे फासून जोडे घालून नाचायला लावले. यानंतर विद्यार्थिनीला त्याच अवस्थेत वसतिगृहात नेण्यात आले. ही बाब समोर आल्यानंतर कोरकू समाज संघटना आणि मुलीच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी अमनवीर सिंह बैंस यांच्याकडे तक्रार केली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. चौकशीनंतर संबंधित कर्मचाऱ्याला निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. इकडे कोरकू समाज संघटनेनेही लवकर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे.

विद्यार्थिनीवर तालिबानी शिक्षेचा प्रकार उघडकीस

वडील भेटायला आले तेव्हा प्रकार उघडकीस : घटना एक आठवडा जुनी आहे. पाचवीच्या वर्गातील विद्यार्थिनीचे नातेवाईक आपल्या मुलीला भेटण्यासाठी वसतिगृहात पोहोचले असताना वॉर्डनचा हा प्रकार उघडकीस आला. पीडित विद्यार्थिनीने सांगितले की, 400 रुपयांच्या चोरीच्या आरोपावरून तिचा छळ करण्यात आला. या घटनेवरून मुलीच्या कुटुंबीय वसतिगृह अधीक्षकांशी बोलले असता, त्यांनी आपली चूक मान्य करून अशी पुनरावृत्ती होणार नाही, असे आश्वासन दिले.

विद्यार्थिनीवर 400 रुपये चोरल्याचा आरोप : पाचवीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीने गेल्या रविवारी ही घटना घडल्याचे सांगितले. वसतिगृह अधीक्षक सुनीता उईके यांनी पाच विद्यार्थिनींवर चोरीचा आरोप केला. ज्यामध्ये या विद्यार्थ्यीणीचाही समावेश होता. सर्वप्रथम अधीक्षकांनी तिला शूज व चप्पलेचा पुष्पहार अर्पण केला. त्यानंतर रात्री मस्करा, लिपस्टिक आणि पावडर लावली. यानंतर त्यांना डान्स करण्यास सांगितले. जेव्हा त्यांनी नाचण्यास नकार दिला तेव्हा त्यांना पुन्हा मारहाण करण्यात आली. 'आम्ही काहीही चोरले नाही, तरीही आमचा अपमान आणि छळ करण्यात आला', असा या विद्यार्थीनीचा आरोप आहे.

वसतिगृहात जायची देखील भीती : तरुणी पुढे म्हणाली की, आता मला वसतिगृहात जायलाही भीती वाटते आहे. मला आता वसतिगृहात परत जायचे नाही. रविवारीही आम्हाला खूप त्रास दिला. याबाबत घरी तक्रार केल्यास आणखी मारहाण करू, अशी धमकीही देण्यात आली. आमच्या पाच विद्यार्थिनींपैकी माझ्या वर्गातील आणखी एका मुलीला आरोपी बनवण्यात आले. याशिवाय इयत्ता सातवी आणि आठवीच्या प्रत्येकी एका विद्यार्थिनीवर अत्याचार करण्यात आला.

अधीक्षकांनी चूक मान्य केली : विद्यार्थिनीच्या वडिलांनी सांगितले की, आम्ही अधीक्षकांशी बोललो तेव्हा त्यांनी चूक मान्य केली. मात्र तरीही आम्ही या संपूर्ण प्रकरणाची तक्रार एसडीएम आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. वसतीगृहातील अशा वागणूकीबद्दल यापूर्वीही तक्रार करण्यात आली होती, मात्र अद्याप एकदाही कारवाई झाली नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.