ETV Bharat / bharat

सावळागोंधळ! पश्चिम बंगालमध्ये मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत

author img

By

Published : May 16, 2021, 8:36 PM IST

कोरोना संकटाच्या या काळात अनेक रुग्णालयात सावळागोंधळ पाहायला मिळत आहे. पश्चिम बंगालमध्ये एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याचं मृत्यू प्रमाणपत्रदेखील तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. संबंधित रुग्णांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या दफनविधीची तयारी सुरू केली होती. मात्र, थोड्याच वेळात रुग्ण जिवंत असल्याचे समोर आले. यासंदर्भात जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांनी यासंदर्भात भाष्य करण्यास नकार दिला.

पश्चिम बंगाल
पश्चिम बंगाल

कोलकाता - देशात कोरोनाचा प्रसार झपाट्याने होत असून रुग्णांचा आकडा सातत्यानं वाढत आहे. कोरोना रुग्णांच्या आकडेवारीनं सारे रेकॉर्ड ब्रेक केले. गेल्या आठवड्याभरापासून देशात दररोज कोरोनाचे तीन लाखाहून अधिक रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे आरोग्य व्यवस्थेवर खूप मोठा ताण आला आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी सावळागोंधळ पाहायला मिळत आहे.

पश्चिम बंगालच्या कल्याणी येथील नेताजी सुभाष कोविड रुग्णायालयात एक धक्कदायक घटना घडली आहे. एका जिवंत व्यक्तीला मृत घोषित करून त्याचं मृत्यू प्रमाणपत्रदेखील तयार करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. अंत्यसंस्कारासाठी जेव्हा स्मशानभूमीचे कर्मचारी मृतदेह घेण्यासाठी गेले असता. त्यांना रुग्ण जिवंत आढळला. रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे सदर तरूणाच्या नातेवाईकांना मोठा मानसिक त्रास झाला.

Hospital issues death certificate of COVID Patient in West Bengal, later found alive
मृत घोषित केलेल्या रुग्णाचे आधारकार्ड

धंतला पोलीस ठाण्यांतर्गत हिजली येथील रहिवासी असलेल्या सुब्रत कर्मकर (वय 26) यांना ताप आणि छातीत दुखत असल्याने राणाघाट उपविभागीय रुग्णालयात दाखल केले. नंतर त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना कल्याणी येथील एनएसएस कोविड हॉस्पिटलमध्ये रेफर करण्यात आले होते.

मृत घोषित केलेला रुग्ण निघाला जिवंत -

शुक्रवारी रुग्णालयाच्या अधिकार्‍यांनी कुटुंबीयांना सुब्रतचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. मृत्यू झाल्याचे सांगितल्याने कुटुंबीयांना धक्का बसला. त्याच्या अंत्यदर्शनासाठी कुटुंबीयही रुग्णालयात दाखल होते. त्यांना रुग्णालय प्राधिकरणानेही रुग्णाचे मृत्यू प्रमाणपत्रही सोपवले. सुब्रतच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी शवस्थानाचे कर्मचारी रुग्णालयात आले. तेव्हा सुब्रत त्यांना जिवंत रुग्णालयाच्या पलंगावर बसलेला आढळला. त्यानंतर प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला. देशातील अनेक रुग्णालयात पायाभूत सुविधांचा अभाव असण्यासोबतच भोंगळ कारभार सुरू असल्याचे अनेक किस्से समोर येऊ लागले आहेत.

हेही वाचा - भारत आणि ब्रिटनमध्ये आढळलेल्या स्ट्रेनवर कोव्हॅक्सिन लस प्रभावी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.