देहराडून : उत्तराखंडच्या पहाडी परिसरातील मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण करण्यासाठी तरुणानं घोड्यावर फिरतं ग्रंथालय ( Horse Library In Uttarakhand ) सुरू केलं आहे. या तरुणाच्या घोड्यावरील ग्रंथालयानं नैनितालच्या पहाडी परिसरातील अनेक चिमुकल्या मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण होत आहे. गावकरीही घोड्यावरील फिरत्या ग्रंथालयाचं कौतुक करत आहेत. शुभम बदानी असं घोड्यावर फिरतं ग्रंथालय सुरू करणाऱ्या तरुणाचं नाव आहे. शुभम बदानीनं सुरू केलेल्या घोड्यावरील फिरत्या ग्रंथालयानं वाचन चळवळीला नवसंजीवनी मिळत आहे.
बागनी, छडा आणि जलना या पहाडी गावातील काही तरुण आणि नागरिकांच्या मदतीनं घोड्यावर वाचनालय सुरू करण्यात आलं आहे. सुरुवातीच्या टप्प्यात जलना येथील कविता रावत आणि बदानी येथील सुभाष बदानी या मोहिमेसोबत जोडले गेले. आता काही तरुण आणि गावातील स्थानिक पालक देखील या मोहिमेत सामील झाले. आठवड्यातून एक दिवस एक पालक आपला घोडा वाचनालयासाठी देत आहेत. - शुभम बदानी, संचालक घोडा ग्रंथालय
ग्रंथालय करते संजीवनीचं काम : शाळेच्या सुटीत मुलं शाळेपासून दूर राहतात. त्यामुळे त्यांचा पुस्तकांशी फारसा संबंध येत नाही. मात्र मुलं जरी पुस्तकापासून दूर असली, तरी पुस्तकं मुलांपासून दूर नसतात, असं मत शुभम बदानीनं व्यक्त केलं. संकल्प युथ फाऊंडेशनच्या मदतीनं शुभम बदानीनं दुर्गम पहाडी परिसर असलेल्या बागणी, जलना, महालधुरा, आलेख, गौतिया, धिंवाखरक, बन्सी या गावांमध्ये अतिवृष्टीनंतरही पुस्तकं पोहोचवली आहेत. त्यामुळे या दुर्गम पहाडी भागात घोड्यावरील फिरतं ग्रंथालय संजीवनीचं काम करत आहे.
अतिवृष्टी, हिमवर्षावात पोहोचवली पुस्तकं : उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्यानंतर शाळांना सुटी देण्यात आली होती. त्यामुळं मुलांच्या अभ्यासावर त्याचा विपरित परिणाम होत होता. मात्र शुभम बदानीनं या मुलांना शाळा बंद झाल्यानंतर घोड्यावरील फिरत्या ग्रंथालयातून ( Horse Library In Uttarakhand ) पुस्तकं पोहोचवली. अगदी दुर्गम पहाडी परिसरातही शुभम बदानी या तरुणानं मुलांसाठी पुस्तकं पोहोचवून त्यांच्यात वाचनाची आवड जागृत ठेवली. मुलांच्या अभ्यासावर विपरित परिणाम होऊ नये, यासाठी शुभम बदानी या तरुणांनं त्याच्या सुभाष या मित्रासह पहाडी परिसरात पुस्तकं आणि शाळेचं साहित्यही पोहोचवलं आहे.
घोडा ग्रंथालयाला गावकऱ्यांची मदत : दुर्गम पहाडी परिसरातील मुलांच्या शिक्षणावर अतिवृष्टीमुळे चांगलाच परिणाम झाला होता. त्यामुळे पहाडी परिसरातील मुलांना पुस्तकं आणि शालेय साहित्य पोहोचवण्याची जबाबदारी शुभम बदानी आणि त्याच्या मित्रानं घेतली. यातूनच घोडा ग्रंथालयाची निर्मिती झाली. आता शुभम बदानी दुर्गम पहाडी परिसरातील मुलांना पुस्तकं पोहोचवत आहे. त्यामुळे गावातील नागरिकही घोडा ग्रंथालयाला मदत करत आहेत. बागनी, छडा, जलना, या दुर्गम पहाडी गावातील काही तरुणांच्या मदतीनं घोडा ग्रंथालय सुरू करण्यात आलं आहे. जलना येथील कविता रावत आणि बदानी येथील सुभाष बदानी या मोहिमेत जोडल्याचं शुभम बदानीनं यावेळी सांगितलं. त्यानंतर गावातील इतर नागरिक आणि पालकांना या मोहिमेत सामावून घेण्यात आल्याचं शुभमनं स्पष्ट केलं. आता या मोहिमेसाठी एक पालक एक दिवस आपला घोडा वाचनालयासाठी देत असल्याचंही शुभम बदानीनं यावेळी सांगितलं.
हेही वाचा :