आजच्या राशी भविष्यात जाणून घेऊ आजचा दिवस कोणत्या राशीसाठी कसा आहे. कोणत्याराशीच्या व्यक्तींचा आजचा दिवस जोडीदारा सोबत कसा जाईल, जोडीदाराची साथ कोणत्या राशीच्या व्यक्तींना मिळणार आहे. ज्या कुंडलीवरुन हे अनुमान लावण्यात आलेले आहे. ती चंद्र राशीवर अधारित आहे.
मेष राशी: सध्या चंद्र तूळ राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातव्या स्थानी असणार आहे. आज या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि सार्वजनिक क्षेत्रात प्रसिद्ध पावतील कौटुंबिक व दांपत्य जीवना साठीही आजचा दिवस समाधान देणारा आहे. जोडीदाराशी सुसंवाद साधण्याची चिन्हे आहेत.
वृषभ राशी: या राशी पासून चंद्र सहाव्या स्थानी आहे. आज बोलण्या सोबतच संयम ठेवावा लागेल. कोणाशी चेष्टा आमि गंमत करण्याच्या नादात वाद होण्याची स्थिती उत्पन्न होऊ शकते. गैरसमज निर्माण होऊ शकतो. मौज मजा करमणूकीवर खर्च होउ शकतो. प्रकृतीकडे लक्ष द्यावे मनावर ताबा ठेवावा.
मिथुन राशी: या राशिसाठी आज सर्वच क्षेत्रात लाभाचा आणि भाग्याचा दिवस आहे. कौटुंबिक सुख शांती राहणार आहे. पत्नीसाठी थोडा खर्च करावा लागेल. अविवाहितांसाठी आनंदाची बातमी आहे. त्यांचे विवाह जुळण्याचे योग दिसत आहेत. नौकरी व्यवसाय तसेच उत्पन्न वाढेल, घरात शुभकार्य घडेल प्रिय व्यक्तीचा सहवास आनंददायी ठरेल अशी ग्रहस्थिती आहे.
कर्क राशी: या राशीच्या व्यक्तिंच्या आजच्या दिवसात शाररीक आणि मानसिक स्वास्थ थोडे कमी राहण्याची तसेच पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवू शकतो. कुटुंबात मतभेत उत्पन्न करणारी ग्रह स्थिती आहे. एखादी स्त्री अथवा आपल्या बोलण्यामुळे आपल्यावर एखादे संकट उभे राहू नये याची काळजी घ्या भोजन आणि झोप दोन्हीकडे लक्ष द्या.
सिंह राशी: या राशीच्या व्यक्तिंच्या शरीरात चैतन्य राहील तसेच मनाच्या प्रसन्नतेचा अनुभव येईल. मित्रां बरोबर अधिक घनिष्टता अनुभवाल. मित्र किंवा स्वजनांसोबत एखादी सहल करण्या सोबत आर्थिक फायदा होईल प्रिय व्यक्तिचा सहवास मनाला आनंद देईल अशी ग्रहस्थिती आहे. आज नशिबाची साथ मिळेल त्यामुळे नवीन काम किंवा योजना स्वीकारण्यास अनुकुल परस्थिती आहे.
कन्या राशी: या राशींच्या व्यक्तिंसाठी आजचा दिवस कोटुंबिक सुख शांती सोबतच आनंद देणारा आहे. आपल्या मधुर वाणीचा प्रभाव आज इतरांना प्रभावित करु शकतो, मिष्टांन्नासह आवडीचे भोजन मिळेल. आयात निर्यात व्यापारात चांगले यश मिळेल अशी ग्रहस्थिती आहे. मात्र वाद विवाद, चर्चा आणि उग्रता दाखवू नका.
तूळ राशी : या राशीच्या व्यक्तिंची रचनात्मक शक्ती आज प्रकट होउ शकते. सोबतच सृजनात्मकताही दिसून येईल. वैचारिक दृढता दिसेल. या मुळे कामे सफल बनतील. वस्त्रालंकार, मौज मजेची साधने तसेच मनोरंजनासाठी पैसे खर्च होण्याची ग्रहस्थिती आहे. पण आत्मविश्वास वाढेल आणि जिवनसाथी किंवा प्रिय व्यक्तिचा सहवास रोमांचक व आनंददायी राहू शकतो.
वृश्चिक राशी : याराशीच्या व्यक्तींचा पैसा आणि वेळही आज हौसमौज आणि मनोरंजनासाठी खर्च होणार आहे. स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागु शकते. मनाला एखादी चिंता सतावू शकते. कुटुंबीय किंवा आप्त स्वकियांसोबत गैरसमज किंवा मतभेद होउ नये याचि काळजी घ्या. सोबत कोर्ट - कचेरीच्या कामातही सावधानता बाळगा प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही अशी ग्रहस्थिती आहे.
धनु राशी : चंद्र तूळ राशीत आहे. आज आर्थिक लाभ सोबतच सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देऊ शकणारा दिवस आहे. कौटुंबिक जीवनातही सुख आनंद अनुभवता येईल. मिळकतीत आणि व्यापारात लाभ होऊ शकतो. प्रिय व्यक्तिच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल अशी ग्रहस्थिती आहे. मित्रांसह पर्यटनाला जाण्याचे योग आहेत. विवाहोत्सुकांसाठीही दिवस चांगला आहे. पत्नी किंवा संतती
धनु राशी : चंद्र तूळ राशीस स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस धन लाभ तसेच प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनातही सुख अनुभवू शकता. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवू शकतो.
मकर राशी : या राशीच्या व्यक्तिना धन मान व प्रतिष्ठा वाढेल अशी ग्रहस्थिती आहे. व्यापारासाठी धावपळ व वसुलीसाठी प्रवासातून फायदा मिळण्याची शक्यता आहे. वरिष्ठ आपल्या कामावर खूश होतील त्यातुन तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यापारी किंवा इतर कामासाठी धावपळ होऊ शकते यासाठी प्रवास करावा लागू शकतो त्यातुन फायदा होईल अशी ग्रह स्थिती आहे.
कुंभ राशी : या राशीच्या व्यक्तींना आज थोडे शारीरिक दृष्या अस्वस्थता जाणवण्याची शक्यता आहे. मात्र असे असलेतरी मानसिक दृष्ट्या स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहू शकतो. त्यामुळे नौकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज मजा तसेच सहलीसाठी खर्च होऊ शकतो. प्रतिस्पर्ध्यांसोबत चर्चेत सहभागी होण्याचे टाळा.
मीन राशी : ग्रहस्थिती नुसार या राशीच्या व्यक्तिनी आज सावधगीरी बाळगण्याची आवश्यकता आहे. त्यांनी अवैध कामापासून दूर रहावे. राग तसेच आपल्या वाणीवर संयम ठेवावा लागेल. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. सरकार विरोधी कृत्यासूनही दूर रहावे. प्रकृतीच्या देखभालीसाठी पैसा खर्च करावा लागेल. मानसिक बेचैनी जाणवू शकते. कुटुंबियांशी असणाऱ्या संबंधात नकारात्मकता येऊ देऊ नका.
हेही वाचा : Shubh Muhurt 2023 : हिंदू धर्मात शुभ मुहूर्ताचे महत्त्व, मार्च महिन्यातील शुभ मुहूर्त