या राशीभविष्यात आपण जाणून घेणार आहोत की, आज कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल, कुठे हात सोडता येतील. आजची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला जाणून घेऊया, तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट जानेवारीच्या दैनिक कुंडलीत उद्याचे राशीभविष्य. 21 जानेवारी 2023 .
मेष : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. शारीरिक थकवा जाणवेल. आज शक्यतो प्रवास टाळावा. हट्टीपणा सोडून द्यावा. पोटाच्या तक्रारी उदभवतील, तेव्हा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संततीची काळजी राहील. कामात यश लाभेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबीयांसाठी वेळ देऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांच्याशी मतभेद होण्याची शक्यता आहे.
वृषभ : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. पैतृक संपत्ती पासून लाभ संभवतात.वडील आपणांशी खूप चांगल्या रीतीने वागतील. खेळाडू व कलाकारांसाठी आजचा दिवस उत्तम आहे. त्यांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळेल. संततीसाठी खर्च करावा लागेल.
मिथुन : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस आनंददायी आहे. भावंडे, मित्र, शेजारी ह्यांच्याशी संबंध चांगले राहतील. आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल. गुंतवणूक करताना विचारपूर्वकच पैसे गुंतवावेत. मनाच्या चंचलतेमुळे विचार सतत बदलतील. तन - मनाला स्फूर्ती लाभेल. नवीन कामाचा आरंभ करण्यास दिवस अनुकूल आहे. विरोधकांना नामोहरम करू शकाल. नशीबाची साथ लाभेल.
कर्क : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. मनात मरगळ राहील. केलेल्या कामाचे समाधान वाटणार नाही. प्रकृती ठीक राहणार नाही. उजव्या डोळ्याला त्रास होण्याची शक्यता आहे. कुटुंबात मतभेद होतील. मानसिक दृष्टीकोन नकारात्मक राहील. विद्यार्थ्यांना शिक्षणात अडचणी येतील. सर्व प्रकारच्या अवैध बाबींपासून दूर राहणे हितावह राहील. खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल.
सिंह : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रत्येक काम दृढ विश्वासाने पूर्ण करू शकाल. सरकारी कामात यश मिळेल. वडील व वडीलधार्यांचे सहकार्य लाभेल. सामाजिक क्षेत्रात मान - सन्मान होतील. उतावीळपणा सोडावा लागेल. काही कारणाने आपला संताप वाढेल. पोटदुखीचा त्रास संभवत असल्याने खाण्या - पिण्याकडे लक्ष द्यावे लागेल. पूर्ण दिवस आनंदात जाईल.
कन्या :आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. दिवसभर शारीरिक व मानसिक चिंतेच्या दडपणाखाली राहाल. आज कोणाशीही अहंपणामुळे वाद होणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. कोर्ट-कचेरी संबंधी कामात सावध राहावे लागेल. अचानकपणे खर्च उदभवतील. मित्रांचे गैरसमज होणार नाहीत ह्याची काळजी घ्यावी लागेल. धार्मिक कार्यावर खर्च होईल. शांत चित्ताने काम करा. संतापामुळे कामात व्यत्यय येईल. मानसिक बेचैनी जाणवेल. तब्बेतीकडे लक्ष द्यावे लागेल. नोकरीत हाताखाली काम करणार्यां पासून सावध राहावे.
तूळ : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विविध स्तरांवर लाभ संभवतात. मित्रांच्या भेटी होऊन एखाद्या रमणीय स्थळी सहलीला जाऊ शकाल. घरात पत्नी व संतती ह्यांच्या कडून काही सुखद बातमी मिळेल. धनप्राप्ती संभवते. प्राप्तीत वाढ होईल. व्यापारी वर्गाला चांगला लाभ होईल. एखाद्या स्त्रीमुळे फायदा होईल. मनासारखे वैवाहिक सौख्य उपभोगू शकाल.
वृश्चिक : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंद व उल्हास राहील. सर्व कामे विना विलंब पूर्ण होतील. मान-सन्मान होतील. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. तब्बेत उत्तम राहील. धनलाभ संभवतो. व्यापारासाठी प्रवास करावा लागेल. मित्र व संबंधितां कडून लाभ होतील. संततीची समाधान कारक प्रगती होईल.
धनु : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज प्रवासात अडचणी येतील. शरीरास थकवा जाणवेल. प्रकृती सुद्धा नरम गरम राहील. मनात चिंता व व्याकुळता राहील. संतती विषयी काळजी वाटेल. व्यवसायात अडचणी येतील. नशीबाची साथ मिळणार नाही. जोखमीच्या कामा पासून शक्यतो दूर राहावे. कार्य साफल्य होणे कठीण आहे. वरिष्ठांशी संघर्ष होतील. प्रतिस्पर्ध्यांशी वाद संभवतात.
मकर : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात परिस्थिती अनुकूल राहील. कार्यालयीन कामे कौशल्य पूर्वक कराल. व्यावहारिक व सामाजिक कामासाठी प्रवास करण्याची संधी मिळेल. खाणे- पिणे, हिंडणे- फिरणे ह्याकडे लक्ष राहील. अचानकपणे खर्च उदभवतील. भागीदारीत मतभेद संभवतात. गुडघेदुखीचा त्रास संभवतो. संताप व नकारात्मक विचारां पासून दूर राहणे हितावह राहील. नवीन काम सुरू करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही.
कुंभ : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. जवळचा प्रवास किंवा आनंददायी पर्यटन कराल. स्वादिष्ट भोजन व नवी वस्त्रे ह्यामुळे मन प्रसन्न राहील. विवाहितांना वैवाहिक सुख चांगले मिळेल. सामाजिक मान - सन्मानात वाढ होईल. वाहनसुख मिळेल. भागीदारीत लाभ होईल.
मीन : आज चंद्र सिंह राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. दैनिक कामे सुरळीतपणे पार पडतील. प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवाल. स्वभाव उतावळा बनेल. बोलण्यात मर्यादा व वर्तनात नम्रता ठेवावी. स्त्रियांना माहेरहून एखादी चांगली बातमी मिळेल. सहकारी व नोकरांचे अपेक्षित सहकार्य मिळेल.