मुंबई : जन्मकुंडलीतील उद्या 2 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा उद्याचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, उद्याचे राशी भविष्य.
मेष : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र तिसऱ्या भावात असणार आहे. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ कराल. जलदगतीने विचारात बदल झाल्याने मनाची द्विधा अवस्था होईल. आज नोकरीसह व्यवसायातही स्पर्धेला तोंड द्यावे लागणार आहे. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवणे हिताचे राहील.
वृषभ : आज चंद्र मिथून राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र दुसऱ्या भावात असणार आहे. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. वादविवाद किंवा चर्चेत आपल्या हटवादीपणामुळे संघर्षाची शक्यता आहे. आपल्या वाकचातुर्यामुळे इतरांना शांत करू शकाल. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.
मिथुन : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. मित्र व प्रिय व्यक्ति कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.
कर्क : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशीपासून चंद्र बारावा भावात असणार आहे. आज मानसिक अस्वस्थता जाणवेल. त्यामुळे आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संबंधितांचे गैरसमज झाल्याने आपण व्यथित व्हाल. कौटुंबिक बाबींवर खर्च होईल. शक्यतो वाद टाळावेत. एखादी समस्या त्वरित सोडवण्याचा प्रयत्न करावा लागेल. एखादा अपघात संभवतो. कोणतेही कृत्य विचार पूर्वकच करावे. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. खर्चात वाढ होईल.
सिंह : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात भावात असणार आहे. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. मित्रांसह सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. एखादा धनलाभ संभवतो.
कन्या : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात भावात असणार आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नवीन कार्यात यशस्वी होऊ शकाल. व्यापारी व नोकरदार वर्गासाठी आजचा दिवस लाभदायी आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. आर्थिक लाभ संभवतात. मान - सन्मान होतील. वडिलाकडून फायदा संभवतो. कौटुंबिक वातावरण आनंदाचे राहील. आरोग्य उत्तम राहील. सरकारी कामे होतील. सरकारकडून फायदा होईल. कामासाठी बाहेरगावी जावे लागेल. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.
तूळ : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात भावात असणार आहे. आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रां कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संतती विषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधकांशी वाद संभवतात.
वृश्चिक : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात भावात असणार आहे. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. नवे संबंध विचार पूर्वक जोडा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनःशांतीसाठी प्रयत्नशील राहावे.
धनू : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा भावात असणार आहे. आजचा दिवस आनंददायी व समाधान मिळवून देणारा आहे. मनोरंजन, मेजवानी, सहल, प्रवास, मित्र व प्रिय व्यक्तीचा सहवास तसेच सुंदर वस्त्र लाभ हि आजच्या दिवसाचे वैशिष्ठय असेल. प्रिय व्यक्तीशी प्रेमालाप करू शकाल. लेखन कार्यास आजचा दिवस अनुकूल आहे. बौद्धिक विचारांची देवाण घेवाण होईल. भागीदारीत फायदा होईल. नांवलौलिक होऊ शकेल. वैवाहिक सुखाचा आनंद उपभोगता येईल.
मकर : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा भावात असणार आहे. आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.
कुंभ : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा भावात असणार आहे. आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.
मीन : आज चंद्र मिथुन राशीत स्थित आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा भावात असणार आहे. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियां बरोबरचे संबंध हानिकारक सिद्ध होतील.