मेष राशी : आठवड्याची सुरवात खूपच छान होईल. तसे पाहता, विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील तणावामुळे काहीसे त्रासलेले दिसतील. ते आपल्या एखादया मित्रास त्या विषयी सांगून आपले मन हलके करतील. प्रेमीजन मात्र खूप दुखी असल्याचे दिसून येईल. ग्रहस्थितीमुळे त्यांच्या प्रणयी जीवनात कटुता येण्याची संभावना असल्याने त्यांनी सावध राहावे. आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित कराल. त्यासाठी आपणास सहकाऱ्यांचे सुद्धा सहकार्य मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या बुद्धिमत्तेचा उपयोग करतील, त्यामुळे त्यांना देण्यात आलेले काम ते वेळेवर पूर्ण करू शकतील. व्यापाऱ्यांना आयात - निर्यातीचे काम करण्यात यश मिळू शकते. हा आठवडा व्यापार वृद्धीसाठी अनुकूल आहे. विद्यार्थ्यांना तणावाचा सामना करावा लागेल. त्यांना खूप मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ - उतार येतील. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे सुरवातीचे तीन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृषभ राशी : ह्या आठवड्यात आपला आत्मविश्वास उंचावेल. विवाहितांच्या वैवाहिक जीवनातील तणाव निवळतील. आपण आपल्या जोडीदारासाठी वेळ काढू शकाल. आपले प्रणयी जीवन अत्यंत रोमँटिक होईल. प्रेमिकेशी आंतरिक संबंधात वाढ झाल्याची जाणीव होईल. एकमेकांप्रती आकर्षण सुद्धा वाढेल. आपण प्रेमिके समोर विवाहाचा प्रस्ताव सुद्धा ठेवू शकाल. ह्या आठवड्यात आपल्या हाती एखादा नवीन व्यापारी सौदा लागण्याची संभावना आहे. कामा निमित्त आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल. त्यामुळे आपणास लाभ होत असल्याचे सुद्धा जाणवेल. नोकरी करणाऱ्यांना काही समस्यांना सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे. आपला अति आत्मविश्वास आपल्या विरुद्ध जाण्याची संभावना आहे. अशा परिस्थितीत आपल्या विरुद्ध एखादी शिस्तभंगाची कारवाई सुद्धा होऊ शकते. तेव्हा सावध राहावे. आपल्या प्राप्तीत मात्र मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल. आपल्यातील एखादी सुप्त कला बाहेर पडण्याची संभावना आहे. त्यामुळे आपला फायदाच होईल. विद्यार्थी आपल्या नेहमीच्या अभ्यासा बरोबरच अतिरिक्त प्रवृत्तीत सहभागी होतील. त्याचा त्यांना लाभ होईल. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. आरोग्य विषयक कोणतीही मोठी समस्या होईल असे दिसत नाही. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मिथुन राशी :ह्या आठवड्याची सुरवात वेगळ्या प्रकारे होईल. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनासाठी काही नवीन स्वप्न बघतील. तसेच जोडीदारास सुद्धा एखादे काम करण्यास सांगण्याचा विचार करू शकतील. प्रणयी जीवनासाठी हा आठवडा सामान्यच आहे. आपणास आपल्या प्रेमिकेचे एखादे वेगळे स्वरूप पाहावयास मिळेल. ती आपल्या व्यावसायिक जीवनात खूप चांगली कामगिरी करेल. आपण एखादी गुप्त योजना आखाल, कि ज्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. एखाद्या चिटफंड योजनेत सुद्धा पैसा गुंतवू शकता. शेअर्स बाजारात सुद्धा आपण अत्यंत क्रियाशील राहाल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती चांगली राहील. आपली मेहनत यशस्वी होऊन आपण खूप चांगली कामगिरी करू शकाल. असे असले तरी एखाद्या गोष्टीमुळे कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा खूपच महत्वाचा असणार आहे. आपल्या काही योजनांचे परिणाम ह्या आठवड्यात आपणास मिळण्याची संभावना आहे. तेव्हा थोडा धीर धरावा व आपल्या कामातील पारदर्शकता टिकवून ठेवावी. आपण जर आपल्या करांचे मूल्यमापन करून घेतले नसेल तर ते ताबडतोब करून घ्यावे. त्याची गरज लागू शकते. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी चढ - उतारांचा आहे. त्यांच्या मनात बरेच काही विचार येतील कि ज्यामुळे अभ्यासात त्यांचे लक्ष लागू शकणार नाही. हा आठवडा प्रकृतीसाठी सामान्यच आहे. आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. आठवड्याचे मधले दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कर्क राशी : आठवड्याची सुरवात लहान - सहान वादाने होईल. आपणास आपल्या जोडीदाराच्या सहवासात काहीशी अस्वस्थता जाणवू शकते. ह्या आठवड्यात आपणास दोन गोष्टींकडे लक्ष द्यावे लागेल. एक आपले भांडण सासुरवाडी कडील लोकांशी न होऊ देणे व दुसरे म्हणजे आपल्या प्रकृतीच्या बाबतीत अशी परिस्थिती न येऊ देणे कि ज्यामुळे आपणास रुग्णालयात दाखल व्हावे लागेल. ग्रहांच्या कृपेने प्रेमीजन आपल्या नात्यास पुढे घेऊन जाऊ शकतील. आपल्या प्रेमिकेशी विवाहाची बोलणी सुद्धा करू शकतील. त्यासाठी तिचा होकार मिळण्याची दाट शक्यता आहे. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा अनुकूल आहे. असे असले तरी एखाद्या व्यक्तीस आपल्या विरुद्ध षडयंत्र रचण्याची संधी मिळेल अशी परिस्थिती निर्माण होणार नाही याची काळजी आपणास घ्यावी लागेल. व्यापारासाठी आठवडा चांगला आहे. आपल्या योजना यशस्वी होऊन आपणास त्यांचे फळ मिळेल. असे असले तरी कायद्या विरुद्ध कोणतेही कृत्य करणे टाळावे, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतील. ह्या आठवड्यात विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. ह्या आठवड्यात आपणास आरोग्य विषयक लहान - सहान समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तेव्हा प्रकृतीकडे दुर्लक्ष न करता वेळेवर वैद्यकीय उपचार करावे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
सिंह राशी : हा आठवडा आपल्यासाठी खूप चांगला आहे. मात्र, आपणास चिंतामुक्त व्हावे लागेल. आपल्या कल्पना शक्तीस एका बाजूस ठेवावे लागेल. काही आव्हाने येतील ज्यावर आपणास लक्ष द्यावे लागेल. विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखावह होईल. जोडीदाराशी जवळीक वाढेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. नात्यातील रोमांसा बरोबरच आंतरिक संबंधात वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना पगारवाढ मिळण्याची संभावना आहे. व्यापारी आपल्या कामात काही परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतील. ते एखादी गुंतवणूक सुद्धा करू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासावर खूप लक्ष देण्याची गरज भासेल. वेळापत्रक बनवून त्यानुसार अभ्यास करणे हितावह होईल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आरोग्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये, अन्यथा त्रास होऊ शकतो. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
कन्या राशी : हा आठवडा आपणास चांगली फळे देणारा आहे. विवाहितांना वैवाहिक जीवनाचा पूर्ण आनंद घेता येईल. जोडीदाराशी आपण उत्तम समन्वय साधू शकाल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा चांगला आहे. फक्त आपल्या प्रेमिकेचे मन दुखावेल असे कोणतेही कृत्य मात्र आपण करू नये. आपणास गृहसौख्य व वाहनसौख्य मिळेल. अचानक धनलाभ सुद्धा संभवतो. हा धनलाभ आपल्या आर्थिक स्थितीसाठी उत्तम असेल. आपल्या प्राप्तीत वाढ होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थितीत चढ - उतार येतील. आपणास आपल्या कामगिरीवर लक्ष द्यावे लागेल. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा यशस्वी होण्याचा आहे. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. स्पर्धेत सुद्धा यश मिळण्याची संभावना आहे. आरोग्याच्या दृष्टीने ह्या आठवड्यात आपणास मानसिक त्रास होईल. प्रकृतीत सुद्धा चढ - उतार येतील. आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. वाहन सुद्धा सावधपणे चालवावे लागेल. आठवड्याचा पहिला दिवस प्रवासास अनुकूल आहे.
तूळ राशी : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. व्यक्तिगत आव्हानांना बाजूस सारून कौटुंबिक व व्यावसायिक जीवनावर विशेष लक्ष देऊन ह्या दोन्ही जीवनात समन्वय साधण्याचा प्रयत्न आपण कराल. असे करण्यात आपण बहुतांशी यशस्वी सुद्धा व्हाल. ह्या आठवड्यात आपल्या मुलांच्या संगतीकडे आपणास लक्ष द्यावे लागेल. त्यांची वागणूक सुद्धा चांगली नसेल व त्याचा आपणास त्रास होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण कष्ट कराल. आपल्या बरोबर काम करणाऱ्या लोकां पासून सावध राहिल्यास व्यापारात यश प्राप्ती होईल. काही खर्च होतील. भांडवली गुंतवणूक वाढू शकते. हा आठवडा प्रणयी जीवनासाठी चांगला असला तरी अहंकारामुळे वाद होण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे. विद्यार्थ्यांना अभ्यासावर लक्ष द्यावे लागेल. त्यांच्या अध्ययनात व्यत्यय येईल, तेव्हा पूर्ण लक्ष अभ्यासावर केंद्रित करावे. आरोग्याच्या बाबतीत आपणास पोटाचे विकार होण्याची संभावना आहे. पोटात उष्णता वाढून सुद्धा त्रास होऊ शकतो. आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
वृश्चिक राशी : हा आठवडा आपल्यासाठी अनुकूल आहे. आपणास जोडीदाराचे सहकार्य मिळेल. प्रणयी जीवनासाठी तर हा आठवडा अत्यंत चांगला आहे. आपल्या नात्यात सहकार्य, समर्पण, प्रेम व रोमांस असल्याचे दिसून येईल. आपण पूर्णतः प्रेमाच्या रंगात रंगलेले दिसून येईल. आपल्या प्रेमिकेसह फिरावयास सुद्धा जाल. आठवड्याच्या सुरवातीस मित्रांशी मौजमजा करण्यात वेळ घालवू शकाल. आठवड्याची सुरवात चांगली होऊन आपण आनंदात आपली सुरवात कराल. कुटुंबात एखाद्या वयोवृद्धाची प्रकृती काहीशी त्रासदायी झाल्याने कौटुंबिक वातावरणात अशांतता निर्माण होऊ शकते. जमीन - जुमल्याशी संबंधित बाबी आपले लक्ष वेधून घेतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल असू शकतो. आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावे. इकडच्या - तिकडच्या गोष्टी टाळाव्या. आठवडा व्यापारासाठी अनुकूल आहे. विवाहित व्यक्ती वैवाहिक जीवनातील आपल्या कौटुंबिक आव्हानांवर चर्चा करून त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतील. हा आठवडा विद्यार्थ्यांसाठी अनुकूल आहे. ते आपल्या अभ्यासाचा आनंद घेऊ शकतील. ह्या आठवड्यात आरोग्याची कोणतीही मोठी समस्या नजरेस येत नसली तरी नियमितपणे आपल्या दिनचर्येचे पालन करा. आठवड्याचे सुरवातीचे दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
धनू राशी : हा आठवडा आपल्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील वातावरण आनंदाचे असेल. घरात एखादे मंगल कार्य होईल. एखाद्याचा विवाह होऊ शकतो किंवा घरात एखादी पूजा होऊ शकते. विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनात आनंदी असल्याचे दिसेल. जोडीदार आपल्याकडे एखाद्या विशेष वस्तूची मागणी करण्याची संभावना असून ती पूर्ण करण्यास आपणास खूप कष्ट करावे लागतील. परंतु, त्यात सुद्धा आपणास आनंदच होईल. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेच्या सहवासात वेळ घालवू शकाल. एकमेकांशी जवळीक वाढेल. आपण मित्रांसह फिरावयास सुद्धा जाल. नजीकच्या ठिकाणी फिरावयास जाण्याची संधी मिळेल. नोकरी करणाऱ्यांना मोठे पद मिळण्याची संभावना आहे. व्यापाऱ्यांना आपली मेहनत यशस्वी करण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल. हा आठवडा मेहनत करण्याचा आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. बँकेतील शिल्लक सुद्धा वाढू शकते. विद्यार्थ्यांना अभ्यासात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. एकाग्रता होण्यात सुद्धा त्रास होऊ शकतो. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत सुधारणा होईल. असे असले तरी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. रक्तदाबाचा त्रास किंवा एखादी दुखापत संभवते. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
मकर राशी : हा आठवडा आपल्याला आनंद देणारा आहे. एखाद्या गोष्टीमुळे मन आनंदित होईल. ह्या आठवड्यात आपण खूपच विनोदी राहाल. आपण सर्वांशी हास्य - विनोद कराल, त्यामुळे वातावरण हलके होईल. कौटुंबिक जीवनात सुद्धा आनंदाचे वातावरण राहील. जोडीदाराशी संबंध मधुर होतील. प्रणयी जीवनासाठी आठवडा सामान्यच राहील. आपण आपल्या स्वभावामुळे आपल्या प्रेमिकेच्या हृदयात जागा निर्माण करू शकाल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा नाजूकच आहे. नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. व्यापाऱ्यांना चांगला लाभ होईल. आपणास आपल्या बुद्धिमत्तेचा लाभ होऊन आपण प्रगती करू शकाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात खूप मेहनत करावी लागेल. आरोग्याच्या दृष्टीने आपणास आपल्या आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. अन्यथा आपली प्रकृती बिघडू शकते. पोटाचे किंवा दातांचे विकार संभवतात. हा संपूर्ण आठवडा प्रवासास अनुकूल आहे.
कुंभ राशी : हा आठवडा खर्चात वाढ करणारा आहे. आठवड्याच्या मध्यास चिंता काही अंशी कमी झाल्या तरी थोडा क्रोध सुद्धा होऊ शकतो. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या प्रेमिकेशी जवळीक साधू शकाल. त्यामुळे आपले संबंध दृढ होतील. विवाहितांना आपल्या वैवाहिक जीवनात समस्यांना सामोरे जावे लागू शकते. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. आपणास वरिष्ठांचा पाठिंबा सुद्धा मिळेल. त्यामुळे कामात चांगले यश मिळू शकेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा मध्यम फलदायी आहे. आपणास खर्चांवर सुद्धा नियंत्रण ठेवावे लागेल. विद्यार्थ्यांना खूप मेहनत करावी लागेल. अभ्यासात प्रगती करण्यासाठी त्यांना एखाद्या व्यक्तीच्या मार्गदर्शनाची गरज भासेल. ह्या आठवड्यात आपणास आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. चिकित्सेवर खर्च होण्याची संभावना आहे. आठवड्याचे अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
मीन राशी : हा आठवडा आपल्यासाठी उत्तम आहे. विवाहितांच्या वैवाहिक जीवनात प्रेम व रोमांस भरपूर प्रमाणात असेल. प्रणयी जीवनासाठी सुद्धा आठवडा अनुकूल आहे. आपण प्रेमळ गोष्टी करून आपल्या प्रेमिकेस वेड लावाल. आठवड्याच्या सुरवातीस एखाद्या ठिकाणाहून पैसा आल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपल्या चिंता कमी होतील. मानसिक तणाव सुद्धा कमी होतील. नोकरी करणाऱ्यांची खूप धावपळ होईल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. विद्यार्थ्यांसाठी आठवडा अनुकूल आहे. ते अभ्यासात उत्तम कामगिरी करू शकतील. समस्येतून बाहेर पडून एकाग्रचित्त करण्यात ते यशस्वी होतील. ह्या आठवड्यात आपली प्रकृती उत्तम राहील. तणावमुक्ती झाली तरी पायदुखी किंवा नेत्र विकार होण्याची संभावना आहे. आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आठवड्याचे पहिले व अखेरचे दोन दिवस प्रवासास अनुकूल आहेत.
या आठवड्याचा स्पेशल मॅजिक नंबर : आठवड्याचा स्पेशल मॅजिक नंबर ३३४४६६ आहे. लाल पेनाने उत्तर दिशेला तोंड करून पांढऱ्या कागदावर लिहा आणि जवळ ठेवा.विशेष जादूचा अंक तुमचे ग्रह मजबूत करेल आणि तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण होईल आणि संकट दूर होईल. आचार्य पी. खुराणा . साप्ताहिक राशीभविष्य .