मेष - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया लाभदायक आहे. आर्थिक लाभ होईल. जास्त लोकांच्या संपर्कात याल. व्यापारी वर्ग व्यापारवाढ व नियोजन करू शकतील. आपल्या हातून लोकहिताचे एखादे काम होईल.
वृषभ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज आपल्या बोलण्याच्या जादूने कोणी प्रभावीत होऊन आपला फायदा होईल. वाचन - लेखन ह्या सारख्या साहित्य प्रकारात अभिरुची वाढेल. विद्यार्थी अभ्यासात चांगली प्रगती करू शकतील. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभू शकेल. पोटाच्या तक्रारीने त्रस्त व्हाल.
मिथुन - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. द्विधा अवस्थेतील आपले मन महत्वाचे निर्णय घेऊ शकणार नाही. वैचारिक वादळामुळे मानसिक अस्वस्थता अनुभवाल. अधिकतम हळवेपणा आपल्या दृढतेला कमकुवत करेल. पाणी तसेच इतर प्रवाही पदार्थांपासून सावध राहा. कुटुंब किंवा जमीन या संबंधी विषयावर चर्चा किंवा प्रवास टाळा.
कर्क - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज भावंडांकडून लाभ होतील. मित्र व स्वकीयांच्या सहवासाचा आनंद लाभेल. रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे. प्रत्येक कामात यश मिळेल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. भावनेला प्राधान्य दिल्याने संबंध सुखद होतील. नशिबाची साथ मिळेल. सामाजिक व आर्थिक सन्मान होतील.
सिंह - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज विविध योजनांच्या विषयांवर अधिक विचार केल्यामुळे द्विधा अवस्था होईल. तरीही कुटुंबीयांसह चांगले वातावरण राहील्याने आपली प्रसन्नता वाढेल. अतिरिक्त खर्च संभवतात. निर्धारित कामात अपेक्षे प्रमाणे यश मिळणार नाही. एकंदरीत आजचा दिवस मध्यम आहे.
कन्या - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या लाभदायक दिवसाने वैचारिक समृद्धी वाढेल. वाकचातुर्य व मधुरवाणी ह्यांच्या साह्याने मैत्रीपूर्ण संबंध विकसीत करू शकाल. उत्तम भोजन, भेटवस्तू, वस्त्र इत्यादींची प्राप्ती होईल. आनंदाची प्राप्ती, जोडीदाराचा सहवास व प्रवास ह्यात आपला दिवस आनंदात जाईल.
तूळ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपणास क्रोधावर नियंत्रण ठेवावे लागेल. शक्यतो वाद टाळावेत. कुटुंबियांशी एखाद्या विषयावर वाद संभवतात. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. विशेषतः डोळ्यांची निगा राखावी लागेल. एखादा अपघात संभवतो. कोर्ट - कचेरीच्या प्रकरणात लक्ष घालावे लागेल. एखादी मानहानी संभवते. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहावे लागेल.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज नोकरी - व्यवसायात लाभप्राप्ती होईल. मित्रांसह गाठीभेटी, प्रवास ठरवाल. स्नेही मित्र यांच्या कडून भेटवस्तू मिळतील. वरिष्ठांची मर्जी संपादन करू शकाल. वैवाहिक जीवनात मनसोक्त आनंद उपभोगू शकाल.
धनू - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. कौटुंबिक जीवनात आनंदाची छटा पसरेल. प्रत्येक कार्यात यश मिळेल. वरिष्ठांची आपणावर मर्जी राहील. पिता व वडीलधार्यांकडून लाभाची शक्यता. व्यावसायिक क्षेत्रात प्रवास होईल. कामाचा व्याप वाढेल. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे करू शकाल.
मकर - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. संतती विषयक प्रश्न आपणाला दुःख देतील. पैश्यांचा अपव्यय होणार नाही याकडे लक्ष द्या. छोटासा प्रवास आनंददायी ठरेल. सरकारी आपत्ती येऊ शकते. प्रतिस्पर्ध्यांशी शक्यतो वाद टाळावेत.
कुंभ - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज अवैध कृत्यां पासून दूर राहावे. वाणीवर संयम ठेवल्यास पारिवारिक संघर्ष टाळू शकाल. प्रत्येक घटना व्यक्ती व वस्तू ह्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पहाल. खर्च वाढल्याने आर्थिक चणचण जाणवेल. क्रोधावर संयम ठेवा. शारीरिक व मानसिक दृष्टया अस्वास्थ्य राहील.
मीन - आज चंद्र रास बदलून कन्या राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. आजारपणावर अतिरिक्त पैसा खर्च होण्याची शक्यता आहे. कुटुंबियांशी संयमाने वागावे लागेल. मात्र, अचानक धनलाभाची शक्यता असून आपल्या मनावरचा भार काही प्रमाणात कमी होऊ शकेल. व्यापारातील वसुली होऊ शकेल.