मेष - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आजचा दिवस दूरगामी आर्थिक योजनेसाठी अनुकूल आहे. तसेच आजचा दिवस आर्थिक व व्यावसायिक दृष्टया फायदेशीर आहे. शारीरिक व मानसिक उत्साहाचा अनुभव होईल. मित्र - स्वकीयांकडून भेटवस्तू मिळतील. त्यांच्या सहवासात वेळ आनंदात जाईल. तसेच त्यांच्यासह एखादा समारंभ किंवा सहलीस जाऊ शकाल.
वृषभ - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आज वैचारिक पातळीवर थोरपणा व गोड वाणी ह्यामुळे इतरांना प्रभावित करू शकाल. तसेच त्यांच्याशी संबंधात सुसंवाद निर्माण करू शकाल. बैठका, चर्चा ह्यात सुद्धा आपणाला यश मिळेल. कष्टाचे अपेक्षित फळ मिळाले नाही तरी सुद्धा आपण त्या क्षेत्रात प्रगती पथावर राहाल. पचनसंस्थे संबंधी तक्रारी वाढून त्रास होईल. शक्यतो घरच्या खाण्याला प्राधान्य द्या. अभ्यासात गोडी वाढेल.
मिथुन - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आज मनाची स्थिती दोलायमान राहील. मन द्विधा बनेल. जादा हळवेपणा मनाला बेचैन करेल. आई विषयी अधिक भावनाशील व्हाल. बौद्धिक चर्चेचे प्रसंग येतील पण त्यात वादविवाद टाळावेत. कौटुंबिक व स्थावर संपत्ती विषयी शक्यतो चर्चा टाळावी. स्वकीय व स्नेही यांच्याशी ताण - तणाव संभवतात. शक्यतो प्रवास टाळा.
कर्क - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. शारीरिक व मानसिक उत्साहा बरोबर घरातील वातावरण सुद्धा आनंदी असेल. मित्र व स्नेहीजन ह्यांचा सहवास घडेल. मित्रां कडून लाभ होईल. मंगल कार्याची सुरूवात करायला आजचा दिवस अनुकूल आहे. कामातील यश व प्रियव्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण आनंदीत राहाल. आर्थिक लाभ होऊ शकेल. लहान सहलीस जाऊ शकाल. मान - सन्मान वाढेल.
सिंह - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आजचा दिवस कुटुंबियांसह सुख शांतीत घालवाल. त्यांचे सहकार्य मिळेल. स्त्री मित्रां कडून विशेष मदत प्राप्त होईल. दूरचे मित्र व स्नेही यांच्याशी संपर्क फायदेशीर ठरेल. आपल्या प्रभावी संभाषणाने लोकांचे लक्ष वेधून घ्याल. प्राप्ती पेक्षा खर्च जास्त होईल. उत्कृष्ट भोजन मिळेल. नियोजित कामात यश जरा कमीच मिळेल.
कन्या - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस आनंददायी असेल. शारीरिक व मानसिक दृष्टया उत्साही व प्रसन्न राहाल. आर्थिक लाभ होतील. मित्र व स्नेह्यांची भेट आनददायी राहील. प्रवास आनंददायी होईल.
तूळ - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज थोडा सुद्धा असंयम व अवैध व्यवहार आपणास अडचणीत टाकेल. एखादी दुर्घटना संभवते. बोलण्यातील शिथीलता उग्र तक्रार वाढवण्याची शक्यता आहे. सगे सोयरे ह्यांच्याशी पटणार नाही. मनोरंजन तसेच फिरण्यात पैसे खर्च होतील. भिन्नलिंगी आकर्षणात वाढ होईल. शारीरिक व मानसिक व्यग्रता कमी करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
वृश्चिक - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस लाभदायी आहे. सांसारिक सौख्य मिळेल. विवाहेच्छुकांचे विवाह जुळतील. व्यवसायात विशेष लाभ होतील. वरिष्ठांची आपल्यावर मर्जी राहील. मित्र भेटतील. तसेच रम्य स्थळी सहलीस जाण्याची शक्यता आहे.
धनू - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आज यश, कीर्ती व प्रतिष्ठा ह्यात वाढ होईल. कार्यक्षेत्रातील वरिष्ठ खूश असल्यामुळे पदोन्नतीची शक्यता आहे. स्वास्थ्य ठीक राहील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक योजना चांगल्या प्रकारे पूर्ण कराल. व्यापार - व्यवसायासाठी प्रवास घडू शकतो. इतर लोकांना मदत करण्याचा प्रयत्न कराल. वैवाहिक जीवनात माधुर्य राहील.
मकर - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस बौद्धिक कार्य किंवा साहित्य लेखन ह्यासाठी अनुकूल आहे. व्यवसायात नवे विचार प्रवाह आणल्याने आपल्या कामाला नवे स्वरूप येईल. व्यवसाय क्षेत्रातील प्रतिकूल वातावरण मनाला अस्वस्थ करेल. शारीरिक थकवा जाणवेल. संततीच्या समस्या आपणास त्रस्त करतील. व्यर्थ खर्च होईल. प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळा.
कुंभ - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज आपण नकारात्मक विचारा पासून दूर राहावे. वाद, भांडणे ह्यापासून सुद्धा दूर राहावे. राग व बोलण्यावर संयम ठेवाव. कौटुंबिक वातावरण कलुशित होईल. आर्थिक चणचण जाणवेल. खूप विचार केल्याने मानसिक थकवा जाणवेल. आपल्या मनावरचा ताण कमी करण्यासाठी प्रयत्न करावे.
मीन - आज चंद्र कन्या राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज आपण दैनंदिन कामातून बाहेर पडून सहलीसाठी किंवा मनोरंजनासाठी वेळ द्याल. सिनेमा, नाटक किंवा बाहेर भोजन करणे असा एखादा कार्यक्रम आखाल. कलाकार किंवा कारागिराना आपल्या कौशल्याचे प्रदर्शन करण्याची संधी मिळेल. आजचा दिवस व्यवसायात भागीदारीसाठी अनुकूल आहे. सार्वजनिक जीवनात मान - सन्मान होतील.