मेष - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. नवे कार्य करण्याची प्रेरणा मिळून त्याचा आरंभ सुद्धा कराल. शीघ्र गतीने विचारात बदल होऊन मनाची अवस्था द्विधा होईल. आज नोकरी - व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. निश्चित हेतूने कार्य करण्याची प्रेरणा मिळेल. छोटे प्रवास होतील. महिलांनी आज वाणीवर संयम ठेवणे हितावह राहील.
वृषभ - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दुसरा स्थानी असेल. आपली अनिर्णायकी अवस्था झाल्याने हाती आलेली सोनेरी संधी आज आपण गमावून बसाल. मनात वैचारिक गोंधळ उडाल्याने आज आपण कोणताही ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. अशा परिस्थितीत एखादे नवीन काम सुरू करणे हितावह ठरू शकणार नाही. भावंडांमध्ये प्रेमभाव राहील.
मिथुन - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या प्रथम स्थानी असेल. आज दिवसाची सुरुवात प्रफुल्लित मन व स्वस्थ चित्ताने होईल. मित्र व नातलगांसह सहभोजनाचा आनंद लुटाल. सुंदर वस्त्रे परिधान कराल. आर्थिक दृष्टया आजचा दिवस लाभदायी आहे. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. मनात नकारात्मक विचार येतील. मित्र व प्रिय व्यक्ति कडून भेटवस्तू मिळाल्याने आपण आनंदित व्हाल.
कर्क - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या बारावा स्थानी असेल. आज कुटुंबात मतभेदाचे प्रसंग उदभवतील व त्यामुळे मानसिक दृष्टया आपण अस्वस्थ राहाल. द्विधा मनःस्थिती राहिल्याने महत्वाचे निर्णय लांबणीवर टाका. कोणाशी गैरसमज किंवा वादविवाद होण्याची शक्यता आहे. स्वास्थ्याकडे दुर्लक्ष केल्याने प्रकृती बिघडेल. कोर्ट - कचेरीतील कामे जपून करा. मानहानी व धनहानी होण्याची शक्यता आहे.
सिंह - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या लाभात स्थानी असेल. आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. तरीही द्विधा मनःस्थितीमुळे हातची संधी जाण्याची शक्यता आहे. मनात विचारांचे काहूर माजेल. द्विधा मनःस्थितीमुळे नवे कार्य हाती न घेणे हितावह राहील. मित्र - मैत्रिणींचा सहवास घडेल व त्यांच्या कडून काही लाभ सुद्धा पदरी पडेल. मित्रांसह सहलीचा बेत आखाल. त्यात फायदा होईल. एखादा धनलाभ संभवतो.
कन्या - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या दशमात स्थानी असेल. आज नवीन कार्याची सुरुवात करण्या विषयी मनात आखलेल्या योजना साकार होतील. पित्याबद्दल आत्मीयता वाढेल. त्यांच्याकडून लाभ होईल. व्यापारी तथा नोकरदार आपल्या क्षेत्रांत पुढे जात राहतील. धन, मान - सन्मान वाढेल. सरकारकडून लाभ होईल. प्रकृती उत्तम राहील. कौटुंबिक जीवनात सुख शांती व सुसंवाद राहील. वसुली किंवा व्यावसायिक कामा निमित्त बाहेर जावे लागेल.
तूळ - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या भाग्यात स्थानी असेल. आज आपण बौद्धिक व लेखन कार्यात व्यस्त राहाल. आजचा दिवस नवीन कार्यारंभास शुभ फलदायी आहे. एखादा दूरचा प्रवास घडण्याची शक्यता आहे. व्यापार - व्यवसायात मोठा फायदा संभवतो. परदेशस्थ मित्रां कडून एखादी आनंददायी बातमी मिळेल. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळू शकेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. संतती विषयी द्विधा मनःस्थिती राहील. विरोधकांशी वाद संभवतात.
वृश्चिक - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शक्यतो आज नवीन कार्याची सुरुवात करु नये. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. अवैध कृत्या पासून दूर राहणे हितावह राहील. हातून एखादा राजद्रोह घडण्याची शक्यता आहे. नवे संबंध विचार पूर्वक जोडा. खर्चाचे प्रमाण वाढेल. मनःशांतीसाठी प्रयत्नशील राहावे.
धनू - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सातवा स्थानी असेल. मेजवानी, सहल, प्रवास, रुचकर भोजन, सुंदर वस्त्र धारणा ही आजच्या दिवसाची विशेषता आहे. मनोरंजन विश्वात रमून जाल. भिन्नलिंगी व्यक्तीच्या सहवासात रमून जाल. दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल. सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल. बौद्धिक, तार्किक विचार विनिमय होईल. भागीदारीत लाभ होईल.
मकर - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या सहावा स्थानी असेल. आजचा दिवस व्यापार - व्यवसायातील प्रगती व आर्थिक नियोजन यासाठी अनुकूल आहे. वसुली तसेच आर्थिक देवाण- घेवाणीत यश मिळेल. आयात - निर्यातीचा व्यापार करणार्यांना फायदा होईल. घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक लाभ होतील. कायदेशीर बाबींसंबंधी सावध राहाल. प्रकृती उत्तम राहील. विरोधकांचे प्रयास निष्प्रभ होतील.
कुंभ - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक अशांतता व उद्विग्नता यांनी भरलेला आहे. सातत्याने विचार बदलत राहतील त्यामुळे निर्णायकता असणार नाही. ठोस निर्णय घेऊ शकणार नाही. संततीचे प्रश्न बेचैन करतील. पोटाच्या तक्रारी मुळे हैराण व्हाल. कामात अपयश आल्याने निराश व्हाल. पैसा अचानक खर्च होईल. साहित्य लेखनासाठी आजचा दिवस अत्यंत अनुकूल आहे.
मीन - मिथुन राशीचा चंद्र आज आपल्या चवथा स्थानी असेल. आज दक्षता बाळगण्याची गरज आहे. कुटुंबीयांशी मतभेद होतील. आईची प्रकृती हा चिंतेचा विषय होईल. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. मानसिक उद्वेग, धनहानी व मानहानी होईल. नोकरीत समस्या उदभवतील. स्थावर मालमत्तेचे व्यवहार करताना सावधानी बाळगा. स्त्रियां बरोबरचे संबंध हानीकारक सिद्ध होतील.