ETV Bharat / bharat

20 ऑगस्ट राशीभविष्य : 'या' राशीवाल्यांना आज मानसिक अस्वस्थता जाणवेल; जाणून घ्या आजचे राशीभविष्य - horoscope for the day 20 august

कसा असेल तुमचा दिवस? अभ्यास, प्रेम, लग्न, व्यवसाय यासंदर्भातील ग्रहांची स्थिती कशी असेल? वैवाहिक जीवनात त्रासातून आराम मिळेल का? मुलांना अभ्यास करावा वाटत नाही, काय करावे? येत्या काळात परदेशात जाण्याची संधी मिळेल का? जोडीदाराबरोबर वेळ कसा घालवावा? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी, ईटीव्ही भारतवर वाचा, आजचे राशीभविष्य -

astrological prediction
astrological prediction
author img

By

Published : Aug 20, 2021, 12:02 AM IST

मेष - आज नोकरीत वरिष्ठां बरोबर महत्वाच्या विषयावर चर्चा होऊन आपण आखलेल्या योजनेला सरकार कडून फायदा होईल. कार्यालयीन कामासाठी प्रवास घडतील. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. घराच्या सजावटीकडे लक्ष द्याल व त्यात बदल करून वातावरण प्रसन्न बनवाल. व्यावहारिक दृष्टया विचार करूनच प्रत्येक कामाचा निर्णय घ्यावा. कामाच्या व्यापामुळे कामात दिरंगाई होईल. आईच्या प्रकृतीत सुधारणा होईल.

वृषभ - आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. व्यापारी आपल्या व्यापारात भांडवल घालून नवीन कामे सुरू करतील व भविष्यातील योजना ठरवतील. परदेशी प्रवास घडतील. एखाद्या प्रवासाने मन प्रसन्न झाले तरी सुद्धा प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. कामाचा व्याप वाढेल.

मिथून - आज अनियंत्रित रागाला लगाम घालावा लागेल. बदनामी व नकारात्मक विचारांपासून दूर राहणे हिताचे ठरेल. खर्च अधिक झाल्याने आर्थिक चणचण भासेल. कुटुंबीय व कार्यालयातील सहकारी यांच्याशी मतभेद किंवा वादविवादाचे प्रसंग येतील. त्यामुळे मन सुन्न राहील. आजारी व्यक्तीची नव्याने तपासणी किंवा शस्त्रक्रिया शक्यतो आज करू नका. मानसिक शांतीसाठी प्रयत्न करा.

कर्क - आजचा दिवस सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आपणाला लाभदायक ठरेल. मौज - मजेची साधने, उत्तम दागीने व वाहन खरेदी होईल. मौज - मस्ती व मनोरंजनात वेळ खर्च होईल. तसेच भिन्नलिंगी व्यक्तीचा सहवास आपणास सुखद अनुभव देईल. दांपत्य जीवनात उत्कट प्रेमाचा अनुभव येईल. भागीदारीत फायदा होईल. सहलीची शक्यता आहे.

सिंह - आज उदासीन वृत्ती व संशयाचे काळे ढग आपल्या मनाला वेढून टाकतील. त्यामुळे मनःस्वास्थ्य लाभणार नाही. तरीही घरात शांततेचे वातावरण राहील. दैनंदिन कामात जरा अडचणी येतील. खूप परिश्रम कराल. वरिष्ठांशी वाद - विवाद टाळा.

कन्या - आजचा दिवस चिंता व उद्विग्नपूर्ण असून या ना त्या कारणाने काळजी वाढवेल. विशेषतः संतती व आरोग्य विषयक जास्त चिंता वाटेल. पोटाच्या तक्रारी राहतील. विद्यार्थ्यांना ज्ञानार्जनात अडचणी येतील. अचानक धनखर्च होईल. शेअर - सट्टा यांपासून दूर राहावे. प्रिय व्यक्तीचा सहवास लाभेल.

तूळ - आज आपण खूप भावनाशील व्हाल व त्यामुळे मानसिक अस्वास्थ्य राहील. आईशी मतभेद होतील किंवा तिच्या प्रकृतीची काळजी राहील. प्रवासासाठी आजचा दिवस अनुकूल नाही. कौटुंबिक व जमीन - जुमल्या संबंधी चर्चा करताना दक्ष राहा. पाण्या पासून जपून राहा.

वृश्चिक - आजचा दिवस कार्यात यश व आर्थिक लाभ मिळवून देणारा आहे. नवीन कार्याचा आरंभ करू शकता. भावंडांशी अधिक सहयोगपूर्ण व प्रेमाचे संबंध राहतील. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत कराल. प्रिय व्यक्तीच्या सहवासाने मनाला आनंद वाटेल. जवळपासचा प्रवास होईल. आरोग्य उत्तम राहील.

धनू - आज द्विधा मनःस्थिती व घरातील बिघडलेले वातावरण यामुळे त्रास होईल. नाहक खर्च होईल. कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. महत्वाचे निर्णय घेणे हिताचे ठरणार नाही. कुटुंबियांचे गैरसमज होणार नाहीत यासाठी प्रयत्न करावे लागतील. दूरस्थ मित्र वा नातलग यांना तोंड द्यावे लागेल. त्यांच्याकडून येणार्‍या बातम्या किंवा निरोप आपणांस लाभदायक ठरतील.

मकर - आजच्या दिवसाची सुरवात मंगल वातावरणाने होईल. एखादा मांगलिक प्रसंग घडेल. कौटुंबिक जीवनात आनंदी वातावरण राहील. आपले प्रत्येक काम सहजगत्या पूर्ण होईल. मित्र व आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळतील. शारीरिक व मानसिक दृष्टया प्रसन्न राहाल. नोकरी - व्यवसायात पण अनुकूल वातावरण राहील. दांपत्य जीवनात परमानंद लाभेल. घसरणे - पडणे, जखम होणे यांपासून सावध राहा.

कुंभ - आज आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मानसिक अस्वस्थता जाणवेल. शक्यतो कोर्ट - कचेरी पासून दूर राहा. आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा. कुटुंबियांशी मतभेद होतील. एखादा अपघात संभवतो. रागावर नियंत्रण ठेवावे लागेल. पैसा खर्च होईल.

मीन - आजचा दिवस लाभदायक आहे. नोकरी - व्यवसायात उत्पन्न वाढेल. वडीलधारी व मित्रांकडून लाभ होईल. नवे मित्र मिळतील. त्यांची मैत्री भविष्यकाळात लाभदायक ठरेल. मंगलकार्यात हजेरी लावाल. मित्रांसह सहलीचे बेत आखाल. पत्नी व संततीकडून चांगल्या बातम्या मिळतील. अचानक धनलाभ होईल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.