मेष - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. वैवाहिक जीवनाच्या दृष्टीने आजचा दिवस फारच चांगला आहे. जोडीदारासह वैवाहिक जीवनाचा आनंद सुद्धा उपभोगू शकाल. आर्थिक लाभ तसेच प्रवास संभवतात. राग व अधिकार गाजविण्याची भावना वाढेल. आपल्या कामाचे कौतुक होईल. शक्यतो वाद टाळा.
वृषभ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. पूर्ण दिवस आनंद व उत्साहात जाईल. नियोजनाप्रमाणे सर्व कामे पार पडतील. आर्थिक लाभ संभवतात. आजारी लोकांचे आरोग्य सुधारेल. कार्यालयीन कामे पूर्ण होतील.
मिथुन - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आज संतती व वैवाहिक जोडीदार ह्यांच्या प्रकृतीची काळजी राहील. वाद - विवाद, चर्चा ह्यात खोलात जाऊ नका. आत्मसन्मान दुखावला जाईल. मैत्रिणींमुळे खर्च व नुकसान होण्याची शक्यता आहे. पोटाच्या व्याधींमुळे त्रस्त व्हाल. नवीन कार्यारंभ व प्रवास शक्यतो टाळा.
कर्क - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य लाभणार नाही. छातीत दुखणे किंवा इतर व्याधींचा त्रास जाणवेल. कुटुंबियांशी खडाजंगी उडेल. मानहानी संभवते. स्त्री किंवा वाणी यांमुळे एखादे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. पैसा खर्च होईल. वेळेवर भोजन मिळणार नाही. निद्रानाशाचा त्रास संभवतो.
सिंह - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कार्यातील यश व प्रतिस्पर्ध्यांवर विजयाची धुंदी आपल्या मनावर राहिल्याने आपणास प्रसन्न वाटेल. भावंडांसह घरात काही बेत ठरवाल. मित्र, स्नेही यांच्यासह एखादा प्रवास होऊ शकेल. प्रकृती उत्तम राहील. आर्थिक लाभ व प्रिय व्यक्तीचा सहवास ह्यामुळे आपण खुश व्हाल. शांत चित्ताने नवीन कामाचा आरंभ करा. अचानक नशिबाची साथ मिळेल.
कन्या - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज मानसिकता द्विधा राहील. नकारात्मक विचार मनाची बेचैनी वाढवतील. कुटुंबियांशी गैरसमज किंवा मतभेद होतील. नाहक खर्च करावा लागेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष लागणार नाही. बौद्धिक चर्चा करताना भांडण होणार नाही याची दक्षता घ्यावी. प्रवासाची शक्यता आहे. आयात - निर्यातीच्या व्यवसायात यश मिळेल.
तूळ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज आपणास आपले कला कौशल्य दाखविण्यास सुवर्ण संधी मिळेल. आपली कलात्मक व रचनात्मक शक्ती तेजस्वी बनेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य राहील. मनोरंजन कार्यक्रमात मित्र व कुटुंबियांसह सहभागी व्हाल. आर्थिक लाभ होईल. स्वादिष्ट भोजन, वस्त्र व वाहन सुख मिळेल. प्रिय व्यक्तीचा सहवास व कार्य साफल्याची शक्यता आहे. दांपत्य जीवनात गोडी राहील.
वृश्चिक - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज आपला पैसा व वेळ हौसमौज व मनोरंजन ह्यासाठी खर्च होईल. स्वास्थ्या संबंधी तक्रार राहील. मनाला चिंता लागून राहील. एखादी दुर्घटना संभवते. कुटुंबीय किंवा सगे - सोयरे यांच्याशी गैरसमज किंवा मतभेद होतील. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध राहावे लागेल. प्रत्येक विषयात संयम ठेवून व्यवहार केल्यास अनर्थ होणार नाही.
धनू - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज आर्थिक लाभ व सामाजिक प्रतिष्ठा मिळवून कौटुंबिक जीवनात सुद्धा सुख संतोष अनुभवाल. आज मिळकतीत वाढ व व्यापारात लाभ होईल. प्रिय व्यक्तीच्या सहवासात सुखद क्षण अनुभवू शकाल. मित्रांसह पर्यटन स्थळाला भेट द्याल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. पत्नी किंवा संतती ह्यांच्या कडून लाभ संभवतो.
मकर - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज व्यापार - व्यवसायात लाभ होईल. वसुली, प्रवास, मिळकत यांसाठी आजचा दिवस लाभदायी आहे. सरकारी कामात यश मिळेल. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामाची प्रशंसा करतील. बढती संभवते. पित्याकडून लाभ होईल. संततीच्या शिक्षणा संबंधी समाधान लाभेल. प्रतिष्ठा वाढेल.
कुंभ - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपण जरी शारीरिक दृष्टया अस्वस्थ असलात तरीही मानसिक दृष्टया स्वस्थता टिकवण्याचा प्रयत्न करा. आज काम करण्याचा उत्साह कमी राहील. नोकरीत वरिष्ठांच्या नाराजीस सामोरे जावे लागेल. मौज - मजा तसेच सहलीसाठी खर्च होईल. संतती बाबतीत चिंता राहील. प्रतिस्पर्ध्यां बरोबर चर्चेत सहभागी होऊ नका. परदेशातून एखादी चांगली बातमी मिळेल.
मीन - आज चंद्र रास बदलून तूळ राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपणास अचानक धन लाभ होण्याची शक्यता आहे. मानसिक तसेच शारीरिक श्रमामुळे स्वास्थ्य खराब होऊ शकते. सर्दी, श्वसनाचा त्रास, खोकला व पोट दुखी यांचा जोर वाढेल. खर्चात वाढ होईल. शक्यतो जलाशया पासून दूर राहावे. इस्टेटीतून फायदा होईल. अवैध कामा पासून दूर राहावे. आपले श्रम कमी करण्यासाठी प्रयत्नशील राहा.