मेष - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आजचा दिवस अस्वास्थ्य व त्रासाचा आहे. ताप, सर्दी, खोकला ह्यांचा त्रास संभवतो. इतरांचे भले करण्याच्या नादात आपणावर संकटे कोसळतील. शक्यतो आज आर्थिक व्यवहार टाळावेत. तसेच कोणाला जामीन राहू नये. निर्णयशक्तीच्या अभावामुळे मनःस्थिती द्विधा होईल व त्यामुळे चिंता वाढतील. अधिक लाभाच्या हव्यासापोटी नुकसान होण्याची शक्यता आहे.
वृषभ - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. धनवृद्धी व पदोन्नती संभवते. व्यापारी सौदे यशस्वी होतील. कुटुंबीय व मित्रांसह आनंदाचे सुखद क्षण अनुभवू शकाल. एखादा प्रवास होऊन त्यातून काही लाभदायी नवीन संबंध प्रस्थापित होतील.
मिथुन - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आज शारीरिक, मानसिक सुख चांगले मिळेल. नोकरी - व्यवसायात आपल्या कामाची प्रशंसा होईल. व्यापारी कामाची कदर करतील. त्यामुळे आपणास जास्त प्रोत्साहन मिळेल. बढती संभवते. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. सरकारी कामात यश मिळेल. कौटुंबिक जीवनात आनंद मिळेल.
कर्क - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आरामदायी दिवस आहे. प्रत्येक काम सहज पूर्ण होईल. नोकरीत वरिष्ठ खूश असतील. बढती मिळू शकते. वरिष्ठांशी महत्वपूर्ण चर्चा होतील. तसेच कुटुंबियांसह सुद्धा मनमोकळी चर्चा होईल. गृहसजावटी संदर्भात नवीन काही योजना आखाल. कामासाठी प्रवास करावा लागेल. मातुल घराण्याशी संबंध दृढ होतील. आरोग्य उत्तम राहील. तसेच सरकार कडून ही फायदा संभवतो.
सिंह - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आरोग्याकडे अधिक लक्ष पुरवावे लागेल. बाहेरचे खाणे - पिणे टाळा. आजारामुळे खर्च करावा लागेल. नकारात्मक विचार मनावर प्रभाव पाडतील. कुटुंबातील व्यक्तींशी जपून राहा. काळजी कमी होण्यासाठी प्रयत्न करावा लागेल.
कन्या - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज दांपत्य जीवनात सुखद क्षण अनुभवाल. सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रात सन्मान व प्रतिष्ठा लाभेल. मनोरंजनाच्या कार्यक्रमात भाग घ्याल. वस्त्रे, अलंकार, वाहन इत्यादींची खरेदी होईल. भिन्नलिंगी व्यक्तीची ओळख प्रणयात परिवर्तित होईल. व्यापारात भागीदारांशी चांगले संबंध राहतील. धनलाभ होईल.
तूळ - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज सामान्यतः प्रकृती उत्तम राहील. आजारी व्यक्तींना पण आराम वाटेल. घरातील सुख शांतीच्या वातावरणात वेळ घालवाल. कामात सफलता मिळाल्याने उत्साह वाढेल. नोकरीत लाभदायक बातमी मिळेल व सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. भिन्नलिंगी मित्रांचा सहवास घडेल. विरोधक व प्रतिस्पर्धी ह्यांच्यावर मात कराल.
वृश्चिक - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगली प्रगती करता येईल. नवीन कार्य शक्यतो आज सुरू करू नये. आर्थिक नियोजनासाठी अनुकूलता असल्यामुळे आपल्या कष्टाचे फळ मिळेल. जुगारसदृश बाबींपासून शक्यतो दूर राहावे. प्रवास सुद्धा शक्यतो टाळावेत.
धनू - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज मनात औदासिन्य दिसून येईल. शारीरिक उत्साह व मानसिक तरतरी ह्यांचा अभाव असेल. कुटुंबीयांशी तणावाच्या प्रसंगामुळे घरातील वातावरण कलुषित होईल. एखादी मानहानी संभवते. वित्तहानी सुद्धा संभवते. जमीन वा वाहना संबंधीची कागदपत्रे सावधपणे तयार करा.
मकर - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आजचा दिवस नवीन कार्य हाती घेण्यास अनुकूल आहे. नोकरी, व्यापार व दैनंदिन कामात अनुकूल स्थिती असल्याने मन प्रसन्न राहील. भावंडां कडून सहकार्य मिळून लाभ सुद्धा होतील. आर्थिक लाभ संभवतात. विद्यार्थ्यांना विनासायास अभ्यास करता येईल.
कुंभ - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज वाद - विवाद होण्याची शक्यता आहे. एखाद्या मांगलिक कार्यासाठी खर्च होईल. घरातील वातावरण कलुषित होईल. कामात अपयश आल्याने मन दुःखी होऊन नैराश्य येईल. आज प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. निर्णय क्षमतेचा अभाव दिसून येईल.
मीन - आज चंद्र मीन राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. उत्साह व स्वास्थ्य टिकून राहील. नवीन कार्यारंभासाठी दिवस अनुकूल आहे. मित्र व कुटुंबीयांसह भोजनाचा आस्वाद घ्याल. धनलाभ संभवत असला तरी खर्च वाढणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. एखादा प्रवास संभवतो. कार्यात यशस्वी व्हाल.