मेष - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून भाग्यात भावात असेल. आज नकारात्मक विचार, व्यवहार व नियोजना पासून दूर राहावे लागेल. अन्यथा आळस व दुःखात वाढ होईल. प्रकृती नरम गरमच राहील. मात्र, हातातील कार्ये सहजपणे पार पडतील. आज व्यावसायिक कामा निमित्त प्रवास करावा लागेल. इतरांना मदत करण्याचा आपण प्रयत्न कराल.
वृषभ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून अष्टमात भावात असेल. आज आपल्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने सावध राहावे लागेल. नवीन कार्यात अडचणी येतील. प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. नशिबाची साथ मिळणार नाही. वरिष्ठांची नाराजगी ओढवून घ्यावी लागेल. संतती विषयक काळजी निर्माण होईल.
मिथुन - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सातवा भावात असेल. आजचा दिवस सौख्यदायी आहे. मात्र, आपण दिवसभर आपली दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी आपण मनोरंजनाचा आधार घ्याल. या आनंदात मित्र व संबंधितांना सहभागी करून घ्याल. दुपार नंतर मात्र मनात चिंता निर्माण होतील. हळवेपणाचे प्रमाण वाढेल. संतापावर नियंत्रण ठेवावे लागेल. प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल.
कर्क - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून सहावा भावात असेल. आज खूप मोठा आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिकांना दिवस लाभदायी आहे. नोकरीतील उत्तम कामगिरीमुळे बढती मिळण्याची शक्यता निर्माण होईल. दुपार नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल. व्यापार - व्यवसायात भागीदारांशी यशस्वीपणे विचार विनिमय करू शकाल.
सिंह - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून पाचवा भावात असेल. साहित्य व कला ह्यातील गोडी वाढेल. पोटाच्या तक्रारींमुळे अस्वस्थता जाणवेल. दुपार नंतर आर्थिक अडचण दूर होईल. घरातील वातावरण आनंदी राहील. प्रकृतीत सुधारणा होईल. व्यापार - व्यवसायात लाभ होतील.
कन्या - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून चवथा भावात असेल. आज शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. मातेची प्रकृती बिघडेल. स्वकीयांवर संकट ओढवेल. धनहानी संभवते. शक्यतो प्रवास टाळावेत. संततीचे आरोग्य व अभ्यास ह्या विषयी चिंता निर्माण होईल. रागावर संयम ठेवा. वाद होण्याची शक्यता असल्याने बौद्धिक चर्चेपासून दूर राहणे हितावह होईल.
तूळ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून तिसरा भावात असेल. आजचा दिवस नवीन कार्याचा आरंभ करण्यास अनुकूल आहे. गूढ विद्यांचे आकर्षण निर्माण होईल. दुपार नंतर मात्र आनंद व उत्साहाचा अभाव जाणवेल. कुटुंबात कलह संभवतात. मानहानी संभवते.
वृश्चिक - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दुसरा भावात असेल. आज आपल्या एखाद्या वक्तव्यामुळे कुटुंबीयांची मने दुखावण्याची शक्यता आहे. कामात अपेक्षित यश प्राप्त होणार नाही. मनाची अवस्था द्विधा होईल. कामाचा व्याप वाढेल. दुपार नंतर मात्र मनातील मरगळ दूर होईल. मित्र आणि संबंधीतांशी सुसंवाद साधू शकाल. प्रतिस्पर्ध्यांवर मात करू शकाल. नशिबाची साथ मिळेल.
धनू - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून प्रथम भावात असेल. आज आपणाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. एखाद्या मंगल कार्यात सहभागी व्हाल. प्रवास संभवतो. वैवाहिक जीवनात सुख व आनंद मिळेल. दुपार नंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होतील. अंतिम व ठोस निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती असणार नाही.
मकर - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून बारावा भावात असेल. आज कोणाला जामीन राहू नये, अन्यथा अडचणीत सापडाल. शारीरिक व मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्या वागण्यात संयमित राहावे लागेल. घरातील वातावरण चांगले राहील. हातून परोपकार किंवा एखादे सत्कार्य घडेल.
कुंभ - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून लाभात भावात असेल. आजचा दिवस लाभदायी आहे. आर्थिक व सामाजिक क्षेत्रांत प्रगती होईल. नवीन परिचय होतील. परंतु दुपार नंतर प्रकृती बिघडेल. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. पैसा जास्त खर्च होईल. कोर्ट- कचेरीच्या कामांत सावध राहावे लागेल. स्वभाव चिडचिडा होईल.
मीन - चंद्र आज धनु राशीत आहे. तो आपल्या राशी पासून दशमात भावात असेल. आज द्विधा मनःस्थितीमुळे आपले विचार ठाम राहू शकणार नाहीत. नोकरीत वरिष्ठांकडून लाभ होतील. पदोन्नती संभवते. व्यापार विषयक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. आर्थिक, सामाजिक व कौटुंबिक पातळीवर सुद्धा लाभ संभवतात. मित्रांसह सहलीस जाण्याचे आयोजन करू शकाल.