मुंबई : जन्मकुंडलीतील 22 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहणार असून आज उत्साह, चौकसवृत्तीमुळे कोणतेही काम उत्कृष्टपणे पूर्ण करण्यात सहभागी व्हाल. कामात सहजपणे एकाग्रचित्त होऊन धनलाभ होऊन आर्थिक नियोजन सुद्धा यशस्वीपणे तुम्ही आज करू शकाल.
वृषभ : आज शारीरिक, मानसिक स्वास्थ्य साधारण राहणार असून खर्चाच्या काळजीमुळे मन अशांत राहणार आहे. वाणीवर संयम ठेवणे आवश्यक असून बाहेरचे खाणेपिणे टाळणे हितावह राहणार असून कामाच्या ठिकाणी स्त्री सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. मनात नकारात्मक विचार येऊन आर्थिक दृष्टया आजचा दिवस तुम्हाला मध्यम फलदायी असणार आहे.
मिथुन : आजचा दिवस उत्साहात, आनंदात जाऊन व्यापारात आज तुम्हाला लाभ होऊन उत्पन्नाचे स्रोत वाढतील. मित्रांशी चर्चा झाल्याचा आनंद होऊन विवाहेच्छुकांचे विवाह ठरुन शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. रमणीय स्थळी सहलीचे बेत आखून पत्नीसह संततीकडून तुम्हाला आज चांगलेच सौख्य लाभेल.
कर्क : आजचा दिवस कष्टदायी असल्याने प्रत्येक काम तुम्हाला सावधपणे करावे लागून कुटुंबीय, संततीशी मतभेद होण्याची शक्यता आहे. आवेश, संतापावर नियंत्रण ठेवल्यास कामे बिघडणार नाहीत, त्यासह प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. डोळ्यांचा त्रास जाणवून तुमचा आज एखादा अपघात होऊ शकतो.
सिंह : आज तुमच्या कार्यक्षेत्रात तुमचे चांगलेच वर्चस्व राहून वरिष्ठ तुमच्या कामगिरीने प्रभावित होऊन तुमच्यावर खूष होतील. दृढ मनोबल, खंबीर आत्मविश्वासामुळे तुमचे प्रत्येक काम यशस्वी होईल. वडिलांशी सौहार्दाचे संबंध राहून त्यांच्याकडून लाभ सुद्धा होईल, त्यासह जमीन, वाहन, संपत्ती संबंधीत कार्य करण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
कन्या : आजचा दिवस तुम्हाला प्रतिकूलतेचा असून मनात चिंता राहून शारीरिक स्फूर्तीचा अभाव जाणवेल. थकवा, अशक्तपणामुळे तुमची कामे धीम्या गतीने होतील. नोकरीत सहकारी, अधिकारी नाराज होऊन संतती विषयक चिंता राहील.
तूळ : आज शक्यतो वाद टाळणे तुमच्यासाठी हिताचे राहणार असून रागावू नका, उक्ती, कृतीवर नियंत्रण ठेवणे तुम्हाला हिताचे ठरेल. हितशत्रूंपासून सावध राहून तुम्हाला प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. अचानक धनलाभ होऊन एखाद्या गूढ विषयाकडे आपण आकर्षित होण्याची शक्याता आहे.
वृश्चिक : आजचा दिवस मनोरंजनाचा असून मित्रांसह मौजमजा, मेजवानी इत्यादीत आजचा दिवस तुम्ही घालवाल. उत्तम वस्त्रालंकार, वाहन, भोजनसौख्य लाभल्याने तुम्हाला आज मान, प्रतिष्ठेत वाढ होईल.
धनू : आजचा दिवस तुम्हाला अनुकूलतेचा असून घरात आनंददायी वातावरण राहून शारीरिक स्वास्थ्य, मानसिक प्रसन्नता तुम्हाला आज लाभेल. नोकरीतील वातावरण तुम्हाला अनुकूल राहून सहकार्यांचे उत्तम सहकार्य मिळेल. स्त्रीयांना माहेरहून चांगली बातमी मिळाल्याने त्यांचा उत्साह वाढेल.
मकर : निर्णयाच्या अभावामुळे मन चिंताक्रांत राहून तब्बेतीच्या बाबतीतही तुम्हाला चिंता राहणार आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या नाराजीला सामोरे जावे लागून संततीशी तुमचे मतभेद होतील. त्यांच्या आरोग्याची काळजी राहून प्राप्त परिस्थिती विचारात घेता प्रतिस्पर्ध्यांशी वाद टाळणे तुम्हाला हिताचे राहील.
कुंभ : आज तुमचे मन संवेदनशील राहिल्याने मानसिक अस्वास्थ्य जाणवून विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात यश प्राप्ती होईल. आज ठरवलेली सर्व कामे व्यवस्थित पार पडून स्त्रीयांना सौंदर्य प्रसाधनांवर खर्च करावा लागेल.
मीन : महत्वाचे निर्णय घ्यायला आजचा दिवस तुम्हाला अनुकूल असून तुमची सृजनशक्ती आज वाढेल. वैचारिक खंबीरपणा, मानसिक स्थैर्यामुळे कामात सहज यश मिळून जोडीदाराचे पूर्ण सहकार्य मिळेल.