मुंबई : जन्मकुंडलीतील 26 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आज तुमचे शारीरिक, मानसिक स्वास्थ्य उत्तम राहिल्याने कुटुंबियांसह आनंदात वेळ घालवू शकाल. आर्थिक बाबतीत भविष्यासाठी उत्तम नियोजन करुन आज उत्पन्नात वाढ होईल. कलावंत, कारागिरांना आपले कौशल्य दाखविण्याची संधी मिळून त्यांची कदर केली जाईल.
- वृषभ : आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साह आणि प्रसन्नतेचा असून प्रकृती उत्तम असल्याने सुख अनुभवायला मिळेल. सगेसोयरे, मित्र यांच्याकडून उपहार मिळतील. तुम्हाला आज प्रवासात स्वादिष्ट भोजनामुळे आजचा दिवस आनंदात जाईल. आर्थिक फायदा झाल्याने आज वैवाहिक जीवनातील सौख्य प्राप्त होऊ शकते.
- मिथुन : आज तुमचे संयमशील, विचारपूर्ण वर्तन अनेक अनिष्ट गोष्टींपासून तुमचा बचाव करू शकेल. तुमच्या वक्तव्याने गैरसमज होऊन शारीरिक कष्ट तुमच्या मनाला अस्वस्थ बनवणार आहेत. कौटुंबिक वातावरण गढूळ राहून डोळ्यांना पीडा होईल. खर्च जास्त होऊन मानसिक शांतीसाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.
- कर्क : आज अचानक धनप्राप्ती आणि वेगवेगळे फायदे झाल्याने तुम्ही आनंदित होणार आहात. प्राप्तीत वाढ होऊन व्यापार्यांशी फायद्याचे सौदे होतील. संतती, पत्नीकडून लाभ होऊन प्रवास, पर्यटन होऊ शकतो. विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील.
- सिंह : आजचा दिवस व्यवसायाच्या दृष्टिने उत्तम असून आज प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळेल. वरिष्ठांची मर्जी राहिल्याने आज सर्वत्र आपला चांगला प्रभाव पडेल. सरकारी कामात फायदा होऊन प्रकृती चांगली राहील. तुमच्या वैवाहिक जीवनात गोडी राहून घर आणि जमीनचे व्यवहार यशस्वी होणार आहेत.
- कन्या : आजचा दिवस शुभ फलदायी असून नातलगांसह प्रवासाचे बेत आखाल. स्त्रीवर्गाकडून लाभाची शक्यता असून धार्मिक कार्यातही तुम्ही सहभागी होऊ शकाल. परदेशी नातेवाईकांकडून आनंदाची बातमी मिळून भावंडांकडून लाभ होऊ शकतो.
- तूळ : तुमचा आजचा दिवस शुभ फलदायी असून नवे कार्य हाती घेऊन त्यात तुम्ही यशस्वी होणार आहात. वक्तृत्व, कृती संयमित ठेवणे हितावह राहणार असून द्वेषापासून दूर राहा. आरोग्याची काळजी घ्यावी लागून रहस्यमय आणि गूढविद्येकडे आकर्षित होऊ शकता. एखाद्या विषयात प्राविण्य मिळवू शकाल. भिन्नलिंगी व्यक्ती आणि पाण्यापासून दूर राहणे हिताचे राहील. मनाला शांती मिळण्यासाठी प्रयत्नशील राहा.
- वृश्चिक : आजचा दिवस काहीसा वेगळाच असून स्वतःसाठी वेळ काढू शकाल. मित्रांसह प्रवास, मौजमजा आणि मनोरंजनामुळे तुम्ही खूप आनंदी राहाल. मानसन्मानात वाढ होऊन एखादा सत्कार होण्याची शक्यता सुद्धा आहे. प्रिय व्यक्तीचा सहवास घडल्याने तुमचे मन प्रफुल्लित होणार आहे. उत्तम वैवाहिक सौख्य लाभल्याने तुमचे मन प्रसन्न होणार आहे.
- धनू : आजचा दिवस आर्थिक लाभाचा असून घरात शांतता आणि आनंदाचे वातावरण राहील. नोकरीत लाभ आणि सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळून कार्यात यश मिळेल. प्रकृती उत्तम राहून मातुल घराण्याकडून एखादी चांगली बातमी मिळेल.
- मकर : आज आपण मनाने खूप अशांत राहून आज आपण कोणताही महत्वाचा निर्णय घेऊ शकणार नाही. महत्वाचा निर्णय न घेता आल्याने तुम्ही आज तणावात राहाल. आज तुम्हाला नशिबाची साथ न मिळाल्याने नैराश्य येईल. तुमच्या कुटुंबातील मोठ्या व्यक्तींची प्रकृती बिघडल्याने तुम्ही अस्वस्थ राहाल. प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळावेत, पोटाचे दुखणे बळावण्याची शक्यता आहे.
- कुंभ : आज तुम्ही खूप संवेदनशील झाल्याने तुमचे मन बेचैन होईल. सार्वजनिक क्षेत्रात आज तुमची मानहानी होण्याची शक्यता असून संपत्तीचे कागदपत्र बनवताना सावध राहावे. महिलांचा सौंदर्य प्रसाधने, आभूषणांच्या खरेदीसाठी खर्च होणार आहे.
- मीन : आजचा दिवस महत्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल असून विचारात दृढता राहील. मित्र आणि कुटुंबियांसह एखाद्या प्रवासाला जाण्याची शक्यचा आहे. भावंडांकडून फायदा होऊन कामाचे यश आपले मन आनंदी करेल. सार्वजनिक जीवनात मानसन्मान होऊन आपल्या प्रतिस्पर्ध्याला पराभूत करू शकाल.