ETV Bharat / bharat

Horoscope : 'या' राशींच्या पुरुषांना आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल, स्त्री मित्रांकडून होईल लाभ, वाचा राशी भविष्य - राशी

कोणत्या राशीचे दैनंदिन जीवन चांगले राहील हे आपण ईटीव्ही भारतवरील या राशी भविष्यात आपण जाणून घेणार आहोत. सर्व 12 राशींचा दिवस कामाच्या ठिकाणी कसा जाईल. जोडीदाराची साथ कोणाला मिळेल कशी मिळेल. तुमची कुंडली चंद्र राशीवर आधारित आहे. चला तुमच्या जीवनाशी निगडित प्रत्येक गोष्ट 25 मार्चच्या दैनिक कुंडलीत राशी भविष्य कसे असेल ते जाणून घेऊ.

Horoscope
संग्रहित छायाचित्र
author img

By

Published : Mar 24, 2023, 5:36 PM IST

मुंबई : जन्मकुंडलीतील 25 मार्च 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.

मेष : आजचा दिवस शुभ फलदायी असून कुटुंबीय, स्नेही आणि मित्रांसह एखाद्या स्नेहसंमेलनास उपस्थित राहाल. नवीन कार्य हाती घेतले तर अती उत्साहाच्या भरात त्या कामात बिघाड होणार नसल्याची काळजी घेण्याची गरज आहे.

वृषभ : आजचा दिवस शारीरिक, मानसिक दृष्टया व्यस्त राहण्याचा असून काळजीमुळे मनावर ताण येणार आहे. कुटुंबीयांशी मतभेद झाल्याने घरातील वातावरण कलुषित होऊन कष्टाच्या मानाने अपेक्षित प्राप्ती होणार नाही. त्यामुळे आर्थिक चिंता निर्माण होईल मात्र पूर्ण विचार केल्या शिवाय कोणताही निर्णय आज घेऊ नये.

मिथुन : आजचा दिवस लाभदायीअसून पत्नी, संततीकडून फायदेशीर बातम्या मिळतील. मित्रांच्या भेटी आनंद देऊन जामार असून व्यापारी वर्गाच्या प्राप्तीत भर पडेल. नोकरीत वरिष्ठांची मर्जी संपादन करता येऊ शकते. स्त्री मित्रांकडून लाभ होणार असून तुमचा प्रवास आनंददायी होणार आहे.

कर्क : नोकरी, व्यवसाय करणाऱ्यांना आजचा दिवस खूप लाभदायी असून नोकरीत वरिष्ठ आपल्या कामगिरीवर खूश होतील. वरिष्ठांशी महत्त्वपूर्ण बाबींवर मोकळेपणाने चर्चा करू शकाल. मन ताजे तवाने राहून मातेशी चांगले संबंध राहतील. धन, मानसन्मान मिळून सरकारकडून फायदा होईल.

सिंह : आजचा दिवस मध्यम फलदायी आहे त्यामुळे एखाद्या मंगलकार्यात हजेरी लावाल. न्यायी व्यवहार करुन एखाद्या प्रवासाचे नियोजन कराल. पोटदुखीचा त्रास होऊ शकतो, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे. वरिष्ठांशी मतभेद होऊन नोकरी, व्यवसायात अडथळे येतील. संततीची काळजी असल्यामुळे शरीरास थकवा आणि आळस जाणवणार आहे.

कन्या : आज नवीन कामे सुरू केल्यास त्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. बाहेरचे खाद्यपदार्थ खाऊन स्वास्थ्य बिघडू शकते, त्यामुळे खाण्यावर आवर घाला. मन रागीट झाल्यामुळे बोलण्यावर ताबा ठेवावा लागेल. अपघाताची शक्यता असल्याने जलाशयापासून दूर राहावे. महत्वाचे निर्णय किंवा जोखिम यापासून वाचण्यासाठी विल, विरासत इत्यादीत अडचणी निर्माण होऊ शकतात. तुम्हाला कष्टाचे फळ न मिळाल्याने मन उदास होणार आहे, हितशत्रूंचा त्रास होऊ शकतो.

तूळ : आजचा दिवस यशस्वितेचा, आनंदाचा असून सार्वजनिक जीवनाशी संबंधीत कार्यात यशस्वी व्हाल. आज आपल्यावर भिन्नलिंगी व्यक्तीचा प्रभाव राहील. मौजमजेसाठी खर्च होऊन नवीन वस्त्रालंकार खरेदी कराल. उत्तम भोजनासह वैवाहिक सौख्य मिळेल. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे, मात्र काळजीपूर्वक राहा.

वृश्चिक : आज तुमच्या घरातील कौटुंबिक वातावरण तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम ठेवणार आहे. नियोजित कामात यश मिळाल्याने नोकरीत साथीदारांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. प्रतिस्पर्धी, शत्रूंवर मात करू शकाल तसेच मातुल घराण्याकडून लाभ होईल.

धनू : आजचा दिवस मिश्र फलदायी असून पोटाच्या समस्या त्रास देतील. संततीचे स्वास्थ्य, अभ्यास यामुळे चिंतित होण्याची वेळ येईल. तुमचे कार्य यशस्वी झाले नसल्याने तुम्हाला राग येण्याची शक्यता आहे, मात्र त्यावर नियंत्रण ठेवा. प्रणयासाठी मात्र अनुकूलता लाभून प्रिय व्यक्तीसह सुखद क्षणांचा अनुभव घेता येईल. साहित्य, लेखन क्षेत्रात रस राहील मात्र वादविवाद आणि बौद्धिक चर्चापासून दूर राहणे हिताचे होईल.

मकर : आजचा दिवस प्रतिकूलतेचा असून शारीरिक, मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. कुटुंबियांशी कटुता निर्माण झाल्याने मनाची बेचैनी वाढू शकते. भोजन अवेळी होऊन शांत झोप मिळणार नाही. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे. जलाशयापासून सावध राहावे लागून मानहानी होण्याची शक्यता आहे.

कुंभ : चिंता दूर झाल्याने मानसिक स्वास्थ्य मिळून मनात उत्साह संचारल्यामुळे पूर्ण दिवस आनंदात जाईल. भावंडे, स्नेही यांच्याशी वैचारिक एकोपा निर्माण होईल. एखादी महत्वपूर्ण योजना आखून जवळपास प्रवासाला जाण्याचा बेत ठरवू शकाल.

मीन : संघर्ष टाळण्यासाठी आज तुमच्या वाणीवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासून आर्थिक देवाणघेवाणीचे व्यवहार करताना सावध राहावे लागेल. शारीरिक आणि मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी मतभेद होऊन आहारावरही नियंत्रण ठेवावे लागेल.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.