मुंबई : जन्मकुंडलीतील 23 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
- मेष : आजच्या दिवसाची सुरवात आपण स्फूर्तीने, उत्साहाने करुन मित्रांसह सगेसोयऱ्यांच्या येण्याजाण्याने घरातील वातावरण आनंदाचे राहील. त्यांची अचानक भेट तुम्हाला आनंदित करुन आज आर्थिक फायदा होण्याची सुद्धा शक्यता असून प्रवासाची तयारी ठेवा.
- वृषभ : आज कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका. त्यामुळे आज गैरसमज होण्याची शक्यता आहे. प्रकृती खराब असल्यामुळे मन उदास बनून कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याने तुमचे मन दुःखी होईल.
- मिथुन : आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होऊन समाजात मान, प्रतिष्ठा वाढून मित्रांकडून फायदाही होईल. त्यांच्यासाठी पैसेही खर्च होतील. एखाद्या सुंदर जागी पर्यटनासाठी गेल्याने संपूर्ण दिवस आनंददायी होऊ शकणार असून विवाहेच्छुकांना विवाह ठरविण्यासाठी आजचा दिवस अनुकूल आहे.
- कर्क : आज गृह सजावटीवर तुम्ही विशेष लक्ष देऊन घरगुती वापराचे नवीन साहित्य खरेदी कराल. कुटुंबात सुखशांती नांदून सरकारी लाभ मिळाल्याने तुमची प्रतिष्ठा वाढेल.
- सिंह : आज स्वभावात उग्रता, संताप असल्यामुळे काम करण्यात तुमचे मन लागणार नसून वादविवादात तुमच्या अहंकारामुळे कोणाची नाराजी ओढवून घ्याल. आरोग्याकडे लक्ष द्यावे लागून उतावीळपणामुळे निर्णय घेऊन नुकसान होण्याची शक्यता आहे.
- कन्या : आज तुम्ही एखादे काम हाती घेणे हिताचे ठरणार नसून बाहेरचे खाण्यामुळे प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. क्रोधावर नियंत्रण ठेवण्यासाठी मौन हेच शस्त्र उपयुक्त ठरुन पैसा जास्त खर्च होईल. हितशत्रूपासून आज तुम्हाला सावध राहावे लागणार असून आग, पाण्यापासून जपून राहावे.
- तूळ : आजचा दिवस प्रणय, प्रेमालाप, मनोरंजन व मौजमस्ती करण्याचा असून सार्वजनिक जीवनात महत्व मिळेल. यश, कीर्ती वाढून भागीदारांशी लाभाच्या गोष्टी होतील.
- वृश्चिक : आज आपण निश्चिंतपणा, सुखशांतीमध्ये घरात वेळ घालवून शारीरिकस, मानसिक स्वास्थ्य कार्य करण्यासाठी उत्साह देईल. कामाच्या ठिकाणी सहकारी वर्गाची खूप मदत झाल्याने अनेक कामे हातावेगळी करुन अपूर्ण कामे तडीस जातील.
- धनू : आज तुम्ही संततीचा अभ्यास, स्वास्थ्यामुळे चिंतीत राहून पोटाच्या तक्रारी तुम्हाला सतावणार असून कामातील अपयशाने तुम्ही निराश व्हाल. रागावर नियंत्रण ठेवावे लागणार आहे, साहित्य, लेखन व कला विषयांची तुमची गोडी वाढेल. प्रिय व्यक्तीचा सहवास संस्मरणीय होऊन आज वादविवाद किंवा चर्चात भाग घेऊ नका.
- मकर : आजचा दिवस प्रतिकूलतेचा असल्याने मन खिन्न होऊन शारीरिक स्फूर्ती, तरतरींचा अभाव राहील. सार्वजनिक जीवनात मानहानी होण्याचा धोका असून छातीत दुखणे संभवते. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत येऊ शकता, त्यामुळे स्त्रीयांशी संपर्क टाळा.
- कुंभ : आज तुम्ही तनामनाने प्रसन्न होऊन मनात असलेले चिंतेचे मळभ दूर होऊन उत्साह वाढेल. भाऊबंदांसह नवीन योजना ठरवल्याने त्यांच्यासह आनंदात वेळ जाईल.
- मीन : आजचा दिवस आर्थिक नियोजन करण्यासाठी अनुकूल असून नियोजित कामे पूर्ण होतील. प्राप्तीत वाढ होऊन कुटुंबात सुख शांतीचे वातावरण असून उत्कृष्ट भोजन मिळेल.
हेही वाचा - Love Rashi : प्रेयसीला संतुष्ट करण्यासाठी 'या' राशीवाल्यांना रविवारचा दिवस योग्य; वाचा, लव्हराशी