मुंबई : जन्मकुंडलीतील 13 एप्रिल 2023 रोजीच्या भाग्यशाली राशीची चिन्हे जाणून घ्या कशी असतील. कसा असेल तुमचा दिवस, कशी राहील नोकरीतील स्थिती, प्रेम, विवाह, व्यवसाय अशा आघाड्यांवर कशी असेल ग्रहस्थिती, तुमच्या जोडीदारासोबतचा दिवस कसा जाईल, या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी 'ईटीव्ही' भारतवर वाचा, राशी भविष्य.
मेष : आज नकारात्मक विचार, व्यवहार, नियोजनापासून तुम्हाला दूर राहण्याची गरज आहे, अन्यथा आळस दुःखात वाढ होऊन प्रकृती नरम गरमच राहील. तुमच्या हातातील कार्ये आज सहजपणे पार पडून प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळण्याची आज गरज आहे. दुपारनंतर परिस्थिती सुधारुन आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल, त्यासह आज व्यावसायिक कामानिमित्त तुम्हाला प्रवास करण्याची गरज पडेल.
वृषभ : आज तुमच्या हातून एखादे सरकार विरोधी कार्य होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला आज सावध राहावे लागणार आहे. नवीन कार्यात अडचणी येऊन आज तुमची प्रकृती बिघडण्याची शक्यता आहे. काही ना काही कारणाने आज तुम्हाला काळजी वाटून उक्ती आणि कृती यात तुम्हाला संतुलन ठेवून काम करावे लागणार आहे. व्यवसायात अडचणी उद्भवून नशिबाची साथ आज तुम्हाला मिळणार नसल्याने वरिष्ठांची नाराजी ओढवून घ्यावी लागेल.
मिथुन : आजचा दिवस तुम्हाला सौख्यदायी असून तुम्ही दिवसभर तुमची दैनंदिन कामेच करत राहाल. मन प्रसन्न राहण्यासाठी तुम्हाला आज मनोरंजनाचा आधार घ्यावा लागून या आनंदात मित्रांना सहभागी करून घ्याल. दुपारनंतर मात्र मनात चिंता निर्माण होऊन तुमचा हळवेपणा वाढल्याचे दिसून येईल.
कर्क : आज व्यावसायिक वातावरण तुम्हाला अनुकूल असून स्त्रियांना माहेरहून आनंददायी बातमी मिळाल्याने त्यांचा आनंद गगणात मावेनासा होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात केल्याने तुम्हाला शारीरिक, मानसिक स्वास्थ्य चांगले राहणार असून बौद्धिक चर्चेत तार्किक विचारांचा वापर करायला आजचा दिवस तुम्हाला अनुकूल आहे.
सिंह : आजचा दिवस तुम्हाला प्रणयाराधनेसाठी अनुकूल असून रागावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. पोटाच्या व्याधी आज तुम्हाला त्रास देणार असून दुपारनंतर घरात आनंदाचे वातावरण राहील. मानसिक प्रसन्नता, उत्साह जाणवून व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. तुमचे सहकारी आज तुम्हाला अपेक्षित सहकार्य करतील त्यामुळे तुमचा आनंद द्विगुणित होईल.
कन्या : आज शारीरिक स्वास्थ्य, मानसिक तरतरी व चेतना शक्तीचा अभाव तुम्हाला जाणवत राहील, त्यासह सामाजिक स्तरावर मानहानीचा धोका आहे. तुम्हाला आज रागावर नियंत्रण ठेवून कार्य साफल्य न झाल्याने निराश होण्याची वेळ तुमच्यावर येईल.
तूळ : आजचा दिवस नवे कार्य हाती घेण्यास अनुकूल असून प्रिय व्यक्तीच्या भेटीने तुम्हाला आज आनंद होईल. भाग्योदय होऊन आज तुम्हाला समाजात मानसन्मान मिळेल, दुपारनंतर मात्र तुमचे मन उदास होण्याची शक्यता असेल. घरातील वातावरण क्लेशकारक राहून स्थावर संपत्ती विषयक कागदपत्राबद्दल आज तुम्हाला सावध राहावे लागेल.
वृश्चिक : नियोजित काम पूर्ण न झाल्याने आज तुम्हाला नैराश्य येण्याची शक्यता असल्याने कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे आज तुम्ही टाळावे. घरगुती वातावरण क्लेशदायी राहणार असून दुपारनंतर भावंडांसह आनंदात वेळ घालवायला तुम्हाला मिळेल. प्रतिस्पर्ध्यांना पराभूत केल्यामुळे तुमचे आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.
धनू : आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता असून एखाद्या मंगल कार्यात तुम्ही सहभागी होऊ शकता. वैवाहिक जीवनात सुख मिळून दुपारनंतर कुटुंबात काही कारणास्तव वाद होण्याची शक्यता असल्याने तुम्हाला सावधान व्हावे लागेल. केलेल्या कामाचे अपेक्षित फळ न मिळाल्याने नैराश्य येऊन अंतिम निर्णय घेण्यासारखी मनःस्थिती तुमची आज असणार नाही.
मकर : आज तुम्ही कोणाला जामीन राहू नये, अन्यथा तुम्ही अडचणीत येण्याची शक्यता आहे. आज तुम्हाला मानसिक आरोग्याकडे लक्ष द्यावे लागणार असून तुमच्या बोलण्या आणि वागण्यात संतुलित राहावे लागणार आहे. अपघाताची शक्यता असल्याने तुम्हाला आज वाहन जपून चालवावे लागणार आहे, दुपारनंतर तुमच्या प्रकृतीत सुधारणा होईल.
कुंभ : आर्थिक, सामाजिक क्षेत्रात आज तुमची प्रगती होऊन नवीन परिचय होतील मात्र परंतु दुपारनंतर तुमची प्रकृती बिघडेल. आज तुमच्या घरचे कौटुंबिक वातावरण गढूळ झाल्याने तुमचा पैसा जास्त खर्च होईल. कोर्टाच्या कामात सावध राहावे लागून आज तुमचा स्वभाव चिडचिडा होईल.
मीन : आज द्विधा मनःस्थितीमुळे तुमचे विचार ठाम नसल्याने तुम्हाला चांगलाच त्रास होणार असून नोकरीत मात्र वरिष्ठांकडून लाभ होतील. व्यापार विषयक नियोजन तुम्ही आज यशस्वीपणे करणार असून कुटुंबात सुख समाधान आज नांदणार आहे.