ETV Bharat / bharat

Horoscope 2022 Libra : तूळ राशीच्या व्यक्तींसाठी 2022 हे वर्ष कसं असेलं? वाचा वार्षिक राशीभविष्य - राशीभविष्य 2022

नवं वर्ष तूळ राशीसाठी कसं असेलं? ( How Will be new year for Libra ) वैवाहिक जीवन कसे असेल? (2022 Maried Life For Libra ) या वर्षात आर्थिक लाभ होईल का? कौटुंबिक स्थिती कशी असेल? शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल की नाही? जाणून घ्या, राशीभविष्य 2022 (Horoscope 2022)

Horoscope 2022 Libra
Horoscope 2022 Libra
author img

By

Published : Dec 27, 2021, 12:04 AM IST

पुणे - तूळ राशीसाठी 2022 हे वर्ष ( How Will be new year for Libra ) सामान्यपेक्षा चांगले राहील. कारण वर्षाच्या सुरुवातीला ग्रहांची (2022 Maried Life For Libra ) स्थिती तुमच्यासाठी अनुकूल राहील. विशेषत: आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. मात्र, सुरुवातीच्या काळात मानसिक तणावाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. परंतु जर तुम्ही कोणत्याही गोष्टीवर जास्त विचार करण्यापासून स्वतःला वाचवले. तर तुम्हाला लवकरच तणावातून आराम मिळेल. महत्त्वाचं म्हणजे तूळ राशीच्या व्यक्तींना या वर्षी समतोल राखणं गरजेचे आहे.

2022 करिअरसाठी कसे असेल? -

करिअरच्या दृष्टीने २०२२ हे वर्ष २०२१ पेक्षा चांगले ठरणार आहे. या राशीच्या काही लोकांना मार्च-एप्रिल महिन्यात इच्छित नोकरी मिळू शकते. सहकाऱ्यांशी तुमचे संबंध सुधारतील. त्यामुळे तुम्हाला कामाच्या ठिकाणी काम करावेसे वाटेल. गेल्या वर्षभरात करिअरच्या क्षेत्रात तुम्हाला ज्या अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावर या वर्षाच्या सुरुवातीलाच मात करता येईल. तूळ राशीच्या व्यावसायिकांसाठी हे वर्ष आनंददायी ठरू शकते. यावर्षी तुम्ही व्यवसायाच्या प्रगतीसाठी नवीन योजना बनवू शकता आणि या राशीच्या अनेक व्यावसायिकांना वर्षाच्या शेवटी लाभ मिळू शकतो. मात्र, पार्टनरशिप अजिबात करु नका, धोका संभवतो.

आर्थिक जीवन कसे असेल? -

तूळ राशीच्या लोकांच्या आर्थिक बाबतीत या वर्षी चांगले बदल होतील. तुम्हाला पैसे जमा करताना ज्या अडचणी येत होत्या. त्या दूर होऊ शकतात. या राशीच्या काही लोकांना २०२१ मध्ये केलेल्या गुंतवणुकीतून चांगला लाभही मिळू शकतो. दुसरीकडे, तूळ राशीचे काही लोक २०२२ मध्ये स्टॉक मार्केट किंवा बिटकॉइनमध्ये पैसे गुंतवण्याची योजना करू शकतात. तसेच, आपण असे निर्णय हुशारीने घेतले पाहिजेत. कोणतेही निर्णय डोळे झाकून घेऊ नका.

कौटुंबिक जीवन कसे असेल? -

या वर्षी तुम्हाला कौटुंबिक जीवनात शुभ परिणाम मिळू शकतात. यासाठी तुम्ही प्रयत्नही कराल. या वर्षी तुम्ही घरातील लोकांचे म्हणणे लक्षपूर्वक ऐकाल आणि शब्दांमागील अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न कराल. सासरच्या लोकांशी संवाद साधताना तुम्हाला शब्दांचा वापर अत्यंत काळजीपूर्वक करावा लागेल. याराशीच्या कुटुंबीयांना मुलांची चिंता सतावू शकते. जर तुमची मुले १६ वर्षांपेक्षा मोठी असतील तर त्यांच्याशी मित्राप्रमाणे बोला. जेणेकरून ते तुमचे मत तुमच्यासमोर उघडपणे मांडू शकतील. तुम्ही या वर्षाच्या मध्यात कौटुंबिक कार्यक्रमात भाग घेऊ शकता, जिथे तुम्ही तुमच्या कुटुंबातील लोकांना भेटू शकता ज्यांना तुम्ही आतापर्यंत फक्त नावाने ओळखत होता. शब्दांचा वापर जपून करा.

प्रेम आणि वैवाहिक जीवन -

या राशीच्या काही अविवाहित लोकांचे लग्न या वर्षी होऊ शकते. जर तुम्हाला लग्नाची चिंता असेल, तर तुमची चिंता दूर होऊ शकते. जर तुम्हाला लग्नासाठी योग्य जोडीदार मिळू शकला नसेल, तर तुम्हाला या वर्षी मिळू शकेल. तूळ राशीच्या लोकांच्या प्रेम जीवनावर नजर टाकल्यास हे वर्ष संमिश्र जाईल. तुमच्या प्रियकराबद्दल शंका घेणे तुम्हाला महागात पडू शकते. गैरसमज दूर करण्यासाठी जोडीदारांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे. काही लोक या वर्षी आपले प्रेम व्यक्त करू शकतात.

शिक्षण कसे असेल? -

विद्यार्थ्यांना यावर्षी अभ्यासात जोर लावावा लागणार आहे. या वर्षीचा आळस महागात पडू शकतो. पण हे वर्ष आळस झटकून कामाला लागण्याचे आहे. त्यामुळे हीच ती वेळ आहे, जोमाने अभ्यासाला लागा.

आरोग्य कसे असेल? -

या वर्षी तूळ राशीच्या लोकांच्या तब्येतीत चांगले बदल दिसून येतील. पण जास्त तळलेले आणि बाहेरचे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याच्या किरकोळ समस्या होण्याची शक्यता आहे. या राशीचे लोक जे दीर्घ आजाराने त्रस्त होते, त्यांना या वर्षी आराम मिळू शकतो. या राशीच्या लोकांच्या आरोग्यात चांगले बदल होण्याची शक्यता आहे. तुम्हाला पोटाच्या वरच्या भागाशी संबंधित आरोग्य समस्या देऊ शकते. त्यामुळे सावधगिरी बाळगा. यावर्षी समतोल राखण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करावे लागतील.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.