ETV Bharat / bharat

Horoscope 2022 : नवीन वर्षात या राशींसाठी आहे 'सुर्वणसंधी', जाणून घ्या वार्षिक राशीभविष्य - राशीभविष्य 2022 कुंभ

सर्व राशींसाठी कसं असेलं नवं वर्ष? ( How Will Be New Year For All Zodiac Signs ) 2022 मध्ये वैवाहिक जीवन कसे असेल? या वर्षात आर्थिक लाभ होईल का? कौटुंबिक स्थिती कशी असेल? शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल की नाही? जाणून घ्या, राशीभविष्य 2022 ( Horoscope 2022 )

Horoscope 2022
Horoscope 2022
author img

By

Published : Dec 25, 2021, 6:01 AM IST

Updated : Jan 1, 2022, 10:33 AM IST

  • मेष -

हे वर्ष आपणास मध्यम फलदायी ठरणारे आहे. आपल्यात ऊर्जेची कमतरता नसली तरी सुद्धा त्या ऊर्जेस योग्य प्रमाणात क्रियान्वित करण्याची आवश्यकता आपणास भासेल. आपण कोणत्या गोष्टीस प्राधान्य द्यावे ह्याचा निर्णय करणे आपल्यासाठी अवघड होऊन बसेल अशी परिस्थिती अनेकदा निर्माण होईल. अशा परिस्थितीत कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अनुभव किंवा सल्ला आपल्या उपयोगी पडू शकेल. आपणास जर परदेशात प्रवास करावयाचा असेल तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. वर्षातील मार्च, मे व जुलै हे महिने त्यासाठी अनुकूल आहेत. ह्या तीन महिन्यात केलेल्या प्रवासामुळे आपली आर्थिक बाजू भक्कम होईल व त्यामुळे आपण मानसिकदृष्ट्या प्रबळ व्हाल. कुटुंबियांशी आपला संपर्क वाढेल. त्यांच्याकडे मोकळेपणाने आपल्या भावना व्यक्त करून त्यांची मदत घेऊ शकाल. पैश्याच्या मागे धावण्याची वृत्ती सोडणे आपल्यासाठी उपयुक्त ठरेल. कुटुंबियांसाठी अधिक वेळ काढून त्यांच्या जवाबदाऱ्या समजून घ्याव्या लागतील. मानसिक शांतता लाभण्यासाठी एखाद्या मंदिरात जाऊन वेळ घालविण्यास आपण प्राधान्य द्याल. असे केल्याने आपणास आराम वाटेल, त्यासाठी कदाचित आपण थोडा वेळ एकांतात बसण्यास प्राधान्य द्याल. प्राणायाम करण्याची संवय लावून घ्या. असे केल्याने आपल्या मानसिक क्षमतेचा सुद्धा विकास होईल व त्यामुळे आपणास कोणताच त्रास होणार नाही. हे वर्ष आपणास बरेच काही देणारे आहे. त्यासाठी मात्र आपणास स्वतःला तैयार ठेवावे लागेल, तसेच श्रम करण्यासाठी सुद्धा तत्पर राहावे लागेल. आपले कार्यकौशल्य आपल्या बाजूने कौल देईल.

  • वृषभ -

वृषभ राशीच्या व्यक्तींना २०२२ चे वर्ष चांगल्या बातम्या देणारे आहे. ह्या वर्षी आपले नशीब फळफळेल. त्यामुळे गेल्या वर्षांपासून आपल्या जीवनास जी गती येऊ लागली आहे ती अधिक वेग घेऊन आपणास प्रगतीपथावर नेवून ठेवेल. आपण जर व्यापार करत असाल तर हळूहळू आपली व्यापारात प्रगती होऊन प्राप्तीत सुद्धा वाढ होईल. ह्या वर्षात आपली इच्छापूर्ती होईल, ज्यात प्रामुख्याने अनेक दिवसांपासून प्रतिक्षीत असलेल्या एखाद्या प्रवासाचा समावेश असू शकतो. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांनी जर प्रयत्न केले तर त्यांना वर्षाच्या मध्यास चांगली बातमी मिळू शकेल. आपले कौटुंबिक जीवन सामान्यच राहील. वर्षाच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती ढासळल्याने आपल्या चिंतेत भर पडेल, परंतु त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होईल. घरात पुन्हा आनंदाचे वातावरण पसरेल. ह्या वर्षात आपल्या वडिलांना सुद्धा यश प्राप्त होण्याची संभावना आहे. आपल्या जीवनात स्थैर्य येऊ लागेल. आपण आपल्या जवाबदाऱ्या ओळखून त्या पूर्ण कराल, तसेच आपले व्यक्तिमत्व सुद्धा बहरून उठेल. ह्या वर्षात आपल्या प्रकृतीत अनेक चढ - उतार येण्याची संभावना असल्याने आपणास आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षी आपण नवीन काही शिकून आपल्या व्यक्तिमत्वाचा विकास कराल. आपल्या वागणुकीत थोडा बदल होईल असे ग्रहांचे वृषभ राशीवर होणारे परिणाम निर्देशित करत आहेत. आपण आपल्याहून कोणालाही अधिक महत्व देणार नाहीत व हीच आपली नकारात्मक बाजू असेल. असे झाल्यामुळे काही चांगल्या व्यक्तीं आपल्या पासून दुरावल्या जातील. आत्मविश्वासाचा अतिरेक न करता इतरांना सुद्धा समान दर्जा देणे आपल्या हिताचे राहील. त्यामुळे आपले संबंध दृढ होतील तसेच व्यावसायिक जीवनात सुद्धा चांगले यश प्राप्त होईल. ह्या वर्षात आपल्या नवीन ओळखी होऊन त्यांच्याशी मैत्री होईल. संवाद साधल्याने आपणास चांगला लाभ होईल. आपल्या कार्यालयात सुद्धा आपला चांगला मान - सन्मान होऊन आपल्या सुख सोयीत वाढ होईल. ह्या वर्षातील प्रवास आपले मनोबल उंचावणारे होतील व त्यामुळे आपण नवीन लोकांच्या संपर्कात याल.

  • मिथुन -

मिथुन व्यक्तींसाठी २०२२ चे वर्ष खूपच चांगले आहे. ह्या वर्षात आपण काही नवीन सिद्धी प्राप्त कराल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष अत्यंत अनुकूल आहे. आपले कठोर परिश्रम व एकाग्रतेने अभ्यास करण्याची वृत्ती यामुळे आपणास मिळालेले यश हे निर्विवाद तर असेलच, शिवाय त्याची इतरत्र सुद्धा चर्चा होईल. त्यामुळे आपण इतरांची मने सुद्धा जिंकू शकाल. व्यापाऱ्यांना प्रसिद्धी व आर्थिक लाभ मिळेल. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या वरिष्ठांचा विश्वास संपादन करून बढती सुद्धा मिळवू शकतील. या वर्षात प्रकृतीचा त्रास होण्याची संभावना असल्याने आपणास त्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. खर्च नियंत्रित ठेवणे आपल्यासाठी आव्हानात्मकच असेल. कुटुंबातील एकोपा बघून आपले आंतरिक समाधान होईल. वर्षाचा मधला काळ आपल्या अपेक्षेहून अधिक चांगला असून आपणास आराम वाटेल. आपणास कार्यात यश मिळाले तरी काही कार्यात अडथळे येण्याची संभावना आहे. येणारे अडथळे कालांतराने दूर होणार असल्याने आपण काळजी करू नये. आपणास आपल्या सहकाऱ्यांवर विश्वास ठेवावा लागेल. त्यांच्या सहकार्याने आपण जे काम कराल त्यात प्रगती साधाल. ह्या वर्षात आपणास प्रवासाच्या अनेक संधी प्राप्त होतील. धार्मिक प्रवासाची संभावना अधिक आहे. वर्षाच्या सुरवातीस आपले शत्रू आपल्या विरुद्ध कट - कारस्थान रचण्याची संभावना असल्याने आपणास त्यांच्यावर नजर ठेवावी लागेल. वर्षाच्या मध्यास आपण त्यांच्यावर मात करू शकाल व वर्ष अखेरीस परिस्थितीत बदल होऊन काही शत्रू आपले मित्र देखील होतील. असे झाल्याने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यापासून आपणास कोणताही त्रास होणार नाही. ह्या वर्षात आपल्या आत्मविश्वासाने आपण भरपूर यश संपादन करू शकाल. ह्या वर्षात आपणास विशेषतः आपल्या वडिलांच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. ह्या शिवाय आपणास इतर कोणताही मानसिक त्रास होणार नाही.

  • कर्क -

कर्क राशीच्या व्यक्तींसाठी २०२२ चे वर्ष अनेक बाबतीत चांगले आहे. व्यापारात आपली उत्तम प्रगती होईल. आपणास जेथून अपेक्षा नसेल अशा ठिकाणाहून सुद्धा चांगला फायदा होण्याची संभावना आहे. आपण जर नोकरी करत असाल तर हळूहळू आपली प्रगती होऊन आपणास चांगली पगारवाढ सुद्धा मिळू शकेल. आपल्या कामाची प्रशंसा होईल. सहकारी वर्गात आपले वजन वाढेल. कौटुंबिक वातावरण आपल्या प्रगतीत मदतरूप होईल. वर्षाच्या मध्यास कुटुंबातील एखाद्या वयोवृद्ध व्यक्तीची प्रकृती बिघडल्याने आपल्या काळजीत वाढ होईल, परंतु वर्षाचे शेवटचे तीन महिने अनुकूल राहतील. कुटुंबात एकोपा राहील. कुटुंबीय एकमेकांची काळजी घेऊ लागतील. ह्या वर्षी आपणास नवीन कामे हाती घेण्याची संधी मिळू शकते. काही नवीन योजना सुरु होऊन आपल्या विचारसरणीत मोठे परिवर्तन घडवून आणतील. आपली कल्पकता बदलल्याने आपण जीवनाकडे व्यापक दृष्टिकोन ठेवून बघू लागाल. आत्मचिंतन करून जीवनात आपण काय चांगले व काय वाईट केले यावर विचार करू लागाल. त्याचा असा परिणाम होईल कि नवीन ऊर्जेसह कोणत्या क्षेत्रात व कशा प्रकारे काम करावयास हवे ह्याचा आपण विचार कराल. प्रगती साधण्यास आपल्याला त्याची मदतच होईल. ह्या वर्षात आपणास काही गूढ विद्यांची गोडी लागून त्यातील काही विषयांचे ज्ञान आपण प्राप्त सुद्धा करू शकाल. आध्यात्मिक गोष्टीत आपली रुची वाढून त्याचा आपण आनंद घ्याल. आपली प्रतिष्ठा उंचावेल. आपणास एखाद्या आध्यात्मिक गुरूंचे किंवा व्यक्तीचे मार्गदर्शन मिळाल्याने आपल्या जीवनास कलाटणी मिळेल. ह्या वर्षात व्यापारासाठी परदेशी जाण्याची संधी मिळेल. आपण जर त्यासाठी प्रयत्न केलेत तर त्यात आपणास यश प्राप्त होऊ शकेल.

  • सिंह -

अनेक बाबतीत २०२२ चे वर्ष सिंह राशीच्या व्यक्तींना चांगले जाणारे आहे. ह्या वर्षात आपण कारकिर्दीत उच्च शिखर गाठू शकाल व त्यामुळे आपल्यावर महत्वाची जवाबदारी सोपविण्यात येईल. असे झाल्याने आपला आत्मविश्वास द्विगुणित होईल. हे वर्ष व्यापाऱ्यांसाठी सुद्धा चांगले आहे. ते आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. हे वर्ष आर्थिक उत्कर्षाचे असले तरी आपणास योग्य आर्थिक नियोजन करावे लागेल. तसे न केल्यास मिळविलेला सर्व पैसा खर्च होऊन हाती काहीच शिल्लक राहणार नाही. ह्या वर्षी आपण जर प्रयत्न केलेत तर आपणास एखादी मोठी जमीन किंवा स्थावर मिळू शकेल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. विवाहितांचे वैवाहिक जीवन उत्तम राहील. आपला वैवाहिक जोडीदार धार्मिक विचारांसह नातेसंबंध टिकवून ठेवेल. आपल्या नात्यात समजूतदारपणा वाढल्याने हे वर्ष वैवाहिक जीवन सुखद करेल. वर्षाच्या मध्यास वैवाहिक जोडीदाराची प्रकृती बिघडल्याने काही समस्या निर्माण होतील, मात्र आपण योग्य ती काळजी घेतल्यास सर्व काही सुरळीत होईल. आपण जर परदेशात जाण्यासाठी इच्छूक असाल तर तशी संधी आपणास फेब्रुवारी, मे व जून ह्या दरम्यान मिळण्याची संभावना आहे. फेब्रुवारीत आपणास आपल्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. त्या नंतर जुलै व ऑगस्ट दरम्यान आपली प्रकृती बिघडू शकते. कुटुंबातील वडीलधाऱ्या व्यक्तीची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास कुटुंबाकडे लक्ष द्यावे लागेल. एखाद्या कारणाने कुटुंबात वाद होण्याची संभावना आहे. त्यामुळे आपण मानसिक दृष्ट्या काहीसे बेचैन राहाल, मात्र समजूतदारपणा दाखविल्यास अशा परिस्थितीतून आपण बाहेर पडू शकाल. आपणास सासुरवाडी कडून काही लाभ होईल. इतकेच नव्हे तर सासुरवाडी कडील लोकांच्या मार्गदर्शनाने आपण आपल्या कामात प्रगती साधू शकाल. आपण जर व्यापार करत असाल तर त्यात सासुरवाडीचे योगदान अधिक असेल. ह्या प्रमाणे हे वर्ष आपल्या समोर अनेक आव्हाने व काही नवीन संधी घेऊन येणारे आहे. आपणास हिमतीने आव्हानांचा सामना करावा लागेल, तसेच हाती आलेल्या संधींचा फायदा घेण्याचा प्रयत्न सुद्धा करावा लागेल. असे केल्यास हे वर्ष आपल्यासाठी यशस्वी वर्ष ठरू शकेल.

  • कन्या -

कन्या व्यक्ती चतुर असून आपली कामे इतरांकडून करवून घेण्यात ते तरबेज असतात. ग्रहांच्या स्थितीनुसार ह्या वर्षाचा बहुतांश काळ आपणास नशिबाची साथ देणारा असून आपण ह्या वर्षी आपली कामे सुरळीतपणे पार पाडू शकाल. आपण दूरवरचे प्रवास सुद्धा कराल व त्यामुळे आपला उत्साह वाढून आपल्या जीवनात नावीन्य निर्माण होईल. असे झाल्याने आपणास ताजेतवाने वाटू लागेल. ह्या वर्षात आपली प्रकृती साधारणच राहिली तरी कोणतीही मोठी समस्या निर्माण होईल असे दिसत नाही. कौटुंबिक जीवनात प्रेम व आपुलकी असल्याचे दिसून आले तरी त्यात काही समस्या निर्माण होण्याची संभावना असून आपणास त्यावर लक्ष द्यावे लागेल. कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या विवाहा संबंधी चर्चेत आपणास सहभागी व्हावे लागेल. परदेशात जाण्याची इच्छा असणाऱ्यांना मार्च - एप्रिल व त्या नंतर ऑगस्ट - सप्टेंबर दरम्यान परदेशी जाण्याची संधी मिळू शकेल, अशा संधीचा फायदा घ्यावा. ह्या वर्षात भावंडांशी काही कारणाने वितुष्ट येण्याची संभावना असल्याने आपण शक्य तितके शांत राहून भांडण टाळण्याचा प्रयत्न करावा. आपणास काही मित्रांचे सहकार्य मिळेल तर काही मित्र आपणास त्रास देतील. त्यामुळे आपल्या संबंधात दुरावा निर्माण होण्याची संभावना असल्याने शक्यतो असे प्रसंग टाळण्याचा प्रयत्न करावा. मार्च महिन्यात नोकरीच्या ठिकाणी एखादी चूक होऊन आपणास त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल, तेव्हा दक्ष राहावे. जून व जुलै दरम्यान आपल्या तीव्र बुद्धिमत्तेच्या जोरावर आपण मोठ - मोठ्या आव्हानांना सामोरे जाऊन समस्यांचे निराकरण सुलभतेने करू शकाल. त्यामुळे कामाच्या ठिकाणी आपली एक वेगळी ओळख निर्माण होईल. आपली प्रशंसा सुद्धा केली जाईल. ह्या वर्षात विरोधकांपासून सावध राहावे लागेल. ते अनेकदा आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील. आपला कल महत्वाच्या पौराणिक वस्तुं बद्धल समजून घेण्याकडे झाल्याने आपणास नवीन काहीतरी शिकावयास मिळेल. ह्या वर्षात आपणास संतती विषयक काही चिंता सतावतील. आपण संततीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करू लागाल. एकंदरीत हे वर्ष आपल्यासाठी मध्यम फलदायी ठरणारे आहे.

  • तूळ -

२०२२ हे वर्ष तूळ व्यक्तीना मध्यम फलदायी ठरणारे आहे. ह्या वर्षी आपणास बाहेरगांवी जाण्याच्या अनेक संधी मिळतील, व आपण जर बाहेरगांवी जाऊन तेथेच स्थायी होण्याचा विचार केलात तर त्यासाठी हे वर्ष उत्तम आहे. लवकरात लवकर लाभ मिळविण्यासाठी आपणास आपल्या प्रयत्नांना गती द्यावी लागेल. ह्या वर्षी स्थान परिवर्तनाची दाट संभावना असल्याने कामा निमित्त आपणास कुटुंबाहून दूर राहावे लागेल. आपण जर नोकरी करत असाल तर आपणास स्थान परिवर्तन करण्याची गरज भासू शकेल. संतती इच्छूक दांपत्यांसाठी हे वर्ष आनंददायी बातमी घेऊन येणारे असून त्यांना संतती प्राप्ती होईल. आपण जीवनात परिस्थितीनुसार निर्णय घेत असता व ह्याचाच फायदा आपणास ह्या वर्षी होईल. व्यापारात आपली बुद्धिमत्ताच आपल्या कामी येईल. ह्या सर्वात आपले विरोधक आपणास त्रास देण्याचा प्रयत्न करतील त्यांच्यावर करडी नजर ठेवावी लागेल. सरकारी नियमांच्या विरुद्ध जाऊन कोणा बरोबर कोणत्याही प्रकारचा करार करू नये, अन्यथा मोठे नुकसान होण्याची संभावना आहे. ह्या वर्षी आपणास आपल्या आर्थिक स्थितीवर लक्ष द्यावे लागेल असे ग्रह निर्देशित करत आहे. वायफळ खर्च होऊन आपला ताण वाढेल व आर्थिक स्थितीवर परिणाम होईल. असे होऊ नये म्हणून आपणास आधी पासूनच तयार राहावे लागेल. ह्या वर्षाचे ग्रहमान कौटुंबिक वातावरणास विशेष पोषक नसून आपले कौटुंबिक जीवन तणावग्रस्त राहील. हे वर्ष प्रवासासाठी साधारणच आहे. वर्षाच्या सुरवातीस व मे ते जुलै दरम्यान प्रवास केल्यास ते फायदेशीर होतील. अशा प्रकारे आपला व्यवसाय सुद्धा वाढीस लागू शकेल. ह्या वर्षात मातेची प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास तिची काळजी घ्यावी लागेल. सासुरवाडीशी चांगले संबंध असल्याचा आपणास फायदा होईल तसेच सासुरवाडी कडील लोकांकडून उत्तम मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, ज्याची आपणास आवश्यकता असेल. मित्र व नातेवाईकांशी संबंधात माधुर्य टिकून राहील. आपले मित्र आपल्या कामात सुद्धा आपणास मदत करतील. त्यामुळे जीवनातील अनेक समस्या दूर होऊन संबंध परिपकव होतील.

  • वृश्चिक -

वर्षाच्या सुरवातीस आपला आत्मविश्वास उंचावलेला असेल. आपण प्रत्येक काम स्वतः करण्यास प्राधान्य द्याल. त्यामुळे आपले कौशल्य व नेतृत्व क्षमतेचा परिचय इतरांना होऊन आपली लोकप्रियता वाढीस लागेल. आपल्या कामात आपण यशस्वी व्हाल व आपले कौशल्य वाढीस लागेल. ह्या वर्षात आपणास भरपूर पैसा मिळणार असल्याने आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. असे असले तरी वर्ष अखेरीस खर्चावर नियंत्रण ठेवावे लागेल. ह्या वर्षात आपणास मित्रांशी सलोखा ठेवावा लागेल. आपणास त्यांची मदत होणार असली तरी काही ना काही कारणाने त्यांच्याशी आपला वाद होण्याची संभावना आहे. वर्षाच्या मध्यास आपणास परदेशात जाण्याची संधी मिळेल, व जे ह्यासाठी पूर्वीपासूनच प्रयत्नशील आहेत त्यांना लगेचच यश प्राप्त होईल. ह्या वर्षी आपण एखाद्या स्थावराची खरेदी करू शकाल. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. आपली रास वृश्चिक असल्याने आपण गुप्तता पाळण्याचा प्रयत्न कराल व त्यामुळे आपल्या निकटवर्तीयांशी काही कटुता येण्याची संभावना आहे. त्यांचा आपल्या बद्धल गैरसमज होऊन आपल्यात दुरावा निर्माण होईल. मात्र, आपल्या खास व्यक्ती, कुटुंबीय, प्रियजन व वैवाहिक जोडीदार यांच्यापासून काहीही लपवून ठेवू नका, अन्यथा मोठी समस्या निर्माण होऊ शकते. ह्या वर्षी आपणास प्रेमालाप करण्याची भरपूर संधी मिळेल. ह्या वर्षात नोकरीत बढती किंवा बदल होण्याची संभावना आहे. योग्य वेळेस मिळालेली योग्य संधी हातून निसटणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळेच आपणास बढती मिळू शकेल. ह्या वर्षी चांगल्या ठिकाणी आर्थिक गुंतवणूक करणे फायदेशीर होईल जी पुढील वर्षी आपल्या कामी येईल.

  • धनू -

२०२२ चे वर्ष धनु जातकांसाठी मध्यम फलदायी ठरणार आहे. ह्या वर्षी आपण भरपूर प्रवास करणार असल्याने आपणास स्वतःला ओळखण्याची व समजण्याची संधी मिलेल. जेथे सहसा कोणी जात नाहीत किंवा इतरांना त्याची विशेष माहिती नसते अशा ठिकाणी आपण प्रवासास जाल. त्यामुळे आपण रोमांचित व्हाल. ह्या वर्षी आपणास धाडस करण्याच्या अनेक संधी मिळतील. त्यामुळे आपल्या आयुष्यातील संस्मरणीय वर्षात ह्या वर्षाची गणना केली जाईल. वर्षाच्या सुरवाती पासूनच आर्थिक बाबतीत आपणास काही संधी मिळतील, त्या वाया दवडू नका. ह्या वर्षात केलेले परदेश प्रवास यशस्वी होतील. ज्यांनी ह्यासाठी प्रयत्न केले आहेत त्यांना वर्षाच्या मध्यापूर्वी परदेशी जाण्याची संधी मिळेल व ज्यांना त्या नंतर जायचे आहे त्यांना त्यांच्या स्वतःमुळेच विलंब होईल. ह्या वर्षात सतत काही ना काही कारणाने आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने ह्या वर्षी आपणास आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कुटुंबियांशी आपला सलोखा राहील. बराच वेळ आपण त्यांच्या पासून दूर राहिल्याने अधून मधून आपण अति भावुक व्हाल. अशा वेळी कुटुंबीयांची आठवण आपणास सतावत राहील. विशेषतः आपण आपल्या माते पासून जास्त दूर राहाल, मात्र त्यामुळे आपल्यातील प्रेम अधिक वृद्धिंगत होईल. अशा प्रकारे हे वर्ष आपणास अनेक नवीन अनुभव देणारे आहे.

  • मकर -

२०२२ चे वर्ष मकर राशीच्या व्यक्तींसाठी खुपच चांगले आहे. आपल्यात भरपूर आत्मविश्वास असल्याने अनेक बाबतीत आपण यशस्वी व्हाल याकडे ग्रहमान अंगुली निर्देश करत आहे. आपली प्रकृती उत्तम राहील आपल्या प्राप्तीत वाढ कशी करायची याकडे आपण अधिक लक्ष द्याल. त्यानुसार काम केल्यास आपणास चांगले परिणाम मिळतील. ज्यांना परदेशात जाण्याची इच्छा आहे त्यांना सुद्धा केलेल्या प्रयत्नात यश प्राप्त होण्याची संभावना आहे. कुटुंबातील लहान व्यक्ती आपल्यावर प्रेम करू लागेल व आपल्याशी मिळून मिसळून राहील. त्यामुळे आपल्या मनात सुद्धा त्याच्या बद्धल प्रेम भावना निर्माण होऊन त्याच्यासाठी काहीही करण्यास आपण तयार व्हाल. आपल्या हातून महत्वाची संधी जाऊन आपल्याला पश्चाताप करावा लागू नये, म्हणून आपणास अति आत्मविश्वासा पासून दूर राहावे लागेल. योग्य वेळी योग्य काम करून आपला फायदा होईल. आपणास अनेक बाबतीत कुटुंबातील वडिलधाऱ्यांचा सल्ला घ्यावा लागेल, जो त्यांच्या अनुभवावर आधारित असेल. त्यामुळे आपणास सकारात्मक परिणाम मिळेल. वर्षाच्या मध्यास आपल्या प्रकृतीत चढ - उतार येण्याची संभावना असल्याने आपणास आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल. आपणास आजारपण येण्याची संभावना आहे. वर्षाचे अखेरचे चार महिने आपल्यासाठी उत्तम आहेत. आपणास जे काम अनेक दिवसांपासून करावयाचे होते व ज्यात आपला खोळंबा झाला होता ते काम सुद्धा पूर्ण होईल. हे वर्ष आर्थिक दृष्ट्या अत्यंत अनुकूल असून आपल्या योग्य आर्थिक नियोजनाच्या मदतीने आपली आर्थिक स्थिती अधिक मजबूत करण्याचा प्रयत्न करावा. अशी संधी वारंवार मिळणार नाही. कायदेशीर बाबीत आपणास यश मिळू शकते.

  • कुंभ -

कुंभ राशीच्या व्यक्ती धुनी असतात. मनात येईल ते पूर्ण केल्या शिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. स्वतःसाठी एखादा नियम बनवून त्यानुसार वागण्यास प्राधान्य देत असल्याने आपले विचार ते सहसा बदलत नाहीत, परंतु त्यात महत्वाची बाब म्हणजे गुप्तता सुद्धा जास्त असते. त्यांचे मन समजून घेणे येऱ्या गबाळ्याचे काम नाही व त्यामुळे अचानक निर्णय घेऊन समोरच्या व्यक्तीस ते हतबल करतात व तीच त्यांची मोठी शक्ती आहे. २०२२ चे वर्ष कुंभ राशीच्या लोकांसाठी मध्यम फलदायी आहे. ह्या वर्षी आपणास आपल्या दोन बाबींवर अधिक लक्ष द्यावे लागेल. त्यात एक म्हणजे आपली प्रकृती, जी अधून मधून आपणास त्रास देऊ शकते, व दुसरी म्हणजे आपले खर्च. ह्या वर्षी आपल्या खर्चात काही ना काही कारणाने खर्च वाढणार असल्याने आपणास त्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. जर खर्च नियंत्रणात राहिले नाहीत तर आपली आर्थिक स्थिती डळमळीत होऊ शकते. आपल्यापैकी काहीजणांना परदेशात स्थायी होण्यात यश मिळू शकेल, ज्यामुळे आपली इच्छापूर्ती होऊन आपणास आनंद प्राप्त होईल. ह्या वर्षात आपणास शासनाकडून सुद्धा काही लाभ मिळण्याची संभावना आहे. विशेषतः व्यापारीवर्गास. कामाच्या ठिकाणी आपणास सहकाऱ्यांशी नीट वागावे लागेल, जर त्यांच्याशी आपले संबंध बिघडले तर त्याचा आपल्या नोकरीवर परिणाम होण्याची संभावना आहे. त्यामुळे कामाच्या ठिकाणी सावध राहावे. मित्रांचे सहकार्य मिळाल्याने आपणास कामात यश प्राप्त होईल. आपण जर त्यांना प्रस्ताव दिलात तर ते आपल्या व्यवसायात भागीदारी करू शकतील. विद्यार्थ्यांना अभ्यासात आपले कष्ट वाढवावे लागतील. आपले कष्ट हेच आपले ह्या वर्षाचे शस्त्र होऊन आपणास मदत करू शकेल. कौटुंबिक जीवन ताण - तणावाचे राहिले तरी वेळोवेळी ते संपुष्टात येतील. ह्या वर्षात आपण आपल्या जुन्या योजनांवर पुढाकार घेऊन काम कराल व त्यात यश प्राप्त कराल. ह्या वर्षात आपण जेथे काम करता तेथे कोणाशी वाद होणार नाहीत याची काळजी आपणास घ्यावी लागेल, अन्यथा कामावरून आपले लक्ष इतरत्र जाऊन आपल्या हातून चुका होऊ लागतील. ह्या चुका पुढे जाता आपल्यासाठी त्रासदायक ठरू शकतील. स्वतःवर विश्वास ठेवून काम केल्यास यश आपल्या समोर चालतच येईल.

  • मीन

हे वर्ष आपल्यासाठी खूपच चांगले परिणाम घेऊन येणारे आहे. ह्या वर्षात आपण बरेच काही करू शकाल. काही नवीन प्रयोग सुद्धा कराल. विद्यार्थ्यांना नवीन काही शिकावयास मिळेल, तर व्यापाऱ्यांना नवीन पद्धतींचा वापर करावयास मिळेल. नोकरीत आपल्या कौशल्याच्या जोरावर प्रगती साधून स्वतःच्या उपस्थितीची जाणीव करून देऊ शकाल. ह्या वर्षी आपण खूप प्रयत्न कराल व स्वतःला एका उंचीवर नेण्यासाठी खूप जोर लावाल. मीन राशीच्या व्यक्ती गुरूच्या ज्ञानाने परिपूर्ण असतात, त्यामुळे आपण वस्तुस्थिती समजून घेऊन त्यानुसार निर्णय घेऊ शकता, हेच आपले वैशिष्ट्य आहे. परंतु आपली रास हि जलतत्वाची व द्विस्वभावी असल्याने आपण अति भावुक होता व त्यामुळे अनेकदा आपणास निर्णय घेण्यात अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत आपण ध्यान - धारणा केल्यास आपल्या स्वतःवर नियंत्रण ठेवून भावुकता कमी करू शकाल. तसे केल्याने योग्य वेळी योग्य निर्णय घेण्यात आपण यशस्वी होऊ शकाल. आपणास इतरांचे गुण लवकर समजतात व त्यांच्या गुणांचा आपण आदर सुद्धा करता. आपल्यातील हे वैशिष्ट्य आपणास चांगले परिणाम मिळवून देईल. ह्या वर्षात आपली प्रकृती बिघडण्याची संभावना असल्याने आपणास त्याची काळजी घ्यावी लागेल. आपली महत्वाकांक्षा पूर्ण होईल. आपण पूर्वी कोणाला उसने पैसे दिले असतील व त्याचा आपणास विसर पडला असेल तर ह्या वर्षी ते पैसे परत मिळण्याची दाट संभावना आहे. त्यामुळे आपली आर्थिक स्थिती मजबूत होईल. आपणास जर परदेशात जाण्याची इच्छा असेल तर ह्या वर्षी आपली इच्छापूर्ती होईल. आपण धार्मिक कार्यात सुद्धा सहभागी व्हाल व त्यात आपला सन्मान सुद्धा होईल. त्यासाठी आपणास खूप खर्च करावा लागेल. आपणास आपले आर्थिक नियोजन योग्य प्रकारे करावे लागेल, कारण पैसा जसा येईल तसाच तो खर्च सुद्धा होईल व त्यामुळे आपली आर्थिक स्थिती डळमळीत होईल. त्यासाठी आपणास सुरवातीपासूनच प्रयत्नशील राहावे लागेल. ह्या वर्षात स्वतःवर विश्वास ठेवून कामे केल्यास आपणास त्याचे चांगले परिणाम मिळू शकतील.

Last Updated : Jan 1, 2022, 10:33 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.