ETV Bharat / bharat

Honor Killing News : आठ महिन्यानंतर घरी आलेल्या तरुणीची आई-वडिलांकडून हत्या, नेमकं काय घडलं? - मुझफ्फरनगर गुन्हे बातम्या

उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगरमध्ये आई-वडिलांनीच आपल्या मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडलीय. हा ऑनर किलिंगचा प्रकार असण्याची शक्यता आहे. पोलिसांनी याचा तपास सुरू केलाय. (Honor Killing in Muzaffarnagar)

Honor Killing
ऑनर किलिंग
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 27, 2023, 10:55 AM IST

मुझफ्फरनगर (उत्तर प्रदेश) : उत्तर प्रदेशच्या मुझफ्फरनगर जिल्ह्यात ऑनर किलिंगची एक धक्कादायक घटना घडली आहे. येथे एका मुलीची तिच्या जन्मदात्या आई-वडिलांनीची गळा आवळून हत्या केली. हत्येनंतर त्यांनी मुलीचा मृतदेह नदीत फेकून दिला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेतलाय. मुलीच्या पालकांची रवानगी पोलीस कोठडी करण्यात आली असून त्यांची चौकशी सुरू आहे.

या कारणामुळे केली हत्या : या प्रकरणी अधिक माहिती अशी की, या मुलीला कोर्टात प्रियकराच्या बाजूने साक्ष द्यायची होती. याचा राग मनात धरून आई-वडिलांनी तिची हत्या केली. मिळालेल्या माहितीनुसार, मुझफ्फरनगरमधील गोयला गावचे प्रमुख धरमपाल यांना गावातील रहिवासी विजेंदर आणि त्यांची पत्नी कुसुम यांनी त्यांच्या १९ वर्षांच्या मुलीची हत्या करून तिचा मृतदेह नदीत फेकल्याची माहिती सर्वप्रथम कळाली. यानंतर त्यांनी पोलिस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची तक्रार दिली. पोलिसांनी ग्रामस्थ आणि स्थानिकांच्या मदतीने शनिवारी इंचोडा नदीत मुलीच्या मृतदेहाचा शोध सुरू केला. अखेर सायंकाळी रतनपुरी येथील भानवाडा गावाजवळील नदीतून मृतदेह बाहेर काढण्यात आला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून गुन्हा दाखल केलाय.

शनिवारी तरुणीची साक्ष होणार होती : या संदर्भात पोलीस अधिकारी हिमांशू गौरव यांनी अधिक माहिती दिली. 'या तरुणीचे मेरठच्या मवाना भागात राहणाऱ्या राहुलसोबत प्रेमसंबंध होते. वर्षभरापूर्वी ते दोघे सोबत पळून गेले होते. या प्रकरणी शहापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी आठ महिन्यांपूर्वी मुलीचा शोध लावून तरुणाची तुरुंगात रवानगी केली, असे त्यांनी सांगितले. राहुल सध्या तुरुंगात आहे. या प्रकरणी शनिवारी तरुणीची साक्ष होणार होती. तिला प्रियकराच्या बाजूने साक्ष द्यायची होती. यामुळे आई-वडिलांनी तिची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी मुलीचे वडील विजेंदर आणि आई कुसुम यांना ताब्यात घेतलंय. दोघांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिसांना नदीपात्रात गोणीत बंद केलेला मृतदेह आढळून आला होता.

हेही वाचा :

  1. Young Girl Suicide Case: फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन दगाबाज मित्र करायचा ब्लॅकमेल; तरुणीची आत्महत्या
  2. Kaushambi Honor Killing : निर्दयी बापासह भावांनी केली हत्या, प्रियकराशी बोलणं बेतलं जिवावर
  3. Bihar Rape : आणखी एक 'निर्भया'! अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून रस्त्याच्या कडेला फेकले; 72 तासांनी आली शुद्ध

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.