नवी दिल्ली/ग्रेटर नोएडा: ग्रेटर नोएडातील थाना डनकौर भागातील एका गावात बहिणींनी आपापसात लग्न ( homosexual marriage in noida ) केले. ही बाब तेव्हा उघडकीस आली जेव्हा दिल्ली आणि नोएडा पोलीस घरातून हरवलेल्या मुलीचा शोध घेत असताना त्यांना परत मिळवण्यासाठी एका ठिकाणी पोहोचले, तेव्हा समजले की दोघीही वैवाहिक जीवन जगत ( homosexual cousin sister ) आहेत. याची माहिती मिळताच घरच्यांनी त्यांना बराच वेळ समजावले, मात्र त्यांनी कोणाचेच ऐकले नाही. यानंतर पोलिसांनी त्यांना नातेवाईकासह परत पाठवून दिले.
दोघी म्हणाल्या आम्ही खुश : मावशी आणि मामाची मुलगी कधी एकमेकांच्या प्रेमात पडली आणि त्यांनी एकमेकांसोबत जगण्याची अन् मरण्याची शपथ केव्हा घेतली, हे घरच्यांना कळलेच नाही. त्या दोघी बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसात दाखल झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना दिल्लीतील एका सोसायटीतून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या हवाली दिले. दनकौर पोलीस ठाण्याचे प्रभारी राधा रमण सिंह यांनी सांगितले की, दनकौर पोलीस स्टेशन हद्दीतल्या एका गावातील कुटुंबीय पोलीस ठाण्यात आले आणि त्यांनी 20 एप्रिल रोजी त्यांची मुलगी हरवल्याची तक्रार नोंदवली. तपासात या मुलीच्या मावशीची मुलगीही सापडत नसल्याचे समोर आले. दिल्ली पोलीस या मुलीचा शोध घेत होते. दिल्ली आणि दनकौर पोलिसांच्या संयुक्त पथकाने शोध सुरू केला असता, दोघींनाही दिल्लीतील एका सोसायटीतून ताब्यात घेऊन नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले. पोलिसांच्या चौकशीत दोघींनी सांगितले की, त्यांनी दिल्लीतील एका मंदिरात लग्न केले होते, त्यानंतर दोघेही खुश आहेत.
समलैंगिक संबंधांमुळे लग्न : दुसरीकडे घरच्यांनी या दोघींना अनेकदा समजावून सांगितले. समाजासमोर आम्ही कोणता चेहरा दाखवू? अशी विनवणी केली. पण त्याचा मुलींवर काहीही परिणाम झाला नाही. त्या दोघी एकत्र राहण्यावर ठाम राहिल्या. त्यांच्या आग्रहापुढे घरातील सदस्यही हतबल झाले. दनकौर पोलीस ठाण्याचे प्रभारी राधा रमण सिंह म्हणाले की, दोन्ही मुलींचे समलैंगिक संबंधांमुळे लग्न झाले. दोघीही प्रौढ आहेत. त्यांना स्वतःच्या इच्छेने एकमेकांसोबत राहायचे आहे. त्यांना ओळखीच्या नातेवाईकांसह सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.