ETV Bharat / bharat

Ganeshotsav 2021 : असा आहे अष्टविनायकांपैकी एक असलेल्या लेण्याद्रीच्या गिरिजात्मकाचा इतिहास, वाचा.... - गणेशोत्सव 2021

गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकांमधील या लेण्याद्रीचा काय इतिहास आहे, जाणून घेऊया.

enyandri temple in junnar
enyandri temple in junnar
author img

By

Published : Sep 12, 2021, 6:04 AM IST

पुणे - गिरिजात्मज (लेण्याद्री) हे पुणे जिल्ह्यातील गणपतीचे देऊळ आहे. हे देऊळ अष्टविनायकांपैकी एक आहे. अष्टविनायकातला हा एकमेव असा गणपती आहे, जो डोंगरात एका गुहेत आहे. पार्वतीने आपणास पुत्र व्हावा म्हणून या डोंगरात १२ वर्षे तपश्चर्या केली. ही तपश्चर्या फलद्रूप होऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला बटुरूपात प्रकट झाले. गिरिजेचा म्हणजे पार्वतीचा आत्मज (पुत्र) म्हणून या गणपतीला ‘गिरिजात्मज’ हे नाव मिळाले. अष्टविनायकांमधील या लेण्याद्रीचा काय इतिहास आहे, जाणून घेऊया.

प्रतिक्रिया

म्हणून याला लेण्याद्री असे नाव पडले -

जुन्नर तालुक्यातील कुकडी नदीच्या तीरावर लेण्याद्री गाव वसले आहे. लेण्याद्रीजवळच्या या डोंगरात १८ गुहा आहेत. त्यातील ८व्या गुहेत गिरिजात्मकाचे देऊळ आहे. या गुहेला गणेश लेणी असेही म्हणतात. देवळात येण्यासाठी ३०७ पायऱ्या चढाव्या लागतात. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे पूर्ण देऊळ एका अखंड दगडापासून बनले आहे. हे स्थान डोंगर खोदून तयार केलेले आहे. जुन्नर तालुक्याच्या उत्तरेला हतकेश्वर आणि सुलेमानच्या डोंगररांगांमध्ये असलेल्या २८ लेण्यांपैकी एका लेण्यात गणपतीची मूर्ती असल्याने त्या सर्वच लेण्यांना ‘गणेश लेणी’ असे म्हणतात. हा भाग गोळेगाव या गावाच्या हद्दीमध्ये आहे. जवळूनच कुकडी नदी वाहते. या ठिकाणाचा उल्लेख ‘जीर्णापूर’ व ‘लेखन पर्वत’ असा झाल्याचे आढळते. पार्वतीने ज्या गुहेत तपश्चर्या केली असा समज आहे, त्याच गुहेमागे कुणा गणेश भक्ताने गणपतीची ही मूर्ती कोरली आहे. हे देवस्थान लेण्यांमध्ये आहे म्हणून याला लेण्याद्री, असे नाव पडले.

हेही वाचा - Ganeshotsav 2021 : पुण्यातील मानाचे पाच गणपती आणि त्यांचा इतिहास!

जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणी

लेण्याद्रीच्या पायऱ्या चढून गेल्यावर प्रथम चैत्यगृहाचे लेणे लागते व त्यानंतरच्या प्रशस्त गुहेमध्ये गणपती. बहुतेक सर्व लेण्यांसमोर ओसरी आहे. सहाव्या लेण्यातील चैत्य विहार अजिंठा-वेरूळची लेणी येथील नवव्या लेण्याशी मिळताजुळता आहे. चैत्यगृहात वैशिष्ट्यपूर्ण अशा पाच खांबांच्या दुतर्फा रांगा आहेत. हे खांब इ.स. पूर्व ९० ते इ.स. ३०० या सातकारणी कालखंडातील असल्याची नोंद आहे. अष्टकोनी खांबाच्या तळाशी तळखडय़ावर व वरच्या टोकाशी जलकुंभाची प्रकृति आहे. जलकुंभाच्या वरच्या भागात चक्रावर वाघ, सिंह, हत्ती यांच्या शिल्पाकृती कोरलेल्या आहेत. छताला अर्ध गोलाकार फिरणाऱ्या लाकूडसदृश कमानी कोरल्या आहेत. चैत्यगृहाच्या मध्यवर्ती घुमटाकार सहा फूट प्रार्थनास्थळ हे साडेचार फूट उंच जोत्यावर एकसंध कोरलेले आहे. सातवे लेणे थोडे उंचावर असून, जुन्नर लेण्यातील सर्वांत प्रशस्त लेणं आहे. मंदिर या वास्तुसंकल्पनेतील खांब, कमानी, मंडप, शिखर या कुठल्याच गोष्टी नाहीत. खांबविरहित ५७ फूट लांब व ५२ फूट रुंद गुहा हेच मंदिर आहे.या मूर्ती इतर अष्टविनायकांप्रमाणे आखीव रेखीव नाही. ही गुहा अशाप्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे तोपर्यंत प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. ही गुहा कोणी बनवली, कधी बनवली याची कोणतीच नोंद नाही.या देवस्थानाच्या पूर्व व पश्चिम बाजूंस २८ लेणी आहेत. एकाच मोठया आकाराच्या शिळेत ही लेणी कोरली आहेत. लेण्याद्री हे देवस्थान सात क्रमांकाच्या गुहेत असून देवस्थानासमोरील सभामंडप ५१ फूट रुंद व ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. देवस्थानाजवळ पाण्याच्या चार टाक्या असून त्यांना वर्षभर पाणी असते.

अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती -

अष्टविनायकांपैकी एकमेव गणपती असा आहे की, जो गिरी म्हणजे पर्वताच्या सानिध्यात वास्तव्याला आहे. ते स्थान म्हणजे लेण्याद्री. जुन्नरपासून सात किलोमीटर अंतरावर लेण्याद्रीचा डोंगर आहे. मंदिराच्या पूर्व व पश्चिम बाजूस २८ लेणी आहेत. एकाच मोठ्या आकाराच्या शिळेत मंदिराची लेणी कोरली आहे. लेण्याद्री मंदिर सात क्रमांकाच्या गुहेत असून, तेथे पाषाणात कोरलेली गणपतीची मूर्ती आहे. समोरील सभामंडप ५१ फूट रुंद आणि ५७ फूट लांब आहे. त्याला कोठेही खांबाचा आधार नाही. ही गुहा अशा प्रकारे बनवली आहे की जोपर्यंत आकाशात सूर्य आहे, तोपर्यंतच प्रकाश आत येत राहणार. गुहेत विजेचा एकही बल्ब नाही. जवळपास ३०० पायऱ्या चढून गणपतीच्या दर्शनाला जावे लागते.

हेही वाचा - डाव्या आणि उजव्या सोंडेचे दोन गणपती एकाच व्यासपीठावर असलेले पद्मालय तीर्थक्षेत्र! वाचा इतिहास...

विशेष उत्सव म्हणजे देवजन्मकीर्तन सोहळा -

गणेशोत्सवात या ठिकाणी साजरा होणारा विशेष उत्सव म्हणजे देवजन्मकीर्तन सोहळा. गणेश प्रतिष्ठापनेदिवशी सकाळी १० वाजता देवजन्माचे कीर्तन होते. भाविक या कीर्तनासाठी आवर्जून उपस्थित असतात. गोळेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत हे गिरीस्थान आहे. कीर्तन झाल्यानंतर अन्नप्रसादाचे वाटप केले जाते. गणेशोत्सवामध्ये मंदिराच्या गर्भगृहात फुलांची आकर्षक सजावट केली जाते. या काळात परिसरातील हजारो भाविक दर्शनासाठी मंदिरात हजेरी लावतात. पण यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाच्या नियमांचे पालन केले जात आहे.

गिरिजात्मजाच्या जन्माची कथा -

गिरिजात्मज नावाने पूजनीय असलेल्या लेण्याद्री गणेशाच्या जन्माच्या विविध आख्यायिका सांगितल्या जातात. गिरीजा म्हणजे पार्वती, आत्मज म्हणजे मुलगा. पार्वतीने आपल्याला पुत्रप्राप्ती व्हावी म्हणून लेण्याद्रीच्या डोंगरात तपश्चर्या केली. मन एकाग्र व्हावे म्हणून मातीची बालमूर्ती बनवली. याच मूर्तीची अनन्यभावाने सेवा केली. पार्वतीच्या भक्तीला यश येऊन श्री गजानन भाद्रपद शुद्ध चतुर्थीला प्रकट झाले, तो हा गिरिजात्मज, असे सांगितले जाते.

२८ विहार आणि पाण्याची १५ कुंडे -

जुन्नर परिसरात मोठ्या प्रमाणात बौद्धकालीन प्राचीन कोरीव लेण्यांचा समूह आहे. यातील लेण्याद्रीच्या डोंगरावरील लेणी गणेश समूहात मोडतात. या लेण्यांतील मुख्य गणेश लेणीमध्ये कोणत्याही खांबांच्या आधाराशिवाय सभामंडप कोरण्यात आला आहे. सभामंडपाच्या तिन्ही बाजूला ओवऱ्या कोरलेल्या आहेत. यातील उत्तरेकडील ओवरीत श्री गिरिजात्मजाची मूर्ती कोरलेली आहे. गणेश लेणी समूहात २ चैत्यगृहे, २८ विहार, पाण्याची १५ कुंडे आणि ६ शिलालेख आहेत.

हेही वाचा - 'गणेश महिमा' या मालिकेत आपण आज गणेशाच्या तिसऱ्या नावाबद्दल जाणून घेणार आहोत

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.