भोपाळ - वैद्यकीय शिक्षण मंत्री विश्वास नारंग यांनी एमबीबीएस अभ्यासक्रमात आरएसएसचे शिक्षण देण्याचे वादग्रस्त विधान केले. त्यानंतर उच्च शिक्षणमंत्री मोहन यादव यांनीही तशीच भूमिका सोमवारी जाहीर केली आहे. मध्य प्रदेशमधील महाविद्यालयांमध्ये हिंदू धर्माचे शिक्षण दिले जाणार असल्याचे यादव यांनी जाहीर केले.
उच्च शिक्षणमंत्री मोहन यादव म्हणाले, की बीएच्या विद्यार्थ्यांना धार्मिक शिक्षणही दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांना तुलसीदास यांच्यासह भगवान राम आणि हनुमानाच्याबाबत शिक्षण दिले जाणार आहे. त्यासोबत वेद, उपनिषद आणि पुराणाचे शिक्षणही दिले जाणार आहे. नव्या शिक्षण धोरणानुसार अभ्यासक्रमात याचा समावेश करण्यात येणार आहे. या सत्रापासून हे शिकविण्यात येणार आहे.
हेही वाचा-केंद्र सरकार लवकरच फ्लेक्स इंजिन पॉलिसी आणणार - नितीन गडकरी
एमबीबीएसचे विद्यार्थी शिकणार आरएसएसचा धडा
उच्च शिक्षणमंत्री मोहन यादव म्हणाले, की बीएच्या प्रथम वर्षात दर्शनशास्त्रात नवा अभ्यासक्रम जोडला जाणार आहे. हा विषय पर्यायी असणार आहे. भविष्यात वाईट शक्तींपासून धर्माचे नुकसान टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना धार्मिक आणि नैतिक शिक्षणाची आवश्यकता आहे. कारण, विद्यार्थी हे देशाचा पाया आहेत.
हेही वाचा-कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता