ETV Bharat / bharat

Hindu temple vandalised : कराचीत हिंदू मंदिराची तोडफोड, अज्ञात संशयितांचा शोध सुरू

पाकिस्तानच्या कराचीतील कोरंगी भागात बुधवारी एका हिंदू मंदिराची तोडफोड ( Hindu temple vandalised in karachi) करण्यात आली. मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी तोडफोड केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. पाकिस्तानात अल्पसंख्याक समुदायांवर होणाऱ्या अल्पसंख्याक घटनात घटनात वाढ झाली आहे. ( Increase in atrocities in Pakistan) पाकिस्तान पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

Hindu temple
हिंदू मंदिर
author img

By

Published : Jun 9, 2022, 5:37 PM IST

कराची : पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील कराची येथे काही जणांनी एका हिंदू मंदिरावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. शहरातील कोरंगी क्रमांक 5 परिसरात ही घटना घडली. मंदिरावर हल्ला करणाऱ्या अज्ञात संशयितांचा शोध सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अज्ञातांविरुद्ध गुन्हा - याप्रकरणी कोटरी पोलिस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकृत अंदाजानुसार, पाकिस्तानमध्ये 7.5 दशलक्ष हिंदू राहतात. मात्र, समाजानुसार देशात ९० लाखांहून अधिक हिंदू आहेत. पाकिस्तानातील बहुतांश हिंदू लोकसंख्या सिंध प्रांतात स्थायिक आहे. त्यांच्यावर अनेकदा बहुसंख्यांक सामाजाकडून अन्याय होत असल्याच्या तक्रारी माध्यमांमध्ये येत आहेत.

मंदिरातील मूर्तींची तोडफोड - हिंदू पुजाऱ्याचे निवासस्थान असलेल्या मरी माता मंदिरावर बुधवारी रात्री उशिरा हल्ला झाला. त्यामुळे हिंदू समाजात भीतीचे ( Fear in Hindu society ) वातावरण निर्माण झाले आहे. हिंसक जमावाने पुजाऱ्याच्या घरावर हल्ला करून मंदिरातील मूर्तींची तोडफोड केली. पाकिस्तान पोलिसांनी या प्रकरणी अद्याप कोणालाही अटक केलेली नाही.

परिसराला पोलिसांचा वेढा - मोटारसायकलवरून आलेल्या सहा ते आठ जणांनी मंदिरावर हल्ला ( Attack on a temple in Karachi ) केल्याचे प्रत्यक्षदर्शींचे सांगितले. "सहा ते आठ अज्ञात संशयितांनी मंदिरात प्रवेश करून तोडफोड केली," असे कोरंगीचे पोलीस उपनिरिक्षक फारूक संजरानी यांनी सांगितले. अज्ञात संशयितांना पकडण्यासाठी पोलिसांनी परिसराला वेढा घातल्याची माहिती त्यांनी दिली. दरम्यान गेल्या ऑक्टोबरमध्ये सिंध प्रांतातील कोत्री येथील ऐतिहासिक मंदिराची अज्ञातांनी विटंबना केली होती. देशात आत्याचारांच्या घटनात वाढ ( Increase in atrocities in Pakistan) झाली असून अल्पसंख्याक समुदाय भयभित झाला आहे.

हेही वाचा- गेल्या आठ वर्षांत भारताची 'जैव-अर्थव्यवस्था' आठ पटीने वाढली - मोदी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.