ETV Bharat / bharat

मुस्लिम महिलांना अपहरण अन् बलात्काराची धमकी; यूपीत हिंदू पुजाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल, तपास सुरू - Hindu Priest Threrat Muslim Women

लखनौपासून 100 किमी अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यातील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करतानाचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एक हिंदू पुजारी मुस्लिम महिलांचे (Hindu Priest Threrat Muslim Women) अपहरण आणि बलात्कार करण्याची धमकी देताना दिसत आहे.

Hindu Priest Threrat
सभेत बोलताना हिंदु पुजारी
author img

By

Published : Apr 8, 2022, 3:18 PM IST

लखनौ - उत्तर प्रदेश पोलिसांनी (UP Police) लखनौपासून सुमारे 100 किमी अंतरावर असलेल्या सीतापूर जिल्ह्यातील एका मशिदीबाहेर एका सभेला संबोधित करतानाच्या व्हिडिओची चौकशी सुरू केली आहे. ज्यामध्ये एक हिंदू पुजारी मुस्लिम महिलांचे (Hindu Priest Threrat Muslim Women) अपहरण आणि बलात्कार करण्याची धमकी देताना दिसत आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओंमध्ये भगवा पोशाख घातलेला एक व्यक्ती दिसत आहे. तो खैराबाद या छोट्या शहरातील स्थानिक महंत आहे.

  • TRIGGER WARNING!
    A Mahant in front of a Masjid in the presence of Police personals warns that He would K!dnap Muslim Women and ₹@pe them in Open.

    According to the locals near Sheshe wali Masjid, Khairabad, Sitapur. This happened on 2nd Apr 2022, 2 PM. @sitapurpolice @Uppolice pic.twitter.com/wkBNLnqUW0

    — Mohammed Zubair (@zoo_bear) April 7, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुस्लिम महिलांचे अपहरण करून बलात्कार करेल - मायक्रोफोनवर बोलताना हा व्यक्ती जातीयवादी आणि प्रक्षोभक वक्तव्य करताना या व्हिडिओमध्ये दिसत आहे. त्याच्या भाषणाने उत्साही झालेला जमाव 'जय श्री राम'च्या घोषणा देऊन त्याचे मनोबल वाढवताना दिसत आहे. त्या व्यक्तीने त्याच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप केला आणि त्यासाठी 28 लाख रुपये जमा करण्यात आल्याचे सांगितले. त्यानंतर तो व्यक्ती म्हणतो की, जर कोणी मुस्लिम भागातील मुलीचा छळ केला तर तो मुस्लिम महिलांचे अपहरण करेल आणि सार्वजनिक ठिकाणी तिच्यावर बलात्कार करेल. यावेळी जमावाने मोठ्या जल्लोषात या धमकीचे समर्थन करतानाचे या व्हिडिओत दिसत आहे.

वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून तपास सुरू - व्हिडिओ शेअर करताना, फॅक्ट-चेक वेबसाइट AltNews चे सह-संस्थापक मोहम्मद जुबेर म्हणाले की, हा व्हिडिओ 2 एप्रिल रोजी शूट करण्यात आला होता, परंतु पाच दिवसांनंतरही पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यांच्या ट्विटला उत्तर देताना सीतापूर पोलिसांनी सांगितले की, वरिष्ठ अधिकारी या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि वस्तुस्थितीच्या आधारे कारवाई केली जाईल. तसेच या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगामार्फत चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.