ETV Bharat / bharat

Hindu Activists Detained By Police: मुस्लिम व्यापाऱ्यांविरोधात बहिष्काराची हाक दिल्याने हिंदू कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात - Karnataka Police

Hindu Activists Detained By Police: कर्नाटक पोलिसांनी मंगळवारी बेंगळुरूच्या व्ही.व्ही. पुरम मोहल्ला येथील सुब्रमण्यमेश्वर मंदिरात मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करू देण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 3 हिंदू कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. बेंगळुरूमधील हनुमंतनगर पोलिसांनी राष्ट्र रक्षा पडेचे पुनीत केरेहल्ली यांना कोठडीत टाकण्यात आले आहे.

Hindu Activists Detained By Police
Hindu Activists Detained By Police
author img

By

Published : Nov 29, 2022, 5:00 PM IST

बेंगळुरू: कर्नाटक पोलिसांनी Karnataka Police मंगळवारी बेंगळुरूच्या व्ही.व्ही. पुरम मोहल्ला येथील सुब्रमण्यमेश्वर मंदिरात मुस्लिम व्यापाऱ्यांना व्यवसाय करू देण्याच्या निर्णयाला विरोध करण्याची धमकी दिल्याप्रकरणी 3 हिंदू कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आले. बेंगळुरूमधील हनुमंतनगर पोलिसांनी राष्ट्र रक्षा पडेचे पुनीत केरेहल्ली यांना कोठडीत टाकण्यात आले आहे.

चिकपेट मतदारसंघातील भाजप आमदार उदय गरुडाचर म्हणाले की, हिंदू व्यापारी दर्गे आणि मशिदींच्या आसपास व्यवसाय करू शकतात. ते म्हणाले, "हिंदू समाजातील लोक इतरांना त्रास देत नाहीत. काही लोक समस्या निर्माण करून आक्षेप घेतात. हिंदू कार्यकर्त्यांनी मांडलेल्या मागण्यांमुळे कोणताही नवा नियम होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सर्व धर्माच्या लोकांना परवानगी देण्यात आली.

ते म्हणाले, 'जुन्या प्रथा पाळल्या जातील. केवळ हिंदू व्यापाऱ्यांना संधी देणे योग्य नाही. जर कोणी जत्रेत त्रास देण्याचा प्रयत्न केला, तर त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल. आम्ही निवडून आलेले प्रतिनिधी आहोत आणि सर्व धर्माच्या लोकांची मते घेऊन निवडून आलो आहोत. यात भेदभावाला थारा नाही. वर्षानुवर्षे चालत आलेली परंपरा पुढे नेली जाईल, असे ते म्हणाले.

हिंदू कार्यकर्त्यांनी या निर्णयाबद्दल संताप व्यक्त केला होता आणि हिंदू मंदिरांमध्ये मुस्लिम व्यापाऱ्यांवर बहिष्कार टाकला होता. त्यांनी असा युक्तिवाद केला की जेव्हा मुस्लिम कोणत्याही हिंदू व्यापाऱ्यांना मशिदींच्या परिसरात व्यवसाय करू देत नाहीत, तेव्हा हे नियम फक्त हिंदू मेळ्यांनाच का लागू करायचे? त्यांनी आमदार गरुडचार यांना ते प्रतिनिधित्व करत असलेल्या चिकपेट विधानसभा मतदारसंघातील मशिदींच्या परिसरात हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करण्यास परवानगी देण्याचे आव्हानही दिले.

आपल्या मतदारसंघातील मशिदींच्या परिसरात हिंदू व्यापाऱ्यांना व्यवसाय करू न दिल्यास कारवाईही सुरू केली जाईल, अशी प्रतिक्रिया आमदार गरुडचार यांनी दिली होती. दरम्यान, या जत्रेत हजारो भाविक सहभागी झाले होते आणि कडेकोट पोलीस बंदोबस्तात सुब्रमणेश्वराची मूर्ती चांदीच्या रथावरून मिरवणुकीत काढण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.