ETV Bharat / bharat

VIDEO हिमाचलमधील दरड दुर्घटनेत दुर्घटनेत 10 जणांचा मृत्यू, 14 जणांची सुटका

हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे बसवर दरड कोसळली आहे. ही बस उत्तराखंडमधील हरिद्वारमधून किन्नोर येथे जात होती. ही बस हिमाचल प्रदेश परिवहन महामंडळाची आहे. बसमध्ये 40 प्रवासी होते.

हिमाचल दरड दुर्घटना
हिमाचल दरड दुर्घटना
author img

By

Published : Aug 11, 2021, 5:38 PM IST

Updated : Aug 11, 2021, 7:40 PM IST

शिमला - हिमाचल प्रदेशमधील किन्नौर येथे दरड कोसळण्याच्या घटनेत 10 जणांचे मृतदेह ढिगाऱ्याखालून काढले आहेत. तर 14 जणांची सुटका करण्यात आली आहे. दरड कोसळल्याची दुर्घटना निगुलसारीच्याजवळ राष्ट्रीय महामार्गाजवळ घडली आहे. बसवर दरड कोसळल्याने प्रवासीही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत.

दरड कोसळण्याची दुर्घटना बुधवारी दुपारी घडली आहे. राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची ये-जा सुरू असताना ही दुर्घटना घडली आहे. दुर्घटनेत काही लोक बेपत्ता झाले आहेत. प्रशासनाने काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

हिमाचल दरड दुर्घटना

हेही वाचा-एम जे अकबर अब्रुनुकसान प्रकरण; दिल्ली उच्च न्यायालयाची पत्रकार प्रिया रमानी यांना नोटीस

भाजपच्या कार्यकर्त्यांना मदत करण्याचे नड्डा यांचे आवाहन-

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी किन्नौर येथील दुर्घटनेबाबत दु;ख व्यक्त केले आहे. जे. पी. नड्डा यांनी ट्विटमध्ये म्हटले, की हिमाचल प्रदेशमधील किन्नौर जिल्ह्यातील दरड कोसळण्याची दुर्घटना अत्यंत दुखद आहे. कारण, तिथे अनेक लोक अडकल्याची बातमी आहे. आयटीबीपीची टीम ही बचावकार्यात सहभागी आहे. दुर्घटनेचा फटका बसलेल्या परिसराला मदत करावे, असे भाजपच्या कार्यकर्त्यांना नड्डा यांनी आवाहन केले.

पंतप्रधान मोदींनी केले ट्विट

हिमाचल प्रदेशमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्यासाठी शक्य ती मदत करण्याकरिता आश्वस्त केले आहे.

केंद्रीय गृहमंत्र्यांनी केले ट्विट

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही ट्विटरवर हिमाचलमधील दुर्घटनेबाबत ट्विट केले आहे. त्यांनी ट्विटमध्ये म्हटले, की मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांच्याशी चर्चा केली आहे. मदतकार्य करण्याची आयटीबीपीची आणि जखमींवर उपचार करण्याची स्थानिक प्रशासनाची जबाबदारी आहे.

हेही वाचा-हिमाचलमधील दरड कोसळण्याच्या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू, 10 जणांची सुटका

मदतकार्य सुरू- मुख्यमंत्री जयराम ठाकूर

दुर्घटनेनंतर मदतकार्य आणि बचावकार्य सुरू केल्याचे हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री जयराम ठाकूर यांनी सांगितले. घटनास्थळी एनडीआरएएफचे जवान पोहोचले आहेत. ढिगाऱ्याखाली किती लोक अडकले आहेत, याची माहिती नसल्याचे मुख्यमंत्री ठाकूर यांनी सांगितले. ढिगाऱ्याखाली 50 ते 60 लोक अडकल्याची माहिती मिळाल्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली. घटनास्थळी प्रशासकीय अधिकारी पोहोचले आहेत. बचावकार्यात बसच्या ड्रायव्हर आणि कंडक्टरला वाचविण्यात आले आहे. अजूनही घटनास्थळी दगड कोसळत आहेत. त्यामुळे त्याठिकाणी पोहोचण्यात अडचणी निर्माण होत आहे. सैन्यदलाकडून चॉपर घेण्यासाठी चर्चा सुरू आहे. चॉपरमुळे वेळेवर पोहोचून बचावकार्य करता येईल, असा विश्वास मुख्यमंत्री ठाकूर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा-चूक करूनही स्वतःची पाठ थोपटण्याचा आत्मविश्वास येतो कुठून? संजय राऊतांचा मोदी सरकारला टोला

गेल्या दोन महिन्यांपासून हिमाचल प्रदेशमध्ये दरड कोसळण्याच्या दुर्घटना सतत घडत आहेत. या दुर्घटनांमध्ये 9 जणांचा मृत्यू झाला. तर लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

Last Updated : Aug 11, 2021, 7:40 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.