कुल्लू (हिमाचल प्रदेश) : हिमाचल प्रदेशात मुसळधार पावसामुळे बियास नदीने उग्र रूप धारण केले आहे. बियास नदीच्या प्रवाहात अनेक रस्ते, पूल आणि घरे उद्ध्वस्त झाली आहेत. या आपत्तीनंतर सर्वत्र विध्वंसाचे चित्र आहे. धक्कादायक म्हणजे, बियास नदीमध्ये आतापर्यंत 20 जणांचे मृतदेह सापडले आहेत. त्यापैकी 15 जणांची ओळख पटली आहे. तर 27 जण अद्यापही बेपत्ता असल्याची माहिती आहे.
एसडीआरएफची टीम तैनात : कुल्लू जिल्ह्यात बियास नदीला आलेल्या पुरामुळे अनेक लोक बेघर झाले आहेत. आता तर बियास नदीतून मृतदेह निघू लागले आहेत. कुल्लूमध्ये बियास नदीतून पोलिसांच्या पथकाला आतापर्यंत 20 मृतदेह सापडले आहेत. तसेच, कुल्लू जिल्ह्यातील विविध भागातून आतापर्यंत २७ जण बेपत्ता आहेत, ज्यांचा पोलीस शोध घेत आहेत. जिल्हा प्रशासनाने बियास नदीच्या काठावर एसडीआरएफची टीमही तैनात केली आहे, जी दररोज नदीकाठावरील लोकांची ओळख पटवण्यात गुंतलेली आहे.
पोलीस बेपत्ता लोकांच्या शोधात गुंतले आहेत. पोलिसांच्या पथकाने जे मृतदेह ताब्यात घेतले आहेत, त्यांची ओळख पटल्यानंतर त्यांना नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येत आहे. - साक्षी वर्मा, एसपी कुल्लू
नौदल अधिकार्यांचे दोन मृतदेह सापडले : काही दिवसांपूर्वी भारतीय नौदलाचे तीन अधिकारी कुल्लू जिल्ह्यातील मनालीला भेट देण्यासाठी आले होते. आता यापैकी दोन अधिकाऱ्यांचे मृतदेह सापडले आहेत, तर एक अधिकारी अद्याप बेपत्ता आहे. हे तिन्ही अधिकारी 8 जुलै रोजी कानपूरहून मनालीला फिरायला आले होते. मात्र मनालीमध्ये पूर आला आणि नातेवाईकांनी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. भारतीय नौदलातील अधिकारी निखिल सक्सेना हा उत्तरप्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी होता. तो ९ जुलै रोजी मृतावस्थेत आढळला. तर लुधियाना, पंजाब येथील रहिवासी अमन शर्मा यांचा मृतदेह १४ जुलै रोजी सापडला होता. कानपूर येथे राहणारा अमित जाधव हा अद्याप बेपत्ता आहे. याशिवाय एसडीआरएफ टीमला बियास नदीच्या काठावर इतर अनेक लोकांचे मृतदेह सापडले आहेत.
5 मृतदेहांची ओळख पटलेली नाही : बियास नदीमध्ये आलेल्या पुरामुळे अनेक लोक बेपत्ता झाले आहेत. मृतदेह मिळाल्यानंतर पोलिस बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांशीही संपर्क साधत आहेत. बेपत्ता व्यक्तींपैकी 4 हिमाचल प्रदेश आणि 1 पंजाब आणि राजस्थानमधून बेपत्ता झालेल्यांचे मृतदेह पोलिसांनी नातेवाईकांच्या ताब्यात दिले आहेत. याशिवाय उर्वरित २१ बेपत्ता व्यक्तींचा शोध युद्धपातळीवर सुरू आहे.
हेही वाचा :