ETV Bharat / bharat

Periyar University : पेरियार विद्यापीठाच्या परीक्षेतील जातीसंबंधित प्रश्नावर उच्च शिक्षण विभागाला चौकशीचे आदेश - Asked question on Caste

तामिळनाडूतील पेरियार विद्यापीठात ( Periyar University ) प्रथम वर्षाच्या (द्वितीय सेमिस्टर) मास्टर इन इतिहासाच्या ( Asked question on Caste ) विद्यार्थ्यांना जातीशी संबंधित प्रश्न विचारल्याने वातावर चांगलेच तापले आहे. याबाबत उच्च शिक्षण सचिवांनी याचा निषेध करून चौकशीचे आदेश ( Higher Education Secretary released a statement ) दिले आहेत. विद्यापीठाचे कुलगुरू आर जगन्नाथन यांनी याबाबत, प्रश्नपत्रिका आम्ही तयार केलेली नाही. तरीही आम्ही परीक्षा नियंत्रकाकडून अहवाल मागवला आहे.चौकशी सुरू आहे.

Periyar University
पेरियार विद्यापीठ
author img

By

Published : Jul 16, 2022, 4:23 PM IST

चेन्नई : तामिळनाडूतील पेरियार विद्यापीठात ( Periyar University ) प्रथम वर्षाच्या (द्वितीय सेमिस्टर) मास्टर इन इतिहासाच्या विद्यार्थ्यांना जातीशी संबंधित प्रश्न विचारल्याने मोठी खळबळ उडाली आहे. यावर आक्षेप घेतल्यानंतर चौकशीचे आदेश ( Higher Education Secretary released a statement ) देण्यात आले आहेत. जातीशी संबंधित प्रश्न - चार जाती पर्यायांसह "तामिळनाडूतील खालची जात कोणती" - हा ( Asked question on Caste ) विषय प्रथम वर्षाच्या (द्वितीय सेमिस्टर) मास्टर इन इतिहासाच्या विद्यार्थ्यांना विचारण्यात आला. तामिळनाडूची स्वातंत्र्य चळवळ : 1800 ते 1947 पर्यंत. ( Investigate about Periyar University History Dep. )

Second Semester of First Paper Year
प्रथम वर्षाच्या द्वितीय सेमिस्टर पेपर

उच्च शिक्षण सचिवांनी केले निवेदन प्रसिद्ध : हे पाहून उच्च शिक्षण सचिवांनी शुक्रवारी (१५ जुलै) निवेदन प्रसिद्ध केले. त्यात त्यांनी नमूद केले आहे की, "पेरियार विद्यापीठ, सेलम येथे एमए इतिहासाच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत जातीवर प्रश्न विचारण्यात आल्याचा निषेध करण्यात आला आहे. या प्रकरणाची योग्य चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली असून, चौकशी अहवालाद्वारे विद्यापीठावर योग्य ती कारवाई केली जाईल.

कुलगुरूंनी दिले चौकशीचे आदेश : या मुद्द्यावर वातावरण तापले असल्यामुळे या मुद्द्यावर विद्यापीठाचे कुलगुरू म्हणाले की, दुसऱ्या विद्यापीठाने प्रश्न तयार केला असून, त्यांना पेपरसंदर्भात कोणतीही माहिती मिळाली नाही. "पेरियार विद्यापीठाकडून परीक्षेसाठी प्रश्नपत्रिका तयार केल्या जात नाहीत. इतर विद्यापीठे आणि महाविद्यालयीन प्राध्यापकांनी प्रश्नपत्रिका तयार केली. सहसा प्रश्नपत्रिका फुटू नये म्हणून आम्ही परीक्षेपूर्वी प्रश्नपत्रिका वाचत नाही. मला कोणतीही माहिती वादग्रस्त प्रश्नाबाबत मिळाली नाही. आम्ही याची चौकशी करू. प्रश्नपत्रिका सेट करणाऱ्या परीक्षा नियंत्रकांकडून आम्ही आज अहवाल मागवत आहोत. आम्ही पुनर्परीक्षा घेण्याचा विचार करीत नाही, असेही कुलगुरू म्हणाले.

हेही वाचाा : Thane City Becoming Unauthorized Buildings City : ठाण्यात अनधिकृत धोकादायक बांधकामांचे जाळे; "माळीण"च्या पुनरावृत्तीची शक्यता

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.