ETV Bharat / bharat

High Blood Sugar : उच्च रक्तातील साखर असलेल्या सर्व लोकांना मधुमेह आहे की नाही? हे जाणुन घेण्यासाठी महत्वाची माहिती

author img

By

Published : Dec 19, 2022, 12:47 PM IST

तुमच्या मनात मधुमेहाबाबत (Diabetes) अनेक प्रश्न आहेत का?, अशा परिस्थितीत, उच्च रक्तातील साखर (High blood sugar) असलेल्या सर्व लोकांना मधुमेह आहे की नाही? हे जाणून घेणे आवश्यक आहे. हे कसे जाणुन घ्यावे त्याबाबतची अधिक माहिती. Health News . Utility News

High Blood Sugar
उच्च रक्तातील साखर

भारताला जगाची मधुमेहाची (Diabetes) राजधानी म्हटले जाते. जगातील सर्व मधुमेह रुग्णांपैकी १७ टक्के भारतीय आहेत. भारतात ८० दशलक्ष लोक मधुमेहाने ग्रस्त आहेत. २०४५ पर्यंत भारतात मधुमेहाच्या रुग्णांची संख्या १३५ दशलक्षपर्यंत वाढण्याची भीती आहे. मधुमेहाचा थेट संबंध साखरेशी आहे. अशा परिस्थितीत, उच्च रक्तातील साखर (High blood sugar) असलेल्या सर्व लोकांना मधुमेह आहे की नाही? हे जाणून घेणे आवश्यक आहे. उच्च रक्तातील साखर आणि मधुमेह यांच्यातील संबंध आणि फरक समजून घेऊया. Health News . Utility News

उच्च रक्तातील साखर म्हणजे काय? : उच्च रक्तातील साखरेला (What Is High Blood Sugar) हायपरग्लाइसेमिया देखील म्हणतात. मधुमेह असलेल्या लोकांवर याचा अधिक परिणाम होतो. जेव्हा रक्तातील साखरेचे प्रमाण जास्त होते तेव्हा, त्याला उच्च रक्त शर्करा म्हणतात (High Blood Sugar). मात्र खरा प्रश्न असा आहे रक्तातील साखरेचे प्रमाण किती जास्त असल्याने ती उच्च रक्तातील साखर मानली जाते.?

HbA1c चाचणीची मदत : डॉक्टरांच्या मते, दररोज १५० ग्रॅमपेक्षा जास्त फ्रक्टोज सेवन केल्यास शरीरातील इन्सुलिनचा प्रभाव कमी होऊ शकतो. हा उच्च रक्तातील साखरेचा टप्पा मानला जाऊ शकतो. अन्न आणि शारीरिक हालचालींसह उच्च रक्तातील साखरेची अनेक कारणे असू शकतात. उच्च रक्तातील साखर तपासण्यासाठी HbA1c चाचणीची मदत घेतली जाते. याला ग्लायकेटेड हिमोग्लोबिन किंवा ग्लायकोहेमोग्लोबिन चाचणी असेही म्हणतात. ही मुख्यतः हिमोग्लोबिन चाचणी आहे. ही चाचणी साखरेच्या पातळीतील चढ-उतारांची माहिती देते. म्हणजेच रक्तातील साखरेच्या पातळीतील बदलांची आकडेवारी याद्वारे मिळते. या चाचणीचा मिळणारा निकाल हा टक्केवारीत मोजला जातो.

A1C पातळीचे प्रमाण : डॉक्टरांच्या सल्ल्याने, निरोगी लोक दोन वर्षांतून एकदा आणि मधुमेहाचे रुग्ण दर तीन महिन्यांनी चाचणी करा. HbA1c चाचणीमध्ये एकदा किंवा दोनदा साखरेची उच्च पातळी पाहणे म्हणजे मधुमेह आहे, असे नाही. सामान्य व्यक्ती 5.7% पेक्षा कमी प्रमाण, प्री- डायबिटीक 5.7% ते ६.४% दरम्यान, तर डायबिटीक ६.५% आणि त्याहून अधिक असे HbA1c चाचणीमध्ये A1C पातळीचे प्रमाण असणे सामान्य आहे.

वयानुसार रक्तातील साखर किती असली पाहिजे? : ८० ते १८० mg/dl फास्टिंग ब्लड शुगर ७-१२वर्षे वयोगटात नाश्त्यापूर्वी म्हणजे रिकाम्या पोटी सामान्य मानली जाते. दुसरीकडे, दुपारच्या जेवणानंतर रक्तातील साखर १४० mg/dl पर्यंत असणे सामान्य मानले जाते. रात्रीच्या जेवणानंतर, जर रक्तातील साखर १०० ते १८०mg/dl च्या मर्यादेत राहिली तर ती सामान्य मानली जाते. वय आणि वेळ नुसार सामान्य ब्लड शुगर किती असली पाहीजे ते जाणुन घेऊया. १३ ते १९ रिकाम्या पोटी 70 ते 150 mg/dL , १३ ते १९ दुपारी जेवल्यानंतर 140 mg/dL, १३ ते १९ रात्री जेवल्यानंतर 90 ते 150 mg/dL, २० ते २६ रिकाम्या पोटी 100 ते 180 mg/dL, २० ते २६ दुपारी जेवल्यानंतर 180 mg/dL, २० ते २६ रात्री जेवल्यानंतर 100 ते 140 mg/dL, २७ ते ३२ रिकाम्या पोटी 100 mg/dL, २७ ते ३२ दुपारी जेवल्यानंतर 90-110 mg/dL, २७ ते ३२ रात्री जेवल्यानंतर 100 ते 140 mg/dL, ३३ ते ४० रिकाम्या पोटी 140 mg/dL, ३३ ते ४० दुपारी जेवल्यानंतर 160 mg/dL, ३३ ते ४० रात्री जेवल्यानंतर 90 ते 150 mg/dL, ५० ते ६० रिकाम्या पोटी 90 ते 130 mg/dL, ५० ते ६० दुपारी जेवल्यानंतर 140 mg/dL, ५० ते ६० रात्री जेवल्यानंतर 150 mg/dL

मधुमेह कसा होतो? : रक्तातील साखरेचे प्रमाण शोषून घेता येत नसल्याची स्थिती मधुमेहाला जन्म देते. जेव्हा आपण काही खातो तेव्हा शरीरात एक रासायनिक प्रतिक्रिया होते, ज्या अंतर्गत कार्बोहायड्रेट्सचे ग्लुकोजमध्ये विभाजन होते. या प्रक्रियेतून इन्सुलिन सोडले जाते. तो एक संप्रेरक आहे. इन्सुलिन पेशींना ग्लुकोज घेण्यास सांगतात. या संपूर्ण प्रक्रियेमुळे शरीराला ऊर्जा मिळते. पण जेव्हा इन्सुलिनचे उत्पादन थांबते, तेव्हा शरीरातील ग्लुकोजचे प्रमाण वाढू लागते. म्हणूनच तुम्ही पाहिले असेलच की, मधुमेहाच्या रुग्णांना इन्सुलिनचे इंजेक्शन दिले जाते. Health News . Utility News

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.